Login

सुरमयी प्रवास...भाग 49

Love story
सुरमयी प्रवास...भाग 49


अपर्णाच्या हाताला मेहंदी लावणारी मुलगी आली, ती अपर्णाच्या हाताला मेहंदी लावायला बसली.

स्वराली तिच्या बाजूला बसली, म्युझिक वर गाणे लागलेले होते. अपर्णाच्या काही जुन्या मैत्रिणी आल्या होत्या. सगळ्यांची धमाल मस्ती सुरू होती. दिवसभर एन्जॉय करून सगळ्या मैत्रिणी घरी गेल्या.

दुसऱ्या दिवशी अपर्णा ऑफिसला गेली, तिने श्वेतांगला तिची मेहंदी दाखवली.

"श्वेतांग माझी मेहंदी बघ"

"छान आहे."

"श्वेतांग बघ तरी एकदा."

"अग खरच छान आहे."


"पण तू न बघताच बोलतोयस."

"अपर्णा प्लीज मला काम करू दे ना."


"श्वेतांग तू का असा झालास रे? आधी माझी प्रत्येक गोष्ट ऐकायचा आणि आता माझ्याकडे लक्ष देत नाहीस."

"काय करू ग अपर्णा कामच इतकं वाढलंय ना, कामाचा खूप लोड होतोय, तिकडे आपल्याला काम कमी असायचं पण इकडे हा बॉस डोक्यावर टपलेला असतो. घरी गेल्यानंतरही मी लॅपटॉप वर किती तरी वेळ कामच करत असतो. घरी आई ओरडते आणि ऑफिसमध्ये तू ओरडतेस सांग आता मी तरी काय करावं?"


"सोडून दे नोकरी."

"सोडून देऊ आणि काय करू घरी बसू. तू नोकरी कर मी घरी बसतो."

"तसं नाही रे."

"मग कसं?"

"कामाला सुरुवात कर नाहीतर बॉस येईल आणि ओरडेल."


"हो करते."


बघता बघता साखरपुड्याचा दिवस उजाडला.

साखरपुड्याचा वेणू हॉटेलमध्ये ठरवला होता.

श्वेतांगचे काही मित्र मैत्रिणी, अपर्णाचे मित्र मैत्रिणी आणि दोन फॅमिली जवळचे दोन-चार नातेवाईक एवढेच होते. सगळे पाहुणे जमलेले. श्वेतांग आणि अपर्णा दोघेही तयार झाले.

दोघे स्टेजवर आले,

"अपर्णा छान दिसत आहे."

"तू पण छान दिसतेस."

कार्यक्रमाला सुरूवात झाली.

श्वेतांगने अपर्णाच्या बोटामध्ये अंगठी घातली, त्यानंतर अपर्णांने पण श्वेतांगच्या बोटामध्ये अंगठी घातली.
तो कार्यक्रम होताच फटाक्यांची आतिषबाजी झाली.

क्षणात पडद्याला आग लागली, सगळीकडे आग पसरली.

सगळी धावाधाव सुरू झाली, सगळे स्वतःचा जीव वाचविण्यासाठी सैरावैरा पळू लागले.


सगळे धावत पळत कसेतरी बाहेर आले, सगळे ओरडू लागले किंचाळू लागले. काही क्षणात लक्षात आलं की अपर्णा बाहेर आलीच नाही आहे.

"अपर्णा कुठे आहे? माझी अपर्णा दिसत नाहीये, माझी अपर्णा दिसत नाही आहे." कुसुम ओरडायला लागली.

तसच श्वेतांगने आजूबाजूला बघितलं.
अपर्णा दिसली नाही म्हणून तो पुन्हा त्या आगीत शिरला. हे बघून त्याची आई

"श्वेतांग थांब रे, श्वेतांग थांब जाऊ नकोस." ओरडत राहिली.

श्वेतांग धावत आगीत घुसला आणि आत गेला. एका कोपऱ्यात अपर्णा बसून होती, आगीला पार करत श्वेतांग तिच्या जवळ पोहोचला.

"श्वेतांग तू आलास.. आला तू."

"हो मी आलोय." दोघांनी एकमेकांना मिठी मारली,


त्याने तिला घट्ट पकडलं, मिठीत कवटाळलं. तिच्या माथ्याचे चुंबन घेतले. तिच्या गालावरचं चुंबन घेतलं. तिचा हात घट्ट पकडला आणि तिला घेऊन समोर आला, थोडा समोर आला तर वरचा खांब त्याला पडताना दिसला. तसेच त्याने अपर्णाला समोर करून बाहेर ढकललं. अपर्णा बाहेर जाऊन पडली पण श्वेतांगच्या अंगावर मात्र तो खांब पडला.

"श्वेतांग.. श्वेतांग..श्वेतांग..." ती जोरजोरात ओरडायला लागली.
तिच्या आवाजाने दूर उभे असलेले कुसुम, विनायकराव, सोहम आणि श्वेतांगची आई सगळे धावत तिच्याजवळ आले.

"अपर्णा तू बरी आहेस? तू बरी आहेस ना बाळा." कुसुमने तिला जवळ घेतलं.


"माई..माई...माई.. श्वेतांग श्वेतांग आत अडकलाय, माई.."

"कुणीतरी वाचवा माझ्या श्वेतांगला, माझ्या श्वेतांग आत राहिलाय."

ती ओरडत होती,

"श्वेतांग आत राहिलाय." हे ऐकून त्याची आई जोरात रडायला लागली.


काही वेळाने तिथे पोलीस आले, फायर ब्रिगेडची गाडी आली. आग वीजवण्यात आली पण तोवर श्वेतांग श्वेतांग नव्हताच, आग वीजवल्यानंतर पोलीस आत गेले त्यांनी शोधाशोध सुरू केली.

अपर्णा आत जायला निघाली पण पोलिसांनी तिला जाऊ दिलं नाही.

"हे बघा मला आत जाऊ द्या, माझा श्वेतांग आत अडकलाय. त्याला मला बाहेर आणू द्या."
ती जोरजोरात हाय मोकलून रडत होती.

"माझ्या श्वेतांगला मला भेटू द्या, मला बघू द्या माझ्या श्वेतांगला." त्याची आई आणि अपर्णा जोरात रडायला लागल्या.

श्वेतांगची बॉडी पूर्ण जळालेली होती, पोलिसांनी कसेबसे सगळ्यांना घरी पाठवलं, घरी आल्यावर अपर्णा मात्र पूर्णच स्तब्ध झाली.

एकही शब्द कुणाशी बोलली नव्हती आणि रडली देखील नव्हती. अपर्णाची सासू एकटीच आहे म्हणून कुसुम त्यांनाही घरी घेऊन आली होती, त्याही काही बोलत नव्हत्या.

दुसऱ्या दिवशी श्वेतांगचा अंत्यसंस्कार विधी झाला.

दिवस सरकत गेले.

एक दिवस कुसुम विनायकरावांच्या बाजूला येऊन बसली.


"अहो किती दिवस हे चालायचं? एक आठवडा झाला अपर्णा तशीच बसून आहे, कुणाशी काही बोलत नाही. तिच्या तोंडून एक शब्दही ऐकला नाहीये, घरी असली की दिवसभर माई माई करत असे आणि आता बघा ना एकही शब्द बोलत नाहीये काही खात नाही की काय पीत नाही आहे.
मगाशी ज्यूस बनवला तो घुटभर प्यायली आणि बाजूला ठेवलं काय करावं काही कळत नाही.
अहो तिच्याशी बोला ना, बोलून जर बरं वाटणार असेल तर बोला ना तिच्याशी."


"मी तर बोलेन ग पण ती काही बोलायला तयार झाली पाहिजे ना, मी जातो तिच्याशी बोलतो तिच्या बाजूला बसतो तिच्याशी गप्पा मारतो पण ती एकही शब्द बोलणार नाही आहे मला माहित आहे.
तू आज स्वरालीला घरी बोलावून घे बघू तिच्याशी तरी काही बोलते का?".

कुसुमने स्वरालीला फोन केला.


"हॅलो स्वराली आज घरी येशील का बाळा संध्याकाळी?"


"बोला ना काकू काही अर्जंट आहे?"


"नाही ग आज घरी ये संध्याकाळी अपर्णाला कुठेतरी बाहेर घेऊन जा तिला बरं वाटेल, ती काहीच बोलत नाहीये."


"काकू काळजी करू नका मी समजू शकते येते मी."

स्वराली संध्याकाळी घरी आली, अपर्णाच्या खोलीत गेली.


अपर्णा खिडकीत बसून एकटक बाहेर बघत होती, हातात श्वेतांगचा फोटो होता.

तो त्या दोघांनी कॅफेमध्ये काढलेला फोटो होता, स्वराली तिच्या बाजूला जाऊन बसली.

"काय करतेय अपर्णा?"

तिने स्वरालीकडे फक्त बघितलं पण ती काहीच बोलली नव्हती. ती पुन्हा त्या खिडकीतून बाहेर बघू लागली.


"अपर्णा आपण बाहेर जाऊया का? तुझ्या आवडत्या कॉफी शॉप मध्ये किंवा टपरीवर..टपरीवरचा चहा प्यायला तुला तू गरमागरम चहा आवडतो ना आणि बाहेर ना छान पाऊस हि पडतोय. भुरभुर पावसात गरमागरम चहा प्यायला खूप छान वाटेल हो ना. चल आपण जाऊया का?"

स्वराली खूप उत्साहाने बोलत होती, तिच्या बोलण्यावर अपर्णा काहीतरी बोलेल असं वाटत होतं पण अपर्णा काहीच बोलत नव्हती. स्वरालीने तिच्या खांद्यावर ठेवला तिच्या समोर जाऊन बसली तिचा हात हातात घेतला.

"अपर्णा किती दिवस अशी कुडत बसणार आहेस ग? बाहेर निघ परिस्थितीशी लढ. तुझा श्वेतांग या जगात नाही हे मान्य कर. स्वीकार कर या सत्याचा, सत्य स्वीकारत नाहीयेस अग तुला माहितीये श्वेतांगची आई त्या पण अश्याच बिथरल्या होत्या पण आता सावरल्या. त्या त्यांच्या गावाला गेल्यात. श्वेतांगच्या आठवणी त्यांना जगू देत नव्हत्या म्हणून त्या त्यांच्या गावाला निघून गेल्या गावात त्यांचे घर आहे तिथेच राहू लागल्या.
अपर्णा किती दिवस अशी राहणार आहेस ग? का त्रास देतेस स्वतःला. कुणाशीच बोलत नाही, हसत नाहीस नुसती अशीच बसून असतेस किती दिवस हे सगळं चालणार आहे..

तुझ्या अशा वागण्याने काका काकूंना किती त्रास होतो याची कल्पना आहे का तुला? तुझ्या वागण्याचा त्रास होतोय गं दुःख होतंय त्यांना, सावर स्वतःला. तुझ्या आनंदातच त्यांचा आनंद आहे तुला आनंदी राहावी एवढेच वाटते त्यांना. या उतारवयात काय इच्छा करणार आहेत ते."

अपर्णा काहीच बोलली नव्हती.