Login

सुरमयी प्रवास...भाग 50

Love story
सुरमयी प्रवास...भाग 50

स्वराली बोलत होती, पण अपर्णां ऐकूनही न ऐकल्यासारखी करत होती. स्वराली बोलून बोलून थकली, अपर्णा मात्र काहीच बोलायला तयार नव्हती. शेवटी स्वराली रूमच्या बाहेर आली येऊन कुसुम जवळ बसली.


"काही बोलली का ग?" कुसुमने काळजीने विचारलं.

"काकू ती काय बोलायलाच तयार नाहीये, किती वेळची मी एकटीच बडबड करतीये पण ती काही ऐकून घ्यायला, काही बोलायलाच तयार नाही. काय करू मी मलाच काही कळत नाहीये तिला म्हणाली चल बाहेर तुझ्या आवडीचं काहीतरी करू कॉफी शॉपला जाऊ, टपरीवर जाऊ ऐकूनही न ऐकल्यासारखी करते की ऐकतच नाही मला तेच कळत नाही काहीच रिप्लाय देत नाहीये काय कराव कळेना."

स्वराली तिथून निघून गेली.
आता मात्र कुसुम अस्वस्थ झाली.

दिवस सरकत गेले.

गेले काही दिवस कुसुमच कोणत्याच कामात लक्ष लागत नव्हतं. काही करावसं वाटत नव्हतं. रोजच्या आयुष्यात आनंद वाटेनासा झाला होता.

अपर्णाच्या आयुष्यात इतकं सगळं घडलं होत की त्यामुळे आता कुसुमलाही त्रास व्हायला लागला.


झोप नं होणं, पोट साफ न होणं अशा तक्रारीही वाढल्या होत्या.

सोहमच्या लक्षात आलं होतं पण त्याला कुठलीच जबाबदारी घ्यायची नव्हती.

विनायकरावांना जाणवलं पण खरंच तसं काही असलं तर आपल्यावर जबाबदारी येईल असं वाटून त्यांनी 'सगळं ठीक होईल', असं सांगून कुसुमला  दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

पण आपल्याला काहीतरी वेगळं होतंय, आपल्या 'मनाला दुखापत' झाली आहे हे कुसुमच्या लक्षात आलं नव्हत आणि त्यांच्या बाकीच्यांनाही ते समजलं नव्हतं.

तिला शारीरिक दुःखापेक्षा मानसिक दुःख जास्त झालेलं होत.
शरीराला इजा होते, आजार होतो तसा मनालाही आजार होतो हे बहुतांशवेळा लोकांना माहितीही नसतं. घरातल्या सर्व वयोगटातल्या लोकांना शारीरिक आजाराप्रमाणे मानसिक त्रासालाही सामोरं जावं लागत असतं.

अर्थात आपल्या रोजच्या आयुष्यात थोडे चढ-उतार, चांगल्या वाईट भावना मनात येतातच. पण आपल्याला आधाराची गरज कधी आहे हे ओळखण्यासाठी मात्र काही मार्गांचा वापर केला पाहिजे.

मानसिक आजारांसंदर्भातील गैरसमजांमुळे यावर विचार करण्याचं दार नेहमी बंद ठेवलं जातं. यावर न बोललेलंच चांगलं असं म्हणून तो विचार दूर ढकलला जातो. पण दुर्दैवाने असा विचार करणाऱ्या व्यक्तीचा किंवा त्याच्या कुटुंबातील व्यक्तीचा मानसिक आजार कमी होण्याऐवजी वाढीला लागतो.


आपल्या सर्वांच्या आयुष्यात एका मर्यादेपर्यंत ताण आणि प्रश्न असतातच परंतु ते एका मर्यादेच्या पलिकडे जात असतील त्याचा आपल्या आयुष्यावर परिणाम होत असेल तर त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

कुसुमची घुसमट होत होती.
आपल्या मनात सुरू असलेली खदखद मानसोपचारतज्ज्ञ किंवा समुपदेशकांना सांगण्यात कोणताच कमीपणा नसतो.

प्रत्येकवेळेस डॉक्टर आपल्याला औषधेच देतात असे नाही. अनेक समस्या सुरुवातीच्या पातळीवर असतील तर समुपदेशन आणि वर्तनदोष सुधारून त्यांच्यावर मात करता येते.

मानसिक आरोग्यातील चढ-उतार वेळीच लक्षात घेऊन मदत घेतली तर बरं होण्यासाठी फारच कमी वेळ लागतो.

मदत घेण्यास टाळाटाळ केल्यामुळे मनस्थितीमध्ये आणखी नकारात्मक, खोलवर बदल घडू शकतात. अशावेळेस मनस्थिती नीट होण्यासाठी प्रयत्न आणि वेळही भरपूर लागू शकतो


त्यामुळे वेळेवर उपचारासांठी मदतीचं दार ठोठावणं हे सर्वांत चांगलं. किंबहुना उत्तम मानसिक आरोग्यासाठी टाकलेलं ते सजगतेचं पहिलं पाऊल म्हणता येईल.

कुटुंबीयांमध्ये एखाद्या व्यक्तीला मानसिक आधाराची गरज आहे, त्याला काही त्रास होत आहे हे ओळखण्यासाठी त्याच्या दिनक्रमाकडे लक्ष द्यावं. कुसुम कुणाला काही सांगत नव्हती.

रोजचं घरकाम, घरातील कामासाठी बाहेर जाणं, रोजच्या गोष्टी करताना अडथळा येत असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं हा क्रम बिघडला असेल तर त्याने त्याची काळजी घ्यायला हवी.

घरच्यांना कळलं आणि त्यांनी तिची ट्रीटमेंट सुरू केली.
तिला बरं वाटायला लागलं.

कुसुम हळूहळू सावरायला लागली,
ते गावाकडे राहायला गेले,

कुसुमने तिचा छोटासा व्यवसाय सुरू केला.

कुटुंबापासून दूर असलेले एकटे जे राहत होते त्यांना ती डबे पोहोचवायची.


अपर्णाही हळूहळू सावरायला लागली.

"माई आता तू एकटीने काम करायचं नाही, मी तुला मदत करत जाईल."


"अग कशाला मी करेल ना आणि हे तर माझ्या आवडीचं काम आहे तुला माहिती आहे."

"हो हे तुझ्या आवडीचं काम आहे पण थोडी मदत केली तर काय फरक पडणार आहे आणि तसंही दिवसभर काय करणार ग? थोडा तुला कामाला हातभार अजून काही नाही आणि आता नाही म्हणायचं नाहीये तेवढीच तुलाही मदत होईल उगाच तुझी दगदग नको."

"बरं बाई कर मदत तुला म्हटलं तर तू ऐकणार आहेस का."

हळूहळू दिवस सरकत गेले, सोहम तिथेच एका ऑफिसमध्ये कामाला लागला.


दिवस महिने वर्ष उलटली

एक दिवस कुसुम विनायकरावांना बोलली.

"अहो आता तरी अपर्णाच्या लग्नाचा विचार करायचा का? आता अपर्णा सावरली आहे मला असं वाटते की आपण तिच्या लग्नाचा विचार करावा, वय वाढत चाललंय. किती वर्ष अशी घरात बसवून ठेवणार आहोत."

"हो चालेल."

त्यांच्या गावात एक पंडित राहायचे ते लग्न जूडवण्याचे काम करत होते.

एक दिवस त्यांनी अपर्णाला मंदिरात बघितलं, कुसुम आणि अपर्णा मंदिरात गेले होते. त्या पंडितने कुसुम आणि अपर्णाला जवळ बोलावलं.


"अहो ताई इकडे या ना."

"बोला."

"तुमच्या मुलीचे लग्न करताय का?"

"हो, लग्नाचा विचार सुरू आहे. तुमच्या लक्षात आहे का एखादा मुलगा."

"एक मुलगा आहे शहरातला आहे, आपल्या गावाला लागूनच आहे त्यामुळे काही काळजी नाही. मोठा बिझनेस मॅन आहे घरी त्याची आई आणि तो असतो, मुलाचे वडील बिझनेस निम्मित फिरती वर असतात.
मी कळवतो तुम्हाला."


दोघीही घरी गेल्या.


काही वेळाने त्यांच्या शेजारील बाई त्यांच्याकडे बसायला आली.

"कुसुमताई छान स्वयंपाक बनवता हो तुम्ही. त्यांच्याकडे डबे जातात ना ते तुमची खूप स्तुती करतात. खूप छान स्वयंपाक बनवता हो."


"माझी मुलगी मला मदत करते तिच्या हाताला चव आहे बरीच."


"मग मुलीचं लग्न करणार आहे की नाही?"

"हो करू या ना."

"मी काय म्हणत होती कुसुमताई, अहो इथे शाळेत एक टीचर लागत आहे तुमची अपर्णा करेल का हे काम,? पगारही चांगला मिळेल आणि तुमची अपर्णा शिकली पण आहे."

"ती तयार असेल तर मला काही हरकत नाही. तिने एमबीए केलंय मार्केटिंग मध्ये पण सध्या मी इकडे आलोय आणि."
कुसुम बोलता बोलता थांबली.


"आई तू काळजी करू नकोस मी नोकरी लवकरच शोधणार आहे मी इथे करणार नाही शहरातच करेल, तसेच इथून दूर नाहीये मी रोज येणं जाण करेल."


"अग पण तुला जमेल का?"

"जमेल आई तू काळजी करू नकोस."


"इथे छोटीशी नोकरी करण्यापेक्षा माझं ज्यात शिक्षण झाले ना त्याच फिल्ड मध्ये मी नोकरी करेल. तरच मला चांगला पगारही मिळेल तू काळजी करू नकोस आधीच्या कंपनीमध्ये काम केले ना मी तिथे काम नाही करणार दुसरीकडे जॉब शोधते."

"तुमचं ठरलंच आहे तर काही हरकत नाही. मला वाटलं अपर्णाला मदत होईल." शेजारची बाई

"अहो नाही तुम्ही आलात ते खरंच अपर्णाच्या काळजीपोटी आहात खरंच तुमचे खूप धन्यवाद."

दुसऱ्या दिवशी पासून अपर्णांने नोकरी शोधायला सुरुवात केली तिने बऱ्याच कंपनीमध्ये इंटरव्यू दिले आणि काही महिन्याने एका कंपनीत तिला जॉबही लागला.

अपर्णाला जॉब लागला, सोहमची गाडी रुळावर आली म्हणून विनायकराव आणि कुसुमला थोडं बरं वाटत होतं.

दोघे आपापल्या मार्गाला लागले याचा आनंद होता पण आता काळजी लागली होती ती अपर्णाच्या लग्नाची
एकदा का तिचं लग्न पार पडलं की आपण मोकळे झालो असं त्यांना वाटत होतं.
दोघेही त्याच विचारात बसले होते.