सुरमयी प्रवास...भाग 51
अपर्णाचा जॉब सुरू झाला, ती रोज येणं जाणं करायची. दिवस छान चाललेले होते. एक दिवस कुसुम आणि अपर्णा मंदिरात गेले. तेव्हा त्यांनी त्या पंडितला सांगितले की अपर्णाला जॉब लागलाय तुम्ही कोणता तो बिझनेस मॅन आहे त्यांना जर कळवलं आणि बघण्याचा कार्यक्रम जर केला तर बरं होईल.
पंडितने मुलीचे फोटो आणि माहिती मुलाकडे पाठवली.
बघण्याचा कार्यक्रम करायचा म्हणून मुलाकडून होकार आला.
बघण्याचा कार्यक्रम करण्याचं ठरलं.
"अपर्णा तयार झाली का ग?" कुसुम हातात गजरा घेऊन आत आली.
अपर्णाचं मात्र तिच्या बोलण्याकडे लक्षचं नव्हतं.
ती तिच्या भूतकाळात गेलेली होती.
डोळे अश्रूंनी दाटलेले होते.
"कधी संध्याकाळचा गारवा घेऊन
कधी सकाळचं कोवळ ऊन घेऊन
येते तुझी आठवण...
कधी हृदयातलं स्पंदन तर
कधी वाट बघणार मन घेऊन
येते तुझी आठवण.."
कधी सकाळचं कोवळ ऊन घेऊन
येते तुझी आठवण...
कधी हृदयातलं स्पंदन तर
कधी वाट बघणार मन घेऊन
येते तुझी आठवण.."
कुसुमने तिच्या खांद्यावर हात ठेवला.
"काय ग काय झालं? तुझं लक्ष कुठे आहे?"अपर्णाने लगेच मान वळवून डोळ्यातलं पाणी डोळ्यातचं साठवलं.
स्मितहास्यने कुसुमकडे बघत बोलली.
"काही नाही माई.."
"हम्म काही नाही काय, डोळ्यात दिसतं तुझ्या काहीतरी आहे. मी तुझी सख्खी नाही ना, म्हणून मला काही सांगत नाहीस. सगळं मनात साठवून ठेवतेस. मी तर तुला आपलंच मानते पण तू.." ती समोर काही बोलणार अपर्णाने तिच्या तोंडावर बोट ठेवला.
"खबरदार यानंतर असं बोललीस तर, नेहमीसाठी कट्टी होईल मी तुझ्यासोबत."
दोघीही हसल्या आणि एकमेकींच्या मिठीत गेल्या.
"अपर्णा अग बोलत जा माझ्याशी, तुझ्या मनातलं सांगत जा."
"माई अग खरंच काही नाही."
"बरं बाई."
कुसुमने अपर्णाच्या केसात गजरा माळला.
"दृष्ट काढावीशी वाटते आहे आज माझ्या लेकीची."
अस म्हणतं कुसुमने तिला काजळाचा टिक लावला.
"कुणाची नजर नको लागायला माझ्या लेकीला."
"काय ग माई तू सुद्धा.."
"गंमत करत नाहीये आज तू खूप सुंदर दिसतेस, अगदी परीकथेतील राजकुमारी सारखी दिसतेस. आज तरी सगळं व्यवस्थित पार पडू दे म्हणजे झालं." कुसुम भावुक झाली.
"होईल ग सगळं नीट. का तू मनाला लावून घेतेस? हे बघ माझ्या नशिबात जे असेल ना तेच घडेल. तू का स्वतःला त्रास करून घेतेस आणि तुझी चूक काहीच नाही मग का जीवाला लावतेस. सगळं नीट होईल. माझ्या नशिबात हाच मुलगा असेल ना तर याच्याशी माझं नक्की जमेल पण तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आणि तू असं वागलीस ना तर खरंच कट्टी होईल मी."
"माझी गुणाची लेक ग." कुसुमने तिच्या डोक्यावरून हात फिरवला.
"चल तू बस मी किचनमध्ये जाते."
"माई मी येऊ का? काही मदत करू का तुला?"
"नाही ग श्रद्धा काकू आल्या आहेत, त्या मदत करतील मला तू बस इथेच." आज अपर्णाचा बघण्याचा कार्यक्रम होता. ती तयार होऊन बसली होती, शरीर जरी इथे असलं तरी मन तिचं त्याच्याचकडे होतं. पाच वर्षापूर्वीची त्यांची पहिली भेट तिला आठवली.
ती बसस्टॉप वर उभी होती, आज ऑफिसमधून निघायला तिला थोडा उशीरच झालेला होता. ऑफिसमधल्या भानगडीमुळे ती अपसेट होती. बाहेर काळोख दाटलेला होता. तिचा मोबाईलसुद्धा स्वीचं ऑफ झालेला होता. अचानक पाऊसाच्या रेशीमधारा बरसायला लागल्या.
ती पटकन आडोश्याला गेली, पण वाऱ्यामुळे पावसाने तिला घेरलं आणि ती चिंब भिजली. तिने तिच्या हाताने तिच्या केसावरचं पाणी झटकलं, तिच्याच ओढणीने तिने तिचा चेहरा पुसला. तिची नजर खाली गेली तिला कुणाची तरी परछाई दिसली बघितलं तर बाजूला एक मुलगा होता. ती थोडी घाबरली, लगेच तिने एक पाऊल मागे टाकला.
तिने तिच्या हाताने तिच्या केसावरचं पाणी झटकलं, तिच्याच ओढणीने तिने तिचा चेहरा पुसला. तिची नजर खाली गेली तिला कुणाची तरी परछाई दिसली बघितलं तर बाजूला एक मुलगा होता. ती थोडी घाबरली, लगेच तिने एक पाऊल मागे टाकला.
"घाबरू नका, तुम्हाला असं भिजलेलं बघितलं आणि राहवलं नाही म्हणून तुमची मदत करायला आलो." त्याने त्याची रुमाल समोर केली. तिने काही न बोलता तो रुमाल घेतला आणि चेहरा पुसला.
"थँक यू सो मच." रुमाल त्याच्या हातात परत दिला.
"मी तुम्हाला सोडू शकतो का? म्हणजे बघा आता खूप रात्र झाली आहे आणि आता तुम्हाला काही साधनही मिळणार नाही, पाऊसाचा जोर वाढतोय. तर तुमची काही हरकत नसेल तर मी तुम्हाला तुमच्या घरी सोडू शकतो?"
खरंतर अपर्णाला नाहीच म्हणायचं होतं पण रात्र आणि पाऊस बघून तिने होकारार्थी मान हलवली. अपर्णा त्याच्या गाडीत जाऊन बसली. त्याने गाडी स्टार्ट केली आणि ते निघाले.
"बाय द वे तुमचं नाव काय?"
"अपर्णा माने.."
"ओ हाय अपर्णा.. छान नाव आहे."
"अरेच्या मी माझं नाव अजून सांगितले नाहीये. हाय माझं नाव श्वेतांग दळवी
अपर्णा ने हाय केलं आणि ती अगदी शांत बसली.
श्वेतांगने म्युझिक ऑन केलं.
"यू ही कट जायेगा
सफर साथ चलने से
मंजिल आयेगी नजर
साथ चलने से.."
सफर साथ चलने से
मंजिल आयेगी नजर
साथ चलने से.."
गाणं सुरू होतं.
श्वेतांगने अपर्णा कडे बघितलं, ती काचेतून बाहेर बघत होती. बाहेर अगदी काळोख दाटलेला होता. पावसाची रिमझिम थोडी कमी झाली, काही वेळाने अपर्णाचं घर आलं. श्वेतांगने गाडी थांबवली.अपर्णा गाडीतुन उतरली, त्याच्याकडे बघत हलकी स्माईल दिली,
"थँक्यू सो मच." त्याने हसत तिला वेलकम केलं आणि तो निघाला. त्यानंतर अपर्णा घरी आली.
"काय ग अपर्णा पुन्हा कोणत्या विचारात गेली, पाहुणे आलेत चल लवकर." कुसुमने तिला आवाज दिला. तेव्हा ती भानावर आली. अपर्णाचे डोळे अजूनही पाणावलेले होते. तिला हे सगळं करायचं नव्हतं पण बाबा आणि माईच्या आग्रहाखातर ती हे सगळं करायला तयार झाली. मुलगा, मुलाचे आई-वडील आणि मुलाचा भाऊ असे चार लोक अपर्णाला बघायला आले होते.अपर्णाचे बाबा विनायकराव त्यांनी सगळ्यांचे स्वागत केले.
"या ना, या बसा." पावणे आत येऊन बसले. काही क्षणाने कुसुम पण हॉलमध्ये आली, तिने सगळ्यांना नमस्कार केला, सगळ्यांमध्ये चर्चा सुरू झाल्या.
"तुम्ही बायोडाटा बघितलाच असेल तशी आमची अपर्णा सालस आहे हो, गुणी मुलगी आहे. जिथे जाईल ना तिथे सुखाने संसार करेल." विनायकराव त्यांच्या लेकीबद्दल कौतुकाने बोलत होते.
"हो हो बघितला आम्ही बायोडाटा. खरच शिक्षण ही चांगला आहे तुमच्या मुलीचं आणि दिसायलाही बरी आहे. बघू आता आमच्या मुलाला आवडली तर आम्हाला काही हरकत नाही. मुलीला बोलावलं तर बर होईल, आम्हाला जरा लवकर निघायचं होतं." मुलाचे वडील बोलत होते.
"मुलगी येईलच ना. कुसुम जा अपर्णाला घेऊन ये."
विनायकराव कुसुमकडे बघत म्हणाले.
कुसुम आत गेली,
"चल अपर्णा हॉलमध्ये जायचं. बरोबर बोलशील ग."असं म्हणताच अपर्णाने तिच्याकडे तिरप्या नजरेने कटाक्ष टाकला.
"माई मी लहान आहे का आणि माझी स्कूलमधील एक्साम सुरू आहे का? काय तुझं पण?"
"तसं नाही ग, तू ये किचनमध्ये."कुसुम तिला किचन मध्ये घेऊन गेली.
तिने अपर्णाच्या हातात नाश्त्याची प्लेट दिली आणि अपर्णाला घेऊन हॉलमध्ये आली. सगळ्यांची नजर अपर्णावर होती, मुलगा वर मान करून बघणार तोच त्याच्या मोबाईलवर फोन आला
"एक्सक्युझ मी.." त्याने फोन रिसिव्ह केला.
"हॅलो मिस्टर अल्बर्ट. होल्ड वन मिनिटं."बोलत बोलत तो बाहेर निघून गेला. अपर्णाने सगळ्यांना नाश्त्याची प्लेट दिली. विनायकरावांनी तिला समोर चेअरवर बसायला सांगितलं.
"तुम्हाला मुलीला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता." विनायकराव बोलले.
"मुली नाव काय तुझे?" मुलाच्या वडिलांनी विचारले.
"अपर्णा विनायक माने."
"शिक्षण किती झालंय." त्यांनी पुन्हा प्रश्न केला.
"एम बी ए इन मार्केटिंग."
"आता जॉब सुरू आहे ना तुझा?" मुलाच्या आईने प्रश्न विचारला.
”हो."
”हो."
"मग लग्न झाल्यावर नोकरी आणि संसार दोघांचा ताळमेळ जमेल का तुला?" त्यांनी पुन्हा तिला प्रश्न विचारला.
"हो का जमणार नाही. मॅनेज केलं की सगळं जमतं. सगळं आपल्यावर अवलंबून असतं, जमेल मला." अपर्णाने हसून उत्तर दिलं.
त्यांचं बोलणं सुरू होतच की मुलगा दारातून आला, अपर्णा खाली मान घालून बसली होती.
"हा आमचा मुलगा मानस... द बिझनेसमॅन मानस कुंद्रा." नाव ऐकताच अपर्णाने मान वर करून बघितलं आणि ती त्याच्याकडे बघतच राहिली.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा