Login

सुरमयी प्रवास...भाग 52

Love story
सुरमयी प्रवास...भाग 52

अपर्णाने त्या मुलाकडे बघितलं आणि बघतच राहिली.
त्याचंही लक्ष तिच्याकडे गेलं.
दोघांची नजरानजर झाली. त्याने लगेच नजर फिरवली.

"आई बाबा मला अर्जंट मिटिंगला जावं लागेल, सो मी निघतोय."

"अरे पण मुलीला बघून तरी घे."

"तुम्ही बघितलं ना, झालं मग, मी नेक्स्ट टाईम बघेल. आता मला निघावं लागेल." तो तिथून निघून गेला.

"माफ करा ह, आमच्या मुलाला ना कामाच्या समोर काही दिसत नाही. पण आम्ही बोलतो त्याच्याशी आणि तुम्हाला कळवतो." असं म्हणून ते लोकं निघून गेले.


"अहो पण..." विनायकराव काही बोलण्याच्या आत ते निघून गेले.

अपर्णा तिथेच स्तब्ध बसून होती.

"अपर्णा बाळा चल चेंज करून घे." कुसुम अपर्णाला आत घेऊन गेली.


'हा तोच ना? पण हा तोच जर आहे तर मग इथे कसा?' अपर्णाच्या डोक्यात विचारांचा गुंथा झाला, कुठलेच धागेदोरे जुळत नव्हते.

अपर्णाने चेंज केलं, सगळे आप-आपल्या कामाला लागले.
दोन दिवसांनी तो मुलगा पुन्हा घरी आला. दारावरची बेल वाजली. विनायक रावांनी दार उघडलं.

"तुम्ही? तुम्ही इथे?"

"माफ करा मी न सांगताच आलो."

"नाही नाही तसं काही नाही, या ना आत या, बसा."

तो आत आला आणि बसला.

"अपर्णा आहे का घरी? मला तिला भेटायचं होतं. तिच्याशी थोडं बोलायचं होतं. नाही म्हणजे तुमची काही हरकत नसेल तर मी बोलू शकतो का तिच्याशी?"


"हो हो चालेल ना, तुम्ही बसा. मी अपर्णाला आवाज देतो."

विनायकराव आत गेले, आत जाऊन कुसुमला सगळं सांगितलं.

"अपर्णा तयार हो, तो मुलगा तुला भेटायला आला आहे."

"पण माई आता अचानक?"

"हो त्याला तुझ्याशी बोलायचं आहे असं म्हणतोय, नाही कसं म्हणणार ना. तो बाहेर बसलाय तू तयार होऊन जा."

अपर्णा तयार झाली आणि त्याच्यासमोर हॉलमध्ये जाऊन बसली.

"हाय अपर्णा."अपर्णाने त्याला हॅलो केलं.

"तुझी काही हरकत नसेल तर आपण बाहेर जाऊन बोलू शकतो का?"

"बाहेर नको आपण वर टेरेसवर जाऊया, बाहेर बरं दिसणार नाही."

"हो ठीक आहे, चालेल."अपर्णा त्याला टेरेसवर घेऊन गेली. 

"बोला ना काय बोलायचं आहे तुम्हाला?"


"खरंतर अपर्णा काय बोलू मलाच कळत नाहीये, म्हणजे बघ ना काय हा योगायोग समजावा की आणखी काही. इतक्या वर्षानंतर आपण एकमेकांच्या समोर आलो आहोत पण आपल्यात बोलण्याची हिंमत नाहीये. मी तुझ्याशी काय बोलू मला अजूनही कळत नाहीये. पण त्या दिवशी मी असाच निघून गेलो आणि मला त्याचं वाईट वाटत होतं म्हणून मी तुला पुन्हा भेटायला आलोय. उगाच तुझ्या मनात माझ्याबद्दल काही गैरसमज नको म्हणून."


कुसुम कॉफी घेऊन आली, तिने टेबलवर कॉफी ठेवली आणि ती निघून गेली.


"काय झाले तुमच्या घरच्यांना मी पसंत नाही का? असं असेल तर काही हरकत नाहीये तुमच्याकडून होकार यावा अशी अपेक्षाच नाही माझी."


"नाही ग तसं नाही, आमच्याकडून होकारच आहे. आईने तुला ऑफिसमध्ये बघितलं होतं ना त्याच दिवशी तू त्यांना आवडली होतीस पण त्यानंतर तुझं आणि श्वेतांगचं जे काही झालं त्यामुळे मग मी विचार सोडलेला होता. आज बघ ना नशिबाने आपली पुन्हा भेट झाली.

कधी विचार केला नव्हता की अशी आपली भेट होईल. त्या दिवशी मी तुला बघितलं आणि बघतच राहिलो."


"माझी तीच अवस्था होती मी तुला बघितलं आणि बघतच राहिले. आपल्या नशिबात कदाचित हेच लिहीलेले असेल म्हणून हे घडलं हो ना. मी असं तू म्हटलेलं चालेल ना."


"हो चालेल मला मानस म्हटलं तरी चालेल."

"थँक्यू थँक्यू सो मच अपर्णा. आई बाबा लग्नाला होकार देण्यासाठी फोन करणारच आहेत ते घरी येणार आहेत कदाचित उद्या किंवा परवा येतील.

आज बाबा नाहीये ते बाबा बाहेर गेले, मला असं वाटतं की तुझ्या घरूनही काही प्रॉब्लेम नसेल म्हणजे आपलं लग्न पक्क होणे आहे पण आपल्या लग्न पक्क होण्याआधी मला तुला काय सांगायचं."


"बोला ना काय सांगायचं?"

"हे बघ अपर्णा तू काही महिनेच माझ्या ऑफिसमध्ये काम केले त्यामुळे मला असं वाटते की तुला माझी पर्सनल माहिती नसेल पण मला तुला काही सांगायचे म्हणजे माझ्या आयुष्यातलं खूप मोठा सत्य सांगायचंय कदाचित ते सत्य ऐकल्यानंतर तू लग्नाला नकारही देशील पण तरीही लग्नाचं नातं हे विश्वासावर असतं. मलाही विश्वास तोडून लग्न करायचं नाहीये किंवा तुझा विश्वासघात करायचा नाहीये."


"मानस तू निःसंकोचपणे बोल असं काही नाही आहे, का इतका पॅनिक होतोय?
तू शांत बस दीर्घ श्वास घे आणि मग बोल."

मानस शांत बसला आणि त्याने बोलायला सुरुवात केली.

"अपर्णा हे माझं दुसर लग्न आहे." त्याने डोळे बंद केले, दीर्घ श्वास घेतला.


अपर्णा काय रिऍक्ट करेल याची त्याला भीती वाटत होती. त्यांनी डोळे घट्ट मिटले.


"मानस डोळे उघड. मी तुला नाही म्हणेल असे वाटून घ्यायची गरज नाहीये मला काही प्रॉब्लेम नाहीये तुझे पहिले लग्न आहे की दुसरे लग्न मला काहीच फरक पडत नाही. एक माणूस म्हणून तू चांगला आहेस हे मला माहिती आहे. तेवढे मी तुला ओळखते त्यामुळे इतका विचार करू नकोस. माझ्या बाबतीत तुला माहिती आहे ना काय झालं तू मला स्वीकारू शकतो तर मग मला काय प्रॉब्लेम आहे तुला स्वीकारायला.

हे बघ मानस तुझ्या आयुष्यात काय घडलं काय नाही हे तुला मला सांगायची इच्छा असेल तर तू सांगू शकतोस. माझी काही जबरदस्ती नाहीये. तू माणूस म्हणून एक चांगला मुलगा आहेस मला माहिती आहे आणि माझ्यासाठी तेवढेच पुरे आहे. तुझ्या मनात गिल्ट आणू नकोस किंवा तू माझ्यासोबत लग्न करून काहीतरी चूक करतोयस किंवा माझा आयुष्य खराब करतोय असंही वाटून घेऊ नकोस.

मी मनापासून तुझा स्वीकार करेल माझ्याकडून ह्या नात्यात मी कधीच कमी पडू देणार नाही."


"मला माहित आहे अपर्णा तू खूप चांगली आहे. तुझा स्वभाव कळला मला. मलाच फ्री वाटत नव्हतं. म्हणजे तुला सांगण गरजेचं होतं ना, तुलाही तुझ्या नवऱ्याचा पास्ट माहिती असायला हवा म्हणून हा सगळा आटापिटा होता बाकी काही नाही. आता मला थोडं बरं वाटतंय पण तरी मला तुला ना सगळं सांगायचंय."

मानसला बोलता बोलता दम लागत होता, श्वास वाढत होता त्याचा.

"इट्स ओके मानस तू आत्ता सांगायला हवं अस नाहीये तुला जेव्हा वाटेल तेव्हा सांग. तुझ्यातला ओक्वर्डनेस निघेल ना तेव्हा सांग. तू हा विचार करू नकोस की तुझ्यासमोर तुझी होणारी बायको बसली आहे.
तू हा विचार कर की तुझ्यासमोर तुझी मैत्रीण बसली आहे तेव्हा तू जास्त छान बोलू शकतील."


मानसला काय बोलावं कळेना आणि तो तिथून तसाच निघून गेला. दोन दिवसानंतर मानसच्या घरच्यांचा फोन आला त्यांना मुलगी पसंत आहे एकदा बैठक करायची तेही मानसच्या घरी.

सगळं ठरलं दोन दिवसांनी मानसच्या घरी जाण्याचं ठरलं.

"अपर्णा तू माझी निळी साडी नेसून बघ कशी दिसते त्याच्यावरच्या ब्लाउजला सीलाई करून ठेवते, ब्लाउज तुला जरा सैलसर होईल."


"माई मी स्वरालीला बोलवते ग, ती सांगेल मला.
येईल ती तसही तिच्याकडे कोणीच नाही आहे तिची आई आणि बाबा तिच्या आजीकडे गेलेत. सध्या स्वराली एकटीच आहे. मी तिला फोन केला होता ना की असा कार्यक्रम होतोय तर तिने उद्या सुट्टी टाकली, उद्या सकाळी येईल ती."

"काय ग तुम्ही मुली?"

कुसुमने डोक्यावर हात ठेवला.