Login

सुरमयी प्रवास...भाग 53

Love story
सुरमयी प्रवास...भाग 53

दुसऱ्या दिवशी स्वराली आली.

"हाय अपर्णा."

"हाय अग तुझीच वाट बघत होते मी. तू मला पटापट तयार करून दे. आपल्याला मानसच्या घरी जायचंय."

"हो हो डायरेक्ट सरांवरून मानस वर आलीस. ते तुझे बॉस आहेत ना?"


"माझे नाही.."


"तू आता माझ्या बॉसची होणारी बायको म्हणजे मला तुला मॅडम म्हणावं लागेल."


"स्वराली जास्त चावळटपणा करू नकोस मार खाशील. आणि तू ती कंपनी जॉईन करून जास्त दिवस झालेले नाहीत मी मानसला सांगेल ह." दोघीही हसायला लागल्या.


"माईने ही साडी आणून ठेवली आहे बघ ना कशी दिसेल? तू मला नेसवून दे. आपल्याला एक दीड तासात निघायचे आहे. पटापट तयारी करू आणि घरून निघूया."


स्वरालीने अपर्णाला तयार केलं.

कुसुम, विनायकराव, सोहम, स्वराली, अपर्णा सगळे तयार झाले आणि ते मानसच्या घरी जायला निघाले.

काही वेळाने गाडी एका मोठ्या बंगल्याच्या पुढे येऊन उभी राहिली. विनायकराव कुसुम अपर्णा स्वराली सोहम सगळे गाडीतून उतरले. सगळे त्या बंगल्याकडे बघतच राहिले.

"अपर्णा घर तर खूप मोठा आहे."


"ये स्वरालीताई त्याला घर नाही बंगलो म्हणतात." तिकडून सोहम बोलला.


"ए गप रे तुला कळतं का काही?"

"मला कळतं."

"तुम्ही दोघे भांडू नका."

कुसुमने त्यांना गप्प केलं.

"शांत रहा आपल्याला आत जायचं आहे."


सगळेजण आत गेले,

"नमस्कार नमस्कार नमस्कार."

सगळे घरावर नजर फिरवू लागले, काही वेळात मानस ही आला.

मोठ्या लोकांचं बोलणं सुरू होतं. मानस अपर्णाला बोलला

"चल मी तुला घर दाखवतो."

त्याच्या आईने लगेच नको म्हणून इशारा केला.

"मानस जरा इकडे येशील?"

"हो आई आलोच."


"तू तिला तुझी खोली दाखवू नको."


"का ग आई?"

"तुझ्या खोलीत तिचा फोटो लावला माहितीये ना? आधी तो फोटो काढ आणि मग तू तुझ्या होणाऱ्या बायकोला घर दाखव."


"मी तिला कल्पना दिली आहे आणि आज जर पूर्ण सत्य सांगण्याची वेळ आली ना तर मी सगळं सांगेल."


"काय तू तिला सांगितलं पण."

"हो तिला कल्पना दिली आहे की हे माझे दुसरे लग्न आहे म्हणून. लग्न विश्वासावर असतं आणि मी तिला विश्वास देऊ शकलो नाही तर काही उपयोग.

नवरा बायकोचा नात्यात विश्वास महत्त्वाचा असतो. विश्वासघात आणि खोटारडेपणावर मला माझं नातं नकोय."


"बघ रे बाबा तुला तुझं काय करायचंय ते बघ. पण आज साखरपुड्याची तारीख काढायची ना?"

"हो हो तुम्हा सगळ्यांना जे वाटते ते करा आणि ठरवा."

मानस अपर्णाला घेऊन गेला, त्याने तिला पूर्ण घर दाखवलं त्यानंतर तो तिला तिच्या त्याच्या खोलीत घेऊन गेला. त्याच्या खोलीत तिची मोठी फोटो लावलेली होती.

अपर्णा त्या फोटोसमोर जाऊन उभी राहिली.


"हीच का ती?"

"हो हीच ती."


"अपर्णा तू हा फोटो तुझ्या हाताने काढावा अशी माझी इच्छा आहे."

ती पटकन मानसकडे वळली.

"नाही मी नाही काढणार फोटो, तुमच्या आयुष्यातली पहिली व्यक्ती आहे ना, पहिलं प्रेम आहे तुमचं. मी कसं काय काढू शकते?"


"काही उपयोग नाही त्याचा? ती माझ्या डोळ्यासमोर आली तरी मला त्रास होतो. नको त्या आठवणी जाग्या होतात. मला वेदना बाहेर येतात."

"तरी हा फोटो इथे का आहे?"


"नंतर सांगेन कधी तरी, चल तुला घर दाखवतो."

त्याने तिला संपूर्ण घर दाखवलं.

"चला मग आपण साखरपुड्याची तारीख काढूया का?"


"नाही नको थांबा अपर्णा दुरून ओरडली."


"का काय झालं?"

ती बाबा जवळ जाऊन बसली,

"बाबा साखरपुडा नको डायरेक्ट लग्नाची तारीख काढा." अपर्णाच्या मनातलं विनायकरावांना कळलं.

"मानसची आई अपर्णाची इच्छा आहे की डायरेक्ट लग्नाची तारीख काढावी."

"म्हणजे साखरपुडा नाही करायचा आपण?"

"साखरपुड्याचा विधी हा लग्नाच्या आदल्या दिवशी करूया ना तुमची काही हरकत नसेल तर?"

"पण मी जाणून घेऊ शकते का की काय झालं?"


"मला वाटते मानसरावला सगळं माहिती असेल हो ना मानस राव तुम्हाला माहिती असेल ना?" विनायकरावांनी विचारलं.


"हो आई अगं अपर्णाच्या साखरपुड्याच्या दिवशीच तिच्या आयुष्यात खूप मोठा प्रसंग घडला, दुर्देवी घटना घडली म्हणून तिला त्या दिवसाची भीती वाटते म्हणून ती साखरपुडा नको म्हणतीये, आपण थोडं समजून घेऊया आणि लग्नाची तारीख काढूया."


"ठीक आहे मला काहीच हरकत नाहीये. पंडितजी तुम्ही लग्नाची तारीख बघा आणि जेवढा लवकरचा मुहूर्त असेल ना तेवढा मला सांगा."


अपर्णा आणि मानसच्या लग्नासाठी पुढच्या महिन्यातील तारीख निघाली.


"चला एक महिना आहे आपल्या हातात. आपण तयारीला लागू शकतो."


"हो हो आता आम्ही निघतो."

अपर्णा आणि तिच्या घरचे तिथून निघाले, ते त्यांच्या घरी जाऊन पोहोचले.


"फार मोठ घर आहे मानसचं नाही का हो?"

"छान घर आहे."

"चला आता सगळं चांगलं होईल."

"यातच आनंद आहे." विनायकराव सोफ्यावर बसले.


"तुम्ही सगळे थकलेले असाल ना चहा टाकू का?"

अपर्णा आली.


"नाही ग नको आता, चहा नको. मी स्वयंपाकाला लागते."

कुसुम किचनमध्ये गेली. सगळे फ्रेश झाले तोवर कुसुमने स्वयंपाक आवरला. सगळे जेवले आणि आपापल्या खोलीत जाऊन झोपले.


*****************


मानस खोलीत गेला, मानसने त्याच्या खोलीतून तिचा फोटो काढला. आता मला हा फोटो इथे ठेवता येणार नाही.


'मला तुझा हा फोटो काढावाच लागेल, तुझ्या आईची शेवटची इच्छा होती म्हणून मी हा फोटो लावला होता पण आता माझं लग्न जमलं माझ्या आयुष्याची मी नवीन सुरुवात करतोय त्यामुळे हा फोटो आता मला माझ्या आयुष्यात नकोय. तुझ्या त्या आठवणी पण नको आहेत.' त्याने तो फोटो काढून अडगळीच्या खोलीत नेऊन ठेवला.

त्याला फोटो तिकडे ठेवताना बघून त्याच्या आईला हे सुख समाधान मिळालं.

'चला आता तरी या मुलाचं सगळं चांगलं होऊ दे.' ती मनातल्या मनात देवाला प्रार्थना करू लागली.


तो खोलीत आला, त्याने त्याची कवितेची डायरी काढली तिच्या आठवणीत त्याने कविता वाचली.


"तु असतीस तर
झाले असते
सखे उन्हाचे गोड चांदणे
मोहरले असते मौनातुन
एक दिवाने नवथर गाणे
बकुळुच्या फुलापरी नाजुक
फुलले असते गंधाने क्षण
आणि रंगानी केले असते
क्षितिजावर खिन्न रितेपण
पसरली असती छायांनी
चरणातली म्रूद्शामल मखमल
आणि शुक्रांनी केले असते
स्वागत अपुले हसुन मिश्किल
तु असतीस तर झाले असते
आहे त्याहुन हे जग सुंदर
चांदण्यात विरघळले असते
गगन धरेतील धुसर अंतर …

महेश पाडगावकर


मानसला यांच्या कविता खूप आवडायच्या, कधी एकटा असला की कविता वाचत बसायचा.


दुसऱ्या दिवशी मानस ऑफिसला गेला.

त्याने अपर्णासाठी जॉईन लेटर काढलं, ते अपर्णाला मेल केलं, तिला फोन केला.


"हॅलो अपर्णा मानस बोलतोय."

"हा मानस बोल, मी तुला मेल सेंड केलाय तो वाच आणि ताबडतोब इकडे निघून ये."


"कशाचा मेल आहे?"

"मी तुला जॉइनिंग लेटर पाठवले आहे."


"पण मला असं तडकाफडकी इथून कसं निघता येईल?"

"ते मी मॅनेज करतो तू त्याची काळजी करू नकोस. तू आता ताबडतोब तिथून निघून ये, समोरच काय करायचे ते मी बघतो."


"ओके ओके मी बघते."

तिने जॉइनिंग लेटर बघितलं, ती तिच्या बॉसशी बोलायला गेली.

"मे आय कम इन सर."

"येस."

"सर मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं?"

"तुम्ही काय बोलायला आलात याची कल्पना आहे मला. यु मे लिव्ह."

"तुम्हाला सगळं माहित आहे?"

"हो मला सगळं माहित आहे."


"थँक्यू थँक्यू सो मच."

अपर्णा कॅबिनमधून बाहेर आली.

दीर्घ श्वास घेतला, तिथून निघाली आणि सरळ मानसच्या ऑफिसमध्ये गेली.