सुरमयी प्रवास...भाग 54
अपर्णा मानसच्या ऑफिसमध्ये गेली,
त्याच्या कॅबिनकडे गेली.
त्याच्या कॅबिनकडे गेली.
"मे आय कम?"
त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं. तो तिच्याकडे बघतच राहिला.
"अग ये ना."
ती आत गेली.
"बस ना आणि आता विचारायचं कशाला डायरेक्ट आलीस तरी चालेल."
तिने हलकं स्मितहास्य दिलं आणि ती बसली.
"काय घेणार चहा,कॉफी?"
"नको आता काही नको. मी कामाला सुरुवात करते."
दोघांमध्ये थोडया गप्पा झाल्या आणि ती कॅबिनच्या बाहेर गेली.
तिच्या डेस्क वर जाऊन बसली. तीच लक्ष बाजूच्या डेस्क वर गेलं. तिथे श्वेतांग बसायचा.
तिचा श्वास वाढायला लागला,
ती एकटक त्या सीट कडे बघत होती.
तिचे कलीग तिच्याशी बोलायला आले.
तिचे कलीग तिच्याशी बोलायला आले.
"अपर्णा तू पुन्हा इथे जॉईन केलंस, खूप छान ग तू पुन्हा आली."
अपर्णाचं कुणाच्या बोलण्याकडे लक्षचं नव्हतं.
ती अचानक रडायला लागली.
रडत रडत धावत मानसच्या कॅबिनमध्ये गेली.
रडत रडत धावत मानसच्या कॅबिनमध्ये गेली.
"काय झालं हिला अशी का करत आहे." सगळ्यांची कुजबुज सुरू झाली.
अपर्णा रडत जाऊन त्याच्या टेबलजवळ थांबली.
तिला असं रडताना बघून मानस उठला, तिच्या जवळ गेला.
"काय झालं अपर्णा? अशी का रडत आहे?"
अपर्णाच्या तोंडून शब्दही फुटत नव्हता. तिचा श्वास वाढलेला होता.
"अपर्णा तू इथे बस, बस. शांत हो शांत हो मी तुला पाणी देतो."
मानसने तिला पाणी दिलं, ती कशीबशी पाणी प्यायली.
"काय झालं काय रडतेस तू काय काय होतंय सांग मला बोल माझ्याशी काय होतंय?"
"मानस मी इथे नाही काम करू शकत."
"का काय झालं?"
"मी आता माझ्या डेस्कवर गेले, तुला माहीत आहे ना माझ्या बाजूला श्वेतांग बसायचा. तिकडे बघून माझ्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. मी तिथे नाही बसणार. प्लिज मानस."
"ओके ओके काही हरकत नाही तू इथे माझ्या केबिनमध्ये बसून काम कर काही प्रॉब्लेम नाहीये आपण बघू आधी तू शांत शांत हो."
अपर्णा शांत झाली.
ती त्याच्या कॅबिनमध्ये बसून काम करू लागली.
ती त्याच्या कॅबिनमध्ये बसून काम करू लागली.
दोघांचंही छान काम चाललेलं होतं.
एक दिवस मानस अपर्णाला बोलला,.
"अपर्णा मला तुला काही सांगायचंय, आपण बाहेर जाऊया का कॉफी प्यायला? म्हणजे आपल्यात निवांतपणे बोलणं होईल.
"हो चालेल मला."
दोघे कॉफी शॉपला गेले,
"मला तुला काही सांगायचं आहे, त्या दिवशी जो फोटो माझ्या रूम मध्ये होता ती माझी पहिली बायको होती. आजही मला ती पहिली भेट आठवते. नाही पण नको आता त्या आठवणी नको."
पहिली भेट, पहिल्या परिक्षेसारखी!
उत्तराची वाट पाहणाऱ्या
अगतिक प्रश्नासारखी...
पहिल्या भेटीत..
एकमेकांची नजर चुकवून
एकमेकांना पहायचं असतं,
स्वत: मात्र साळसूदपणे
चेहेऱ्याआड लपायचं असतं!
पहिल्या भेटीत..
अगदी सावधपणे वागायचं असतं,
हसतानाही चेहेऱ्यावरचं
खोटं गांभीर्य जपायचं असतं!
पहिल्या भेटीत..
एकमेकांना समजायचं असतं,
निदान जे समजलं नाही
तेच कळलंय असं दाखवायचं असतं!
पहिल्या भेटीत..
अनेक शंकांचं ओझं वहाय्चं असतं,
'त्याच्या' सोबत आपणही स्वत:ला
अपेक्षांच्या तराजूत तोलायचं असतं!
पहिल्या भेटीत..
मनातून खूप काही बोलायचं असतं,
नेमकं अशाच वेळी ओठांनी
जिभेवरल्या शब्दांना आवरायचा असतं!
पहिल्या भेटीत..
सतत घड्याळ निरखायचं असतं,
एकमेकांच्या काट्यांमध्ये
इतक्या लवकर गुंतायचं नसतं!
पहिल्या भेटीत..
त्याने "काय घेणार?" विचारायचं असतं,
मग ती मेनू कार्ड पाहताना त्यानं
हळूच खिशातलं वॉलेट चाचपायचं असतं!
पहिल्या भेटीत..
'ती' जे काही मागवेल,
ते 'त्यानं' मुकाट्यानं खायचं
असतंनाही आवडलं तरी,
"किती छान डीश आहे!"
असं आवंढा गिळून म्हणयचं असतं.
सी.पी.
"सॉरी मी तिच्याबद्दल विषय काढला."
"नाही मानस त्यात सॉरी कसलं तुला तर माझ्याशी मनमोकळेपणाने बोलावसं वाटतंय तर तू बोल तुझं मन हलक होईल आणि तुला बरं वाटेल.
माझ्या लाईफ बद्दल तुला सगळं माहित आहे या गोष्टीमुळे मी खूप फ्री आहे मला कुठलंच दडपण नाहीये. नाहीतर आज माझी अशी परिस्थिती असती, माझ्या मनावर दडपण असतं. तुझ्याशी बोलायला मला संकोच वाटला असता पण आज बघ मी तुझ्याशी फ्री बोलू शकते, तुझ्या डोळ्यात डोळे टाकून बघू शकते. मी तुला सांगितलं नसतं तर मी कदाचित तुझ्या नजरेला नजर देऊन बोलू शकले नसते पण तुला जर माझ्याशी खरच बोलावसं वाटत असेल ना तर तू सांग नक्की तुलाच बरं वाटेल."
माझ्या लाईफ बद्दल तुला सगळं माहित आहे या गोष्टीमुळे मी खूप फ्री आहे मला कुठलंच दडपण नाहीये. नाहीतर आज माझी अशी परिस्थिती असती, माझ्या मनावर दडपण असतं. तुझ्याशी बोलायला मला संकोच वाटला असता पण आज बघ मी तुझ्याशी फ्री बोलू शकते, तुझ्या डोळ्यात डोळे टाकून बघू शकते. मी तुला सांगितलं नसतं तर मी कदाचित तुझ्या नजरेला नजर देऊन बोलू शकले नसते पण तुला जर माझ्याशी खरच बोलावसं वाटत असेल ना तर तू सांग नक्की तुलाच बरं वाटेल."
"बोलायला तर खूप काही आहे पण त्रास होतो मला त्या आठवणींचा. त्या आठवणी नकोश्या वाटतात. तिच्यासोबत घालवलेला एकेक क्षणाचा त्रास होतो मला. त्या आठवणी जाग्या झाल्या तरी अंगावर काटे येतात. नको वाटतं सगळं नको वाटतं."
"ओके मानस शांत रहा, नको वाटतं ना तुला? नको बोलूस नको आठवू असू दे तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस प्लिज रिलॅक्स."
दोघे कॉफी प्यायले, त्यानंतर मानस निघून गेला. अपर्णाही तिच्या घरी गेली.
अपर्णा घरी गेल्या गेल्या कुसुमच्या खोलीत गेली.
"मला तुला काही सांगायचं आहे."
"हा बोल ना."
"नाही मी आता तुला जे काही सांगणार आहे ना ते तू नीट शांतपणे ऐक आणि हे बाबाला काही सांगू नकोस."
"अग बोल ना एवढं काय महत्वाचं आहे."
"माई माझ्या आधी मानसच्या आयुष्यात कुणीतरी होतं."
"म्हणजे?"
"म्हणजे त्याचं पहिलं लग्न झालेल आहे, त्याची पहिली बायको कदाचित त्याला सोडून गेलेली असावी. त्याची इच्छा आहे मला सांगायची पण तो सांगू शकत नाही आहे. त्याला त्रास होतो त्या आठवणीने. आज आम्ही भेटलो ना तेव्हा त्याने मला थोडी थोडी कल्पना दिली आणि त्या दिवशी त्याच्या खोलीत गेले तर एक फोटो लावलेला होता ती तीच होती."
"बापरे, काय बाई एक एक मुली असतात. बिचाऱ्या मानसचं आयुष्य उध्वस्त करून गेली."
"माई, ती दिसायला तर अगदी चांगली दिसत होती.
तिच्यामुळे मानसला खूप त्रास झाला. आज तिच्या आठवणी जरी जाग्या झाल्या तरी त्याला त्रास होतो. आपण भेटलो बोललो त्याला सांगायचं होतं पण बिचारा काही बोलूच शकला नाही.
माई तू कुणाला सांगू नको, मी फक्त तुला सांगितलं."
"काळजी करू नकोस."
दिवस सरकत होते.
अपर्णा आणि मानसच्या लग्नाची तयारी सुरू झाली.
दोघांची कपड्याची खरेदी झाली.
"अगं काय ते आटपा ना, काही राहिलंय आता घ्यायचं? हे काय नऊवारी आणि लेहंगा दोन्ही?"
अपर्णाच्या लग्नाच्या खरेदीच्या लिस्टमध्ये पारंपरिक आणि वेस्टर्न अशा दोन्ही कपड्यांच्या प्रकारातलं कॉम्बिनेशन पाहून मानसच्या आई जरा भारावल्याच होत्या. अपर्णा तिच्या लग्नात सकाळी विधींच्या वेळी नऊवारी नेसणार होती तर, रिसेप्शनला भरजरी लेहंगा असा एकदम हटके वेअर तिने निवडला होता.
कुसुम तिला एक एक गोष्ट सांगत होती.
तुळशीचं लग्न लागलं की लग्नाच्या मुहूर्तांना सुरुवात होते, ती थेट मे महिन्यापर्यंत. मग, सुरू होते नवरीची कपडे-दागिन्यांची खरेदी. नवरा-नवरी म्हणजे समारंभातल्या उत्सवमूर्ती साहजिकच सेण्टर ऑफ अट्रॅक्शन. आयुष्य बदलून टाकणाऱ्या या लग्नात आपण सर्वात सुंदर दिसावं, असं प्रत्येक मुलीला वाटणं साहजिक आहे. यामुळेच खास आपल्यासाठी असलेल्या समारंभात ती मनसोक्त नटून घेते.
अपर्णाने पण तेच केलं.
इथूनच कपडे खरेदीला सुरुवात होते. 'जुनं ते सोनं' या म्हणीप्रमाणे पुन्हा एकदा तमाम नवऱ्या मुली नऊवारी साडीकडे वळत आहेत. नऊवारीचं लेणं इतकं पसरलंय, की आता फक्त नवरी मुलगीच नाही तर तिच्या करवल्याही सगळ्या हॉलभर नऊवारीत विनासंकोच मिरवताना दिसतात.
"झालंच नाही का तुमचं?"
"अहो तुम्ही तिला अजिबात टोकू नका, सगळं तिच्या मनाप्रमाणे होऊ द्या. तिला हौसमौज करू द्या हो."
"मी काहीही बोलणार नाही आज." विनायकराव हसल्याने सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरलेला होता.
सोहम उत्साही होता, स्वराली उत्साही होती.
बघता बघता लग्नाचा दिवस जवळ यायला लागला होता.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा