सुरमयी प्रवास...भाग 55
लग्नाची सगळी तयारी झालेली होती.
संगीतचा कार्यक्रम हॉलमध्ये आयोजित केला होता. आधी मुलीकडचे लोक आले. अपर्णा तयार होत होती. तिने सुंदर अनारकली ड्रेस घातला होता. त्यावर मॅचिंग ज्वेलरी घातलेली होती. केसांची सुंदर हेअरस्टाईल केली होती.
ती खूप सुंदर दिसत होती.
ती खूप सुंदर दिसत होती.
तिच्या मैत्रिणी सोबत होत्या.
थोड्या वेळाने मानस कडचे लोक आलेत. सगळे पाहुणे मंडळी एकत्र भेटले. एकमेकांची ओळख झाली.
मानस अपर्णा जवळ आला. दोघांची नजरा नजर झाली आणि दोघे एकमेकांकडे बघतच राहिले. त्यांची नजर तिथून हटत नव्हती. काही वेळाने तिथे स्वराली आली.
"अपर्णा अपर्णा तुला माई बोलवते आहे."
अपर्णाचं लक्ष नव्हतं, दोघेही एकमेकात गुंतून गेले होते. स्वरालीने जोरात आवाज काढला तेव्हा अपर्णा आणि मानस भानावर आले.
"काय?" तिने अपर्णाकडे बघितलं
अपर्णाने लाजून खाली मान घातली.
"तुला माई बोलवते आहे."
"हो येते मी."
अपर्णा जायला वळली तस मानसने तिचा हात पकडला.
"खूप सुंदर दिसतेस." तिने लाजून खाली मान घातली.
"आय लव यु." ती काही न बोलता तिथून निघून गेली.
समोर सायलेंट म्युझिक वाजत होतं.
कार्यक्रमाला सुरुवात झाली.
सुरुवातीला सगळे कपल सोबत नाचत होते. त्यानंतर बाकीचे बसले अपर्णाला समोरच बसवण्यात आलं. थोड्यावेळाने वेगळं म्युझिक सुरु झालं, मानसचा सरप्राईज डान्स होता.
तेरे संग यारा, खुश रंग बहारा
तू रात दीवानी, मैं ज़र्द सितारा
ओ करम खुदाया है, तुझे मुझसे मिलाया है
तुझ पे मर के ही तो, मुझे जीना आया है
ओ तेरे संग यारा, खुश रंग बहारा
तू रात दीवानी, मैं ज़र्द सितारा
ओ तेरे संग यारा, खुश रंग बहारा
मैं तेरा हो जाऊँ, जो तू कर दे इशारा
कहीं किसी भी गली में जाऊँ मैं
तेरी खुशबू से टकराऊँ मैं
हर रात जो आता है मुझे,
वो ख्वाब तू तेरा-मेरा मिलना दस्तूर है
तेरे होने से मुझमें नूर है
मैं हूँ सूना सा इक आसमां,
महताब तूओ करम खुदाया है,
तुझे मैंने जो पाया है
तुझ पे मर के ही तो,
मुझे जीना आया है
ओ तेरे संग यारा...ओ तेरे बिन अब तो,
ना जीना गँवारा
मैंने छोड़े हैं बाकी सारे रास्ते
बस आया हूँ तेरे पास रे
मेरी आँखों में तेरा नाम है, पहचान ले
सब कुछ मेरे लिए तेरे बाद है
सौ बातों की इक बात है
मैं न जाऊँगा कभी तुझे छोड़ के,
ये जान लेओ करम खुदाया है,
तेरा प्यार जो पाया है
तुझ पे मर के ही तो, मुझे जीना आया है
ओ तेरे संग यारा...
मैं बहता मुसाफिर, तू ठहरा किनारा...
तो तिच्याकडे बघून नाचत होता ती अगदीच लाजली, तिने तिच्या मैत्रिणीचा हात घट्ट धरून ठेवला होता.
तो तिच्या पुढ्यात येऊन उभा राहिला.
त्यांने तिला उचलून घेतलं आणि स्टेजवर घेऊन गेला.
तिला खाली उतरवलं तिच्या खांद्यावर हात ठेवला, एक हात कमरेला लावला. दोघांची नजरानजर झाली.
तिला खाली उतरवलं तिच्या खांद्यावर हात ठेवला, एक हात कमरेला लावला. दोघांची नजरानजर झाली.
धीरे-धीरे से मेरी ज़िन्दगी में आना
धीरे-धीरे से मेरे दिल को चुराना
तुमसे प्यार हमें कितना है जान-ए-जाना
तुमसे मिलकर तुमको है बताना
जबसे तुझको देखा दिल को कहीं आराम नहीं
मेरे होंठों पे इक तेरे सिवा कोई नाम नहीं
अपना भी हाल तुम्हारे जैसा है साजन
बस याद तुझे करती हूँ और कोई काम नहीं
बन गया हूँ मैं तेरा दीवाना
धीरे-धीरे से दिल को चुराना...
तुने भी अक्सर मुझको जगाया रातों में
और नींद चुरायी मीठी-मीठी बातों में
तुने भी बेशक मुझे कितना तड़पाया
फिर भी तेरी हर एक अदा पे प्यार आया
आजा-आजा अब कैसा शर्माना
धीरे-धीरे से दिल को चुराना...
सगळे टाळ्या वाजवून चिअरअप करत होते.
गाणं संपलं आणि सायलेंट म्युझिक सुरु झालं.
"अपर्णा तू खूप सुंदर दिसतेस, आज मला फक्त तुला बघावस वाटतंय. आय लव यू आय लव यू अपर्णा."
अपर्णा काहीच बोलत नव्हती, तिने लाजून खाली मान घातली होती.
"अपर्णा बोल ना काहीतरी. तुला माहितीये मला काय ऐकायचे आहे, बोल ना अपर्णा प्लिज."
"सगळे आपल्याकडे बघतायेत."
"तर काय झालं? आपला आवाज कुणालाही जाणार नाही आणि गेलाय तरी काय फरक पडणार आहे आपण होणारे नवरा बायको आहोत. म्हण ना प्लिज."
तिने घट्ट डोळे मिटले, दोन्ही हात त्याच्या हातात दिले.
"आय... आय लव... आय लव यु टू."
संगीतचा कार्यक्रम झाला, त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम झाला.
सगळे आपापल्या खोलीत निघून गेले. अपर्णाही तिच्या खोलीत गेली.
तिने चेंज केलं आणि ती फ्रेश झाली. तोवर स्वराली आणि कुसुम खोलीत आल्या.
"काय ग फ्रेश झाली?"
"हो माई आज खूप थकले मी, खूप पाय दुखतायेत माझे."
"झोप तू आराम कर, उद्या सकाळी लवकर उठायचं ना?"
"हम्म."
ती झोपणार तितक्यात तिचा फोन वाजला.
"हॅलो."
"हॅलो अपर्णा काय करतेस?"
"काही नाही झोपत होते."
"थोडा वेळ बाहेर ये ना."
"माझ्या खोलीत माई आहे, पॉसिबल नाहीये."
"अगं त्या झोपल्यानंतर ये ना थोड्यावेळ प्लिज."
त्यांचं बोलणं सुरू असतानाच कुसुम बोलली.
"कुणाचा फोन आहे गं?"
"माझ्या मैत्रिणीचा आहे."
"हो का लवकर बोल आणि झोप, सकाळी लवकर उठायच आहे."
"हो हो माई."
कुसुम तिच्या कामाला लागली.
"आला का आवाज, आता पॉसिबल नाही आहे."
"त्या झोपल्यानंतर ये प्लिज नाही म्हणू नकोस ना. मला ना तुला बघायचंय, मला बोलायचं तुझ्याशी."
"मिस्टर मानस दोन दिवसानंतर आपले लग्न होणारच आहे तेव्हा किती बोलायचे ते बोला आता नको."
"प्लिज प्लिज प्लिज."
"ओके ओके मी बघते."
कुसुम झोपल्यानंतर अपर्णा हळूच खोलीतून बाहेर गेली. माणस बाहेर उभा होताच.
"का बोलावलंय इथे?"
"मला तुला बघावंस वाटत होतं."
"अरे पण आपण सोबत होतो ना इतका वेळ."
"तरी."
"हे काय नवीन, कुणी बघितलं तर?"
"कुणी बघणार नाही."
त्याने तिचा हात पकडला, तिला जवळ खेचलं.
त्याने तिला मिठीत घेतलं, तिला घट्ट कवटाळलं.
"मानस प्लिज सोड ना कुणीतरी बघेल मला जाऊ दे प्लिज."
"नाही, मी तुला जाऊ देणार नाही, सकाळपर्यंत मी तुला माझ्या मिठीतंच ठेवणार आहे."
असं बोलताच ती घाबरली.
तिने जबरदस्तीने स्वतःला बाहेर काढत त्याला दूर ढकलंल.
"तुला कळत नाहीये का? जाऊ दे ना मला कोणी बघितलं तर तुला कोणी बोलणार नाही सगळे मलाच बोलतील."
"अग तू इतकी सिरीयस का झालीस? आय एम जोकिंग."
असं म्हणताच तिने दीर्घ श्वास घेतला.
"तुला गंमत वाटते का रे सगळी, किती घाबरली होते मी."
"चिल यार गंमत केली मी, इतकं काय घाबरतेस?"
दोघे थोड्यावेळ गप्पा मारत बसले, त्यानंतर आपापल्या खोलीत निघून गेले.
काही वेळात त्याने तिला मॅसेज टाकला.
"नशा था तेरे प्यार का
जिसमे हम खो गए
हमें भी नही पता चला
कब हम तेरे हो गए"
ती हसली.
तिने मॅसेज टाकला,
"नौटंकी."
तो हसला.
"आय लव्ह यू."
"मार खाशील."
"आय लव्ह यू."
"हम्म.."
"आय लव्ह यू."
"आय लव्ह यू टू मानस."
"हाय हाय मै तो मर जावा."
"फोन ठेव आता आणि झोप, बाय."
"बाय." तो हसला.
अपर्णाने मोबाईल बाजूला ठेवला आणि ती झोपली.
क्रमशः
