Login

सुरमयी प्रवास...भाग 56

Love story
सुरमयी प्रवास...भाग 56

पहाटे सगळे लवकर उठले, आवराआवर झाली.
छोटे छोटे कार्य निपटल्यानंतर मेहंदीच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार होती.

"तुझा ड्रेस रेडी आहे ना?" कुसुमने काळजीने तिला विचारलं.

"हो माई रेडी आहे, सगळं तयार आहे माझं. मी तयार होतेच आहे. स्वराली दिसत नाहीये."

"अग ती खाली त्या मुलींना आवाज द्यायला गेली आहे, ती आली की लगेच तिला सांग तुला रेडी करायला आणि तू रेडी झाली की खाली ये. मी तोवर खाली जाते आहे."

"हो हो मी आलेच."

स्वराली आली.

"थँक गॉड तू आलीस, कधीची वाट बघत आहे मी."

"करून देते तुझी तयारी."

दोघीही हसल्या.

"तुला माझ्या मनातलं लगेच कळतं." अपर्णा तिला पाठी मागेहून बिलगली.

"तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस ना. पण आता तू मला सोडून जाणार."

"वेडी आहेस का तू? लग्नानंतरही मी तुझ्याजवळच राहणार आहे."

दोघीही एकमेकींना बिलकुल रडायला लागल्या, काही वेळाने शांत झाल्या.


स्वरालीने तिला तयार केलं.

दोघी खाली हॉलमध्ये गेल्या.

मेहंदीच्या कार्यक्रमाची लगबग सुरू होती. तो लेडीज कार्यक्रम होता. तिथे जेंट्सला एंट्री नव्हती पण हीच गोष्ट मानस आणि त्याच्या मित्रांना कळली होती.

"काय यार आपल्याला तिथे जाता येणार नाही." मानसचा मित्र बोलला.

"आपण तर तिथे जाऊया. आपणही तो कार्यक्रम बघूया आणि एन्जॉय करूया." मानस


"अरे पण तिथे जायचं कसं? सगळ्या लेडीज असणार आहेत, त्यांना जराजरी शंका आली ना आपल्याबद्दल तर ते आपल्याला ठोकायला कमी करणार नाही." त्याचा दुसरा मित्र बोलला.

"आपण जायचं ठरलंय ना मग बघू आपण काय करायचं ते." मानस

मानस आणि त्याच्या मित्रांमध्ये बोलणं सुरू होतं.

काहीही झालं तरी मग कार्यक्रमाला जाणारच असं ठरलं होतं त्यांचं.

दोन्ही बाजूच्या स्त्रियांसाठी एक छान हॉल बुक केलेला होता. हिरव्या रंगाचा स्लीवलेस ड्रेस घालून अपर्णा खाली आली. छान लाल टिकली, लिपस्टिक लावलेली, थोडी मॅचिंग ज्वेलरी घातलेली होती. आज विशेष तयारी नव्हती पण साध्या तयारीतच ती खूप सुंदर दिसत होती.

मेहंदी काढणाऱ्या आर्टिस्ट आलेल्या होत्या. त्या सगळ्या बायांच्या मध्ये बसलेल्या होत्या.


"चला आता कार्यक्रमाला सुरुवात करू आपण."

अपर्णा बसलेली होती. तिच्या हातावर मेंदी काढायला सुरुवात झाली.

तेवढ्यात हॉलच्या समोर आवाज आला.
कुणीतरी टाळ्या वाजवत होतं.

सगळ्यांनी बघितलं.

"किन्नर दिसत आहेत, पैसे मागायला आलेत की काय?"

मानस आणि त्याचे मित्र साड्या नेसून आत मध्ये आलेले होते. डोक्यांवर पदर घेतला होता. सगळे एकमेकांकडे बघत होते.
सगळ्या बाया त्यांच्याकडे बघत होत्या.

"या किन्नर अश्या चेहरा झाकून कश्या आल्या?"

"तेच तर कळत नाही आहे."

"पैसे घेतल्यानंतर जातात की नाही ते बघूया."

"हो बघावंच लागेल."

तेथील बाया एकमेकींशीबोलत होत्या.

तो येवून अपर्णा जवळ बसला.

त्याने तिचा हात पकडला, तिला थोडं ऑकवर्ड झालं.

"तुम्ही थोडे दूर बसा ना प्लिज."

"दूर कशाला? तुझा हात पकडू दे, मेहंदी तर बघू दे तुझ्या हातावरची."

त्याच्या बोलण्यावर तिला काहीतरी संशय आला. तिने हळूच त्याच्या डोक्यावरचा पदर बाजूला केला आणि तिला त्याचा चेहरा दिसला.

"तू? तू इथे काय करतोयस?"

"तुला बघायला आलोय."

"वेडा आहेस का तू?"


"तुझी मेहंदी बघायला आलोय."


तिने माईकडे बघितलं,

"माईला कळलं ना तर काय होईल कळतंय का तुला? इथे सगळ्या बाया जमलेल्या आहेत. कुणी तुला ओळखलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल."

"मी एकटाच नाही आहे, माझे मित्र पण आहेत."

"धन्य आहेस तू आणि तुझे मित्रही."

ती हळूहळू त्याच्याशी बोलत होती.

"मेहंदी पूर्ण झाल्याशिवाय मी इथून जाणारच नाहीये. माझे सगळे मित्र समोर बसले आहेत."

"अरे देवा तू नक्की घोळ घालणार आहेस."

कुसुम समोर गेली त्या बायांच्या हातात पैसे दिले.


"जा तुम्ही आता, झालं तुमचं काम."


"नाही नाही नवरीच्या हाताची मेहंदी तर बघू द्या."
त्यातली एक बाई बोलली.

"अरे तुमच्या आवाजाला काय झालं?"

"नाही माझा आवाज लहानपणापासूनच असा आहे."

"पण तुम्ही तर कधी चेहरा झाकून येत नाही, आज कसे काय डोक्यावर पदर घेऊन आलात."

"बाहेर खूप ऊन होतं ना म्हणून आम्ही डोक्यावर पदर घेतला होता, उन्हामुळे चेहरा कालवंडलाय, विद्रुप झालेला आहे. म्हणून आम्ही असा डोक्यावर पदर घेऊन चेहरा झाकून ठेवलाय उगाच आमच्या चेहरा बघून कुणाचा दिवस खराब झाला नको ना म्हणून."


त्यांचं बोलणं ऐकून काही बाया हसायला लागल्या पण काहींना शंका आली. त्यांनी त्यांचा डोक्यावरचा पदर काढण्याचा प्रयत्न केला.

त्याच्या मित्राची घाबरगुंडी झाली आणि ते तिथून पळायला लागले.

तसा मानसही लगेच उठला आणि धावत पळत गेला. सगळ्यांच्या लक्षात आलं की लबाड मुलंच होती.
सगळ्या बाया हसायला लागल्या.


मेहंदी काढण सुरू होतं आणि काही बाया गाणे म्हणत होत्या काही मुली नाचत होत्या. सगळ्यांची धमाल सुरू होती. काही वेळाने मेहंदीचा कार्यक्रम पूर्ण झाला. त्यानंतर सगळे आपापल्या खोलीत निघून गेले.

थोडावेळ आराम करून सगळे जेवणासाठी खाली उतरले. पाहुणे मंडळींची सगळ्यांची जेवणे झाली.

स्वराली आणि अपर्णा बराच वेळ गप्पा मारत बसल्या होत्या.

"स्वराली तुझं काय ग तू कधी लग्न करतीयेस?"

"माझं नशीब कुठे ग माझ्या आयुष्यात कुणीच नाही आहे एक होता तो ही निघून गेला."


"अग पण आता लग्न करणारच नाही आहेस का तू?"

"सध्या तरी विचार नाहीये आईला बरं नसतं तिला एकटीला टाकून कुठे जाणार मी?"


"ते ही खरंच आहे ग, पण ठीक आहे ना समज तुला जर एखाद चांगल स्थळ आलं तर तू तुझी अट सांग ना की मी माझ्या घरी माझ्या आईला आणेल किंवा माझा पगार मी माझ्या आईला देईल असं काहीतरी बघ ना."


"जमलं तर तेही करेल मी. तुझं सगळं छान होतंय ना यातच मला खरंच खूप आनंद आहे गं." स्वरालीने तिला मिठी मारली.


"चल झोप उद्या सकाळी हळदीचा कार्यक्रम आहे ना बांगड्या, हळद सगळ होणार उद्या."

सकाळ पासून हळदीची गडबड होती. अपर्णाने पिवळ्या साडी वर स्लीवलेस ब्लाऊज घातलेला होता. फुलांचा साज घातला होता. सुंदर तयारी झाली होती.

दोघांची हळद एकत्र होणार होती.

व्हाइट कुर्ता घालून मानस रुबाबदार दिसत होता. आधी मानसची हळद होणार होती. त्याची उष्टी हळद अपर्णाला लागणार होती.

फोटो ग्राफर दोघांचे छान फोटो काढत होते. दोघे सोबत रमले होते.

"अपर्णा खूप सुंदर दिसतेस."

"तू पण छान दिसतोस."

"हे क्षण लवकर संपावेत आणि तू माझ्या जवळ यावीस नेहमीसाठी असं वाटतंय मला."


"आता तो क्षण जवळ येतोय, पण मानस जशी वेळ सरकत चाललीये ना तो क्षण जवळ येतोय ना माझे हार्टबीट्स वाढतायेत, धडधड वाढते आहे."


"मला घाबरायला लागलीस की काय?"

"मी तुला घाबरून काय करू?" तिने त्याच्या हातावर मारलं.


"बघ लग्नाच्या आधीच तू तुझ्या नवऱ्याला मारतीयेस आईला जर कळलं ना तर काही खरं नाही आहे तुझं."

"मानस चावळटपणा बंद कर." दोघांच हळूहळू बोलणं सुरू होतं.

हळदीचा कार्यक्रम सुरू झाला.

मानसला हळद लागली, मानसच्या चेहऱ्यावर हळद लागल्यानंतर त्याचा चेहरा अजून खुलायला लागला होता. अपर्णा त्याच्याकडे बघतच राहिली.

त्याची हळद झाल्यानंतर त्याची उष्टी हळद तिला लावण्यात आली.

स्वराली, कुसुम, सगळे तिला हळद लावत होते. अपर्णाच्या डोळ्यात पाणी होतं. तिचं मन भरून आलेलं होतं.

हळदीचा कार्यक्रम संपला.

सगळ्यांनी आवरलं आणि आपल्या आपल्या खोलीत गेले.