सुरमयी प्रवास...भाग 57
लग्नाचा दिवस उजाडला.
सगळीकडे लगबग सुरू होती.
सगळीकडे लगबग सुरू होती.
संपूर्ण हॉल फुलांनी सजलेला होता, सगळीकडे रोषणाई होती, मधुर संगीत सुरू होत. पाहुण्यांची चहेलपहेल सुरू होती. लग्नाची संपूर्ण तयारी झालेली होती, नवरदेव घोड्यावर बसून आला.
स्वराली त्याला बघून लगेच अपर्णाजवळ आली.
"अपर्णा तुझा मानस घोड्यावर बसून आलाय."
"काय?"
"येस, बघ तर कसा डॅशिंग दिसतोय."
अपर्णाने खिडकीतून बघितलं.
'खूप छान दिसतोय.' ती मनातल्या मनात बोलली.
वाजत गाजत नवरदेवाची एन्ट्री झाली, गेट जवळ नवरदेवाचं औक्षण झालं.
त्यानंतर नवरदेव आत आला.
काही वेळाने नवरीची ग्रँड एन्ट्री झाली. आतिषबाजी झाली, फटाके फुटले.
नवरी नवरदेव समोरासमोर उभे झाले.
दोघांची नजरानजर झाली.
दोघांनी एकमेकांना स्माईल दिली.
"पंडितजी मंगलाष्टके सुरु करा.”
मंगलाष्टके सुरू झाली.
दोघांची नजर हटत नव्हती.
मंगलाष्टके संपली, दोघांनी एकमेकांना हार घातले.
अपर्णा आणि मानसचं लग्न पार पडलं. जोरजोरात ढोल वाजला.
सप्तपदी झाली, वचनांची देवाणघेवाण झाली. दोघांनीही एकमेकांना वचने दिली.
सगळा कार्यक्रम झाल्यानंतर अपर्णाच्या पाठवणीचा क्षण आला. अपर्णा आणि मानसने त्याच्या आईला नमस्कार केला. त्यानंतर त्या दोघांनी कुसुम आणि विनायकरावांना नमस्कार केला.
ती कुसुमला बिलगून खूप रडली, तिला बालपणीच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. खरी आई नव्हती पण त्यानंतर कुसुम सोबत घालवलेले एक एक क्षण डोळ्यासमोर यायला लागले.
अपर्णा आणि कुसुमचं बॉंडिंग खूप छान होतं, दोघीही एकमेकींना समजून घ्यायच्या.
“काळजी घे बाळा, स्वतःची पण आणि मानसरावांचीपण.” अपर्णाने होकारार्थी मान हलवली.
त्यांनतर अपर्णा विनायकरावंजवळही खूप रडली. दोघांचं एकमेकांवर खूप जीव होता. अपर्णा त्यांच्याशी सगळं शेअर करायची,अगदी लहान लहान गोष्टी त्यांना सांगायची.
अपर्णा सोहमजवळ आली.
"आता तरी अभ्यासाकडे लक्ष दे, आणि सकाळी लवकर उठत जा, आता मी असणार नाही आहे तुला उठवायला."
"तायडा नको का असं बोलू." तो रडायला लागला.
"मोठा कधी होणार आहेस, आता लहान नाहीस तू." ती ही रडायला लागली.
"तुझ्यासाठी मी लहानच आहे."
दोघेही एकमेकांना बिलगले आणि ढसाढसा रडायला लागले.
बहीण भावाच असं प्रेम बघून तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
आता ती स्वराली जवळ आली.
"आठवण ठेवणार आहेस ना की विसरशील मला."
"वेडी आहेस का स्वराली, तू माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहेस, तुला कसं विसरेन मी. तू असा विचार देखील कसा करू शकतेस."
दोघींनी एकमेकींचा हात पकडला आणि रडायला लागल्या.
अपर्णा आणि मानस जायला निघाले. सगळ्यांनी हसऱ्या चेहऱ्याने त्यांना निरोप दिला.
दोघेही गाडीत बसले, अपर्णा अगदी शांत बसली होती, तिच्यासाठी हे सगळं नवीन होतं. ज्याची स्वप्न बघितली होती, तो तर आता डोळ्यासमोरही नव्हता, ज्याच्यासोबत आयुष्याची स्वप्न रंगवली होती, तो तर अर्ध्यावरती सोडून गेला होता. तिच्या डोक्यात विचार चक्र सुरू होते.
तिला आज श्वेतांग आठवत होता.
तिला आज श्वेतांग आठवत होता.
“अपर्णा काय विचार करत आहे? अग इतकं टेन्शन घेऊ नको. मी तुला आनंदात ठेवेल, तू काळजी करू नको. तुला काहीच त्रास होणार नाही.” अपर्णा गप्प होती.
मानस बोलत होता आणि ती शांत ऐकत होती. काही वेळाने गाडी मानसच्या घरासमोर येऊन थांबली.
मानसच्या आईने गृहप्रवेशाची संपूर्ण तयारी करून ठेवलेली होती.
ती दारात औक्षणाचं ताट घेऊन आली,
दोघांना ओवाळलं.
“अग थांब अशीच येऊ नको, हा माप ओलांडून ये." मानसच्या आईने तिला सांगितलं.
अपर्णाने माप ओलांडला आणि तिचा गृहप्रवेश झाला.
"अपर्णा एक उखाणा घे."
उंबरठ्यावरती माप देते,
सुखी संसाराची चाहूल
मानसच्या जीवनात टाकले मी,
आज पहिले पाऊल
सुखी संसाराची चाहूल
मानसच्या जीवनात टाकले मी,
आज पहिले पाऊल
तिने उखाणा घेतला तसं सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.
सगळे विधी झाले.
सत्यनारायणची पूजा झाली.
अपर्णा हळूहळू मानसच्या घरी रुळायला लागली, मानस सोबत मनमोकळेपणाने बोलायला लागली. सगळे छान सुरु होतं. दोघांनी ऑफिस जॉईन केलं, दोघेही सोबत जायचे.
एक दिवस कुसुमनेने अपर्णाला फोन केला,
“हॅलो अपर्णा कशी आहेस?”
“मी बरी आहे. तू कशी आहेस आणि बाबा, सोहम कसे आहेत?”
“आम्ही छान आहोत पण तुझी कमी जाणवते ग, तू होतीस तर घर भरल्यासारखं वाटायचं आता रिकामं वाटतं, आम्ही आमच्या कामात व्यस्त असतो पण तरी तू नाहीस तर घर खायला उठतं."
“माई तुही तुझं काही काम करत जा ना?”
“अग काम झाल्यानंतर बराच वेळ असतो मला, आता या वयात वेगळं काय काम करणार आहे मी?”
“अग माई तुझे छंद जोपास, तुला जे जे आवडतं ते कर. कसं असत ना माई आपण आपल्या कामात इतके व्यस्त होतो की आपल्याला आपले छंद जोपासायला वेळही मिळत नाही, आपण तर विसरूनही जातो की आपल्याला काय आवडतं? आता तुझ्याकडे वेळ आहे ना तर तू तुझ्या आवडीच्या गोष्टी कर.”
“बापरे किती कठीण काम सांगितलंस तू मला?” अस म्हणून ती हसायला लागली.
“अग त्यात हसण्यासारखं काय आहे? अच्छा मला सांग तुला काय काय आवडतं?” कुसुम विचार करत बसली.
"माई इतका का विचार करतेस? अग मी फक्त तुझी आवड विचारली?”
“विचार तर येईलच ना ग, आज पहिल्यांदा मला कुणीतरी असं काही विचारलंय. खरं सांगू मला काय आवडतं याचा मी कधी विचार केलाच नाही, आधी काही आवडत असेलही पण ती आवड काळासोबत मागे गेली. कधी मला विचार करायला वेळच मिळाला नाही, किंवा काही कारणास्तव ते मागे राहिलं. आता तर आवड ही आठवत नाही” कुसुम बोलता बोलता उदास झाली.
........................
मानसने बाहेर फिरायला जाण्याचा विचार केला, अपर्णाला बर वाटेल अस त्याला वाटलं.
“अपर्णा मी विचार करत होतो की आपण बाहेर काही दिवस फिरायला जायचं का? म्हणजे बघ तुला बर वाटणार असेल तर, सगळ कसं घाईघाईने, गडबडीत झालं ना. बाहेर थोडा टाइम स्पेन्ड करूया बर वाटेल.”
“पण मानस ऑफिस?” ती पुढे काही बोलणार मानस बोलला.
“अपर्णा सध्या ऑफिसला सुट्टी."
"अरे पण." बोलता बोलता ती नर्व्हस झाली.
तिच्या चेहऱ्यावरचा नर्व्हसनेस मानसला दिसत होता. अपर्णा सोफ्यावर बसली, मानस तिच्या बाजूला जाऊन बसला, तिचा हात हातात घेतला.
“अपर्णा मला माहित आहे आता तुला काय वाटतय, तुझ्या मनाची अवस्था मला काळतेय. हे बघ तुला जेव्हा काँफोर्ट वाटेल ना तेव्हा तू मला सांग, मी वाट बघेल. हे बघ अपर्णा तू स्वतःला एकट समजू नकोस, मी सदैव तुझ्यासोबत असेल, हे घर आता तुझं आहे,तुझं हक्काचं घर. खर तर आतापर्यंत ह्या चार भिंती होत्या पण आता या घराला घरपण येईल. तू तुझ्या प्रेमाने, प्रेमाच्या ओलाव्याने या चार भितींना घर बनवशील,एक सुंदर घर..” अपर्णाने फक्त स्मित हास्य केलं.
“अपर्णा तू रात्रीपर्यंत विचार करू शकतेस, मला ऑफिसचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुझा जर होकार असेल तर आपण जाऊया. काही दिवस एकमेकांसोबत वेळ घालवल्यानंतर तुलाही बरं वाटेल. तुलाही फ्रेश वाटेल. आपल्याला एकमेकांशी बोलता येईल, एकमेकांना समजून घेता येईल. मला माहिती आहे तुला थोडा वेळ लागेल पण प्रयत्न करायला काय हरकत आहे.”
अपर्णाने थोडा विचार केला.
"आपण जाऊयात. मी पॅकिंग करायला घेते.” अपर्णा उठून जायला निघाली.
“हो आणि माझी मदत लागली तर सांग.” मानसने तिच्याकडे बघून स्माईल दिली.
“हो तुझे कपडे तू काढून ठेवा, मग मी आपल्या दोघांची पॅकिंग करून घेते.” असं म्हणून अपर्णा तिच्या खोलीत निघून गेली.
मानस मात्र अपर्णा बद्दलच विचार करत राहिला.
दुसऱ्या दिवशी सकाळी मानसने तिकीट बुक केले, आईला सांगितलं तिलाही खूप आनंद झाला, आईचा आशीर्वाद घेतला आणि दोघे कारने घरून निघाले.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा