सुरमयी प्रवास...भाग 58
दोघेही कारने प्रवासाला निघाले.
अपर्णा शांत बसलेली होती.
सकाळी लवकर उठल्यामुळे कदाचित तिची झोप झालेली नव्हती, चेहरा फ्रेश दिसत नव्हता. मानस तिच्याकडे निरखून बघत होता.
“तू ड्राइविंग कडे लक्ष दे ना प्लिज, असं काय बघतोय माझ्याकडे, मला कसंतरी होतंय." तिने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला.
“का नर्वस आहेस तू?” मानस हसला.
“नाही मी नर्व्हस नाही आहे. ओके आहे मी.”
“झोप झालेली नाहीये का तुझी?”
“असं काही नाहीये, प्लिज तू ड्राइव कडे लक्ष दे, मी ओके आहे.”
मानस कोणत्या ना कोणत्या कारणावरून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता, तिला बोलत करण्याचा प्रयत्न करत होता. त्याला तिला असं गप्प बघवत नव्हतं. कारण तिचा स्वभाव आणि ती कशी आहे त्याला चांगल माहित होतं.
"आता तू बोलली नाहीस ना तर बॉस म्हणून मी तुला रागवेल, एका बॉसची ऑर्डर आहे काय झालं सांग अशी का गप बसली?" तो हसायला लागला.
"बॉस आणि नवरा या दोन्ही नात्यात गफलत होत आहे का?" मानस पुन्हा बोलायला लागला.
"नाही."
“मग काय झालं अपर्णा? पुन्हा काय विचार करतेस?”
“नाही काही नाही.”
मानसने म्युझिक ऑन केलं.
“यु ही कट जायेगा
सफर साथ चलने से
की मंजिल आयेगी
नजर साथ चलने से...
यु ही कट जायेगा
सफर साथ चलने से
की मंजिल आयेगी
नजर साथ चलने से...”
सफर साथ चलने से
की मंजिल आयेगी
नजर साथ चलने से...
यु ही कट जायेगा
सफर साथ चलने से
की मंजिल आयेगी
नजर साथ चलने से...”
एफ एम वरच्या गाण्यावर मानस पण गुणगुणायला लागला. त्याला असं गुणगुणताना बघून अपर्णाला आश्चर्य वाटलं. कारण ऑफिसमध्ये जो मानस असायचा तो अगदी कडक, शिस्तप्रिय , कामात कुठलीही दिरंगाई चालायची नाही त्याला. आज त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल बघून अपर्णाला बर वाटलं.
त्याला गुणगुणताना बघून अपर्णाचे पाय थिरकायला लागले. त्याच्या सोबत तीही गुणगुनू लागली. दोघांनी एकमेकांकडे बघितलं. नजरानजर झाली, अपर्णाने मानसच्या गालाला हात लावून त्याची मान फिरवली.
तो मिश्कीलपणे हसला. मानसने गाडी सुसाट काढली, काही वेळाने ते रेल्वे स्टेशनवर पोहोचले. बाय ट्रेनचा प्रवास त्या दोघांसाठी खूप छान होता. कारण अपर्णानेही ट्रेनचा प्रवास कधी केला नव्हता आणि मानसही कधीच ट्रेनने कुठेच गेलेला नव्हता.
दोघांनी ट्रेनमध्ये एकमेकांसोबत खूप गप्पा मारल्या. एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला. एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घेतल्या. केरळला पोहोचल्यानंतर त्यांनी हॉटेल बुक केलं, दोघेही फ्रेश झाले.
“आपण आधी काही खाऊन घेऊया, आणि मग फिरायला जाऊया. तुलाही भूक लागली असेल ना?” मानसने तिला विचारलं.
“हो, तू पुढे हो. मी आलेच.” अपर्णाने तिची पर्स घेतली. आणि ती मानसच्या मागे गेली.
दोघेही हॉटेल मध्ये गेले.
मानसने अपर्णासाठी चेअर मागे केली, अपर्णा बसली त्यांनतर मानस तिच्या समोरच्या चेअरवर बसला.
“काय खाणार आहे तू? बघ मेनू कार्ड, तुला जे आवडत ते मागव.”
“आज तुझ्या आवडीचं मागव, मी पण तेच खाणार.”
“अग हे काय? माझ्या आवडीच तू खाल्लं पाहिजे असं काही नाही आहे. तू तुझ्या आवडीचं मागव ना.”
"पण यानिमित्ताने मलाही कळेल ना तुझ्या आवडी निवडी."
"त्या कळतीलच तुला हळूहळू." तो हसला.
दोघांनी त्यांच्या आवडीचं जेवण मागवलं. जेवण झालं.
"मानस वेळ असेल तर एक फोन करू?"
"हो हो कर ना, मी पण आईला फोन करतो."
अपर्णाने स्वरालीला फोन केला.
"हॅलो स्वराली कशी आहेस?"
"मी मस्त आहे तू कशी आहेस?"
"मी मस्त."
"फिरायला गेली आहेस ना तिकडे?"
"हो ग, आजच पोहोचलो आम्ही."
"मस्त छान एन्जॉय कर."
"हो गं, तू बरी आहेस ना?"
"मी मस्त आहे आणि आता तिकडे गेलीस ना मग इकडची काळजी करू नकोस आणि वारंवार कुणालाही फोन करू नको, मानसला कदाचित आवडणार नाही."
"हो हो ठीक आहे, बाय."
"बाय."
मानसने त्याच्या आईला फोन केला,
"हॅलो आई कशी आहेस तू?"
"मी छान आहे तू कसा आहेस आणि अपर्णा कशी आहे?"
"आम्ही दोघेही छान आहोत."
"आनंदात आहेस ना बाळा?"
"हो आई आणि आता तू माझी उगाच काळजी करू नकोस मी खरंच बराआहे, आनंदात आहे."
"झालं तर मला अजून काय हवंय आता मी डोळे मिटायला मोकळी झाले."
"आई तू पुन्हा सुरू होऊ नकोस प्लिज."
ती हसायला लागली,
बरं नाही बोलणार, दोघे काळजी घ्या आणि एन्जॉय करा."
त्यांचं बोलणं झालं त्यांनंतर ते फिरायला निघाले.
त्यांच्या हॉटेल जवळून अलेप्पी बॅकवॉटर हे ठिकाण खुप जवळ होत. ते तिथे जायला निघाले. दोघांनीही वाटेत छान गप्पा मारल्या, पाय वाटेने जात असताना मानसने अपर्णाचा हात हातात घेतला. दोघांची पावले सोबतच चालत होती.
अपर्णाने एक कटाक्ष मानसकडे टाकला. मानस तिच्याकडे बघतच होता. तिने लगेच खाली मान केली.
“तू असं माझ्याकडे बघत जाऊ नकोस, मला कसतरी वाटतंय.”
“अगं बायको आहेस ना माझी, मग बघू तर काय करू?”
“हा असा चावळटपणा तुला शोभत नाही. बॉस आहेस ना माझा."
“ए हॅलो हे ऑफिस नाहीये आणि आता तू माझी फक्त एम्प्लॉय नाहीयेस. बायको आहेस, माझी हक्काची बायको. प्यार मे सबकुछ चलता है.”
“तू माझ्या प्रेमात पडलायेस?" अपर्णाने त्याला चिडवलं.
“कधीचाच? मला कळलंही नव्हतं की मी तुझ्या प्रेमात कधी पडलो." मानस सिरीयस झाला.
"कुणाचं लग्नाच्या आधी प्रेम होतं तर कुणाचं लग्नाच्या नंतर प्रेम होतं. आपलं लग्नानंतरचं प्रेम आहे ना, मग ते प्रेम फुलायला नको का? अपर्णा आपण आपल्या नात्याला वेळ देऊया. आपलं प्रेम फुलवूया, मला खात्री आहे यात तू मला नक्की साथ देशील, बोल आनंदी देशील मला साथ.” अपर्णाने फक्त होकारार्थी मान हलवली.
दोघेही छान फिरले, एकमेकांसोबत वेळ घालवला. आणि रात्री रुम वर परत आले. आल्या आल्या अपर्णाने बेड वर पर्स टाकली आणि बसली.
“काय ग थकली?”
“नाही मी फ्रेश होऊन येते.” अपर्णा फ्रेश होऊन आली.
मानसही फ्रेश झाला.
दोघेही बाल्कनीत जाऊन बसले.
“किती छान वातावरण आहे ना?” अपर्णाने हाताची घडी घातली.
“हो आणि थंड वाराही सुटला आहे.” मानस
“अपर्णा तुला थंडी तर वाटतं नाही ना? तुला शाल ओढायला आणू का?” मानसला तिची काळजी वाटत होती.
“नाही नको, मी काय म्हणते आपण बाहेर फेरफटका मारूया का?” अपर्णा
“चालेल चल खाली. पण आता शाल ओढ, बाहेर थंड वाटतंय.” मानसने अपर्णाला शाल ओढून दिली आणि ते निघाले.
थोडया अंतरावर ते एका बाकावर जाऊन बसले. अपर्णा थंडीमुळे मानसला बिलगून बसली. तिला अस जवळ बघून मानसला खूप छान वाटत होतं. त्याच्या मनात लड्डू फुटत होते. मनोमन खुश झाला होता. त्याने हळूच त्याचा हात तिच्या खांद्यावर ठेवला आणि तिच्याकडे बघत राहिला.
शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुनी
चंद्र आहे स्वप्न वाहे,धुंद या गाण्यातुनी
आज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहा
तू अशी जवळी रहा..
मी कशी शब्दांत सांगू भावना माझ्या तुला
तू तुझ्या समजून घे रे लाजणार्या या फुला
अंतरीचा गंध माझ्या आज तू पवना वहा
तू अशी जवळी रहा..
तू तुझ्या समजून घे रे लाजणार्या या फुला
अंतरीचा गंध माझ्या आज तू पवना वहा
तू अशी जवळी रहा..
लाजर्या माझ्या फुला रे गंध हा बिलगे जीवा
अंतरीच्या स्पंदनाने अन् थरारे ही हवा
भारलेल्या या स्वरांनी भारलेला जन्म हा
तू अशी जवळी रहा..
अंतरीच्या स्पंदनाने अन् थरारे ही हवा
भारलेल्या या स्वरांनी भारलेला जन्म हा
तू अशी जवळी रहा..
शोधिले स्वप्नांत मी ते ये करी जागेपणी
दाटुनि आलास तू रे आज माझ्या लोचनी
वाकला फांदीपरी आता फुलांनी जीव हा
तू अशी जवळी रहा..
दाटुनि आलास तू रे आज माझ्या लोचनी
वाकला फांदीपरी आता फुलांनी जीव हा
तू अशी जवळी रहा..
'सदैव अशीच माझ्या जवळ रहा, मी तुला खुप प्रेम देईल. तुला कशाचीही कमतरता भासू देणार नाही.' तो मनातल्या मनात बोलला.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा