सुरमयी प्रवास...भाग 59
अपर्णा आणि मानस दोघेही फिरायला गेले.
तिथे एकमेकांसोबत वेळ घालवला. एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला. रात्री जेवण झाल्यानंतर दोघेही बाहेर शतपावली करायला निघाले.
थंड वाऱ्यामुळे अपर्णाने शाल ओढली. दोघेही एका बाकावर बसले, अपर्णा मानसला बिलगून बसली, तिला अस बघून मानसला खूप बरं वाटलं.
दोघेही रूम वर आले,
"अपर्णा तू वर बेड वर झोप, मी इथे सोफ्यावर झोपतो."
“नाही मानस प्लिज, तू इथे बेडवर झोप. अस बरं दिसत नाही.”
“अग त्यात काय एवढं, मी झोपेन इथे. तू रिलॅक्स होऊन झोप.” अपर्णा बेडवर झोपली.
मानस सोफ्यावर झोपला. सकाळी अपर्णाला थोडा उशिरा जाग आली, अपर्णा उठली तेव्हा मानस उठून फ्रेश झालेला होता. त्याने दोघांसाठी गरमागरम कॉफी आणली.
“गुड मॉर्निंग अपर्णा.”
“गुड मॉर्निंग मानस."
"काय झोप झाली की नाही तुझी?"
“माझी झोप झाली पण तुझी झोप झाली का? तू रात्रभर सोफ्यावर झोपला होता ना? यानंतर असं करायचं नाही, मला चालणार नाही” अपर्णाला थोडं वाईट वाटत होतं.
तो हसला.
“हो हो माझी छान झोप झाली आहे, मी एकदम फ्रेश टवटवीत आहे. आपल्या दोघांसाठी कॉफी घेऊन आलोय. पटकन जा फ्रेश होऊन ये. आपण कॉफी घेऊयात.”
अपर्णा फ्रेश होऊन आली, दोघांनी कॉफी घेतली. थोड्यावेळाने अपर्णाच्या मोबाईल वर फोन आला. अपर्णाने बघितलं तर फक्त एक नंबर होता. कुणाचा फोन आहे याच विचारात तिने फोन उचलला.
“हॅलो.”
“हॅलो माय चार्मिंग, माय डार्लिंग काय सुरू आहे तुझं?”
“कोण बोलतंय ?” अपर्णाने आश्चर्याने विचारलं.
“माझा आवाज विसरलीस इतक्या लवकर.”
“कोण बोलतंय?”
“मला वाटलं नव्हत इतक्या लवकर तू मला विसरशील, पण ठीक आहे आता माझा आवाज तू विसरलीस तर मी तुला आठवण करून देतेच. मी तुझी बालमैत्रीण स्वराली आहे."
"स्वराली कुणाच्या मोबाईल वरून फोन केलास? आणि आवाज बदलून का बोलत होतीस?"
"थोडी गम्मत केली ग."
"तुझ्या गंम्मतमुळे मला हार्टअटॅक आला असता ना."
“तुला काय वाटलं तुझं लग्न झालं म्हणजे तू आता माझ्या तावडीतून सुटलीस? नाही असं कधीच होणार नाही.” पुन्हा जोरजोरात हसण्याचा आवाज आला.
"स्वराली मार खाशील आता?"
स्वराली पुन्हा हसायला लागली.
"स्वरा गप्प बस. खरंच मार खाशील आता?"
दोघीही हसल्या.
अपर्णाने फोन ठेऊन दिला, ती बराच वेळ एकटीच हसत होती. मानस फ्रेश होऊन बाहेर आला, त्याची नजर हसत असलेल्या अपर्णाकडे गेलं. तो आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे बघू लागला, तो तिच्याजवळ गेला.
“अपर्णा अगं काय झालं? अशी का हसत आहेस?” अपर्णाच लक्षच नव्हतं, ती हसत होती.
मानसने पुन्हा तिला आवाज दिला.
"अपर्णा अग काय झाले? का अशी हसतआहेस?” तिच्या हातात मोबाईल बघून मानसने पुन्हा विचारलं.
“कुणाचा फोन आलेला होता का? आई बाबा बरे आहेत ना? की अजून काही झालंय? बोल ना ग कुणाचा फोन होता? तुझ्या हातात मोबाईल दिसतोय, कुणाचा फोन आला होता?” मानस तिला आश्चर्याने विचारत होता. पण अपर्णा काहीच बोलत नव्हती. अपर्णा हसतच बेडवर जाऊन बसली.
“स्वराली..” तिच्या तोंडून एकच शब्द निघाला.
"स्वराली..तिचं काय?”
“तिचा फोन होता.”
“अपर्णा तू काय बडबडतेस?”
“हो खरंच स्वरालीचा फोन होता, तिने मला फोन केला होता.”
“अग पण त्यात एवढं काय आणि तू हसत का आहेस? ते विचारतोय मी तुला?"
“ती मला म्हणाली माय डार्लिंग माय चार्मिंग कशी आहेस? मला विसरलीस का पण मी तुला नाही विसरले आणि मी तुला माझ्या आयुष्यातून असं जाणार नाही आहे असं म्हणून ती जोरात हसायला लागली. मी घाबरले कोण आहे फोन वर कळलंच नाही. नंतर कळलं की स्वराली आहे. तिने माझी गम्मत केली."
"अपर्णा तू बरी आहेस ना? अगं काय बोलतेस?”
“खरच बोलते, आज स्वरालीमुळे मला हार्ट अटॅक आला असता."
"काय बोलतेस तू? तू आधी हसणं बंद कर."
"हो."
दोघेही कॉफी प्यायले.
"चल मग तयार हो आपण बाहेर जाऊयात, तुला अजून मस्त वाटेल.”
“आपण थोड्यावेळाने गेलो तर नाही का चालणार?”
“अग पण बाहेर गेलो तर तुलाच छान वाटेल, नंतर ऊन खूप होतं आपण आता लवकर निघुया. इथे बसलीस ना तर हसतच राहतील. त्यापेक्षा तू तयार हो छान, आपण बाहेर जाऊया.”
होकारार्थी मान हलवत अपर्णा उठली,
ती छान तयार झाली.
“अपर्णा एक मिनिट.”
“काय झालं?”
“एकच मिनिट थांब.” असं म्हणून मानस आत गेला.
आतून काहीतरी घेऊन आला.
“हात समोर कर.” अपर्णाला बोलला.
अपर्णाने हात समोर केले. त्याने हातावर एक वस्तू ठेवली.
“काय आहे.”
“तूच बघ काय आहे?” अपर्णाने तो पॅकेट उघडला, तर त्यात छान एक वन पीस होता. पिंक कलरचा घेरदार नक्षीकाम केलेला वनपीस होता.
“अपर्णा आवडला तुला?”
“हो खूप छान आहे.”
“मग घाल लवकर प्लिज.”
त्याने रिक्वेस्ट केल्यानंतर अपर्णाने तो ड्रेस घातला. अपर्णा त्या ड्रेस मध्ये खूप सुंदर दिसत होती. तिचा चेहरा आणखीच खूललेला दिसत होता.
आज मानसला तिच्याकडे फक्त बघावसं वाटत होतं. तिच्या सुंदरतेला कुणाची नजर लागु नये म्हणून त्याने काळी टिकही तिला लावून दिलेली होती. अपर्णाने ही आरशात स्वतःला बघितलं, तिलाही स्वतःचा हेवा वाटायला लागला.
'खरंच मी इतकी छान दिसते.' ती स्वतःलाच प्रश्न विचारून खुदुखुदू हसायला लागली.
तिला गालातला गालात हसताना बघून मानसही सुखावला.
“अपर्णा निघायचं ना?”
“हो हो निघूया."
दोघे एकमेकांच्या हातात हात घालून निघाले, त्यांचा दिवसभराचा प्लॅन सेट झालेला होता. आणि रात्री कॅण्डल लाईट डिलरचा प्लॅन झालेला होता. दोघेही फिरायला जायला निघाले ठरल्याप्रमाणे त्यांना न्यायला गाडी आली. दोघेही गाडी बसले आणि त्यांचा प्रवास सुरू झाला.
गाडीमध्ये अपर्णा पुन्हा गप्प होती, मानसने तिला बोलत करण्याचा प्रयत्न केला.
“अपर्णा तुला माहितीये आता आपण ज्या जागेवर चाललो ना ती जागा तुला खूप आवडेल छान आहे, तुला तिथे खूप फ्रेश वाटेल.” अपर्णाने फक्त चेहऱ्यावर हलकी स्माईल आणली.
“काय अपर्णा खुश ना?”
“हो."
दोघांच्या गप्पा सुरू होत्या. दोघे एकमेकांच्या गप्पात रंगून गेले होते. एकमेकांच्या हातात हात घालून डोळ्यात डोळे भिडवून दोघेही बोलत होते. बोलता बोलता विषय प्रेमाकडे वळला आणि आनंदी खाली मान टाकून लाजली.
तिचा लाजलेला चेहरा बघून मानसने तिला जवळ घेतलं, तिच्या हाताचं हळूच चुंबन घेतलं, तिच्या माथ्याचा चुंबन घेतलं.
ती आणखीनच लाजली.
तो पुढे काही करणार तोच मोबाईलची रिंग वाजली.
"मानस तुझा फोन वाजतोय.".
"बघतो, अग आईचा फोन आहे."
"बघतो, अग आईचा फोन आहे."
"मग बोल ना."
"नाही आता नको."
"अरे बोल ना."
"मग बोलू आपण."
"मग बोलू आपण."
रात्री रूमवर गेल्यानंतर मानसने त्याच्या आईला फोन केला.
"हॅलो आई बोल ग."
"काय रे दुपारी फोन केला होता उचलला नाहीस."
"आई आम्ही बाहेर होतो ना नाही उचलला आलं सॉरी, कशी आहेस तू?"
"मी मस्त तुम्ही सांगा?"
"आम्ही मस्त आहोत, हॅपी आहोत आणि छान फिरतोय लवकरच परत येऊ."
"अपर्णा कशी आहे?"
"ती पण आनंदात आहे."
"तिची काळजी घे रे."
हो आई मी तिची व्यवस्थित काळजी घेतोय तू काळजी करू नकोस, उगाच काळजी बस करत बसत जाऊ नकोस."
"ठीक आहे, नाही करत. ठेऊ फोन?"
"हो, बाय"
"बाय."
"काय म्हणाल्या आई?"
"तिला तिच्या सुनेची खूप काळजी आहे." तो हसून बोलला.
"म्हणजे?"
"काही नाही तिला तुझी काळजी वाटत होती म्हणून फोन केला होता."
"अच्छा."
त्याने तिला मिठीत घेतलं.
तिनेही त्याला मिठीत कवटाळलं
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा