सुरमयी प्रवास...भाग 60 अंतिम
दुसऱ्या दिवशी सकाळी अपर्णा उठली बघितलं तर मानस बाजूला नव्हता, अपर्णाने त्याला शोधलं पण तो नव्हता कुठेच, तिने त्याचा फोन ट्राय केला तो स्विच ऑफ दाखवत होता. अपर्णाला काळजी वाटू लागली.
‘कुठे गेला असेल.’ ती विचारात पडली.
तिथे तिचं कोणीच ओळखीचं नव्हतं, तिला खूप काळजी वाटत होती. बऱ्याच वेळानंतर मानस परत आला.
अपर्णाला असं बघून
"अपर्णा ओके आहेस ना? काय झालं अशी का बसली आहेस?”
अपर्णाने मानसकडे बघितलं लगेच त्याला जाऊन बिलगली.
“अरे कुठे गेला होतास तू? कधीची शोधत आहे मी तुला? तुझा फोनही लागत नव्हता. कुठे गेला होतास सकाळी सकाळी?"
“अग मी खाली फिरायला गेलो होतो आणि माझा फोन स्विच ऑफ झाला असेल मी बघितलंच नाही. पण तू इतकी का घाबरलीस तुला सोडून कुठेही जाणार नाही मी.”
“तसं नाही पण एक तर या अनोळखी ठिकाणी मी कुणाला ओळखतही नाही. उगाच मला भीती वाटू लागली. तू कुठे गेलास? काही झालं तर नसेल ना? असे नकारात्मक विचार माझ्या डोक्यात फिरत होते. प्लिज तू यानंतर असं करायचं नाही."
मानस हळूच हसला.
“का हसतोस तू?”
“हसू नाहीतर काय करू इतक्या छोट्या गोष्टीवर किती पॅनिक झालीस तू आणि खरं सांगू का मला आता खूप बरं वाटतंय या एका गोष्टीमुळे कळलं की तुझं माझ्यावर किती प्रेम आहे ते. तुझी ती काळजी आहे ना त्या काळजीत प्रेम आहे. अपर्णा यु लव्ह मी अँड आय लव्ह यु टू”
“तुझं काहीतरीच असतं.” असं म्हणून ती लाजली.
"अपर्णा खरचं सॉरी ग पण यानंतर मी असं नाही करणार.”
“ओके.”
असं म्हणत ती पुन्हा त्याला बिलगली.
"चल आज आपल्याला निघायचंय, मी आईला फोन करून ठेवलाय. ती आपल्यासाठी गरम गरम जेवण तयार करून ठेवणार आहे. तुझी पॅकिंग झाली आहे का?"
"हो झाली आहे."
"चल फ्रेश हो."
दोघेही तिथून निघाले.
घरी पोहोचले तेव्हा आईने त्या दोघांचं छान स्वागत केलं, त्यांना गरम गरम जेवायला दिलं.
दुसऱ्या दिवशीपासून दोघांचेही ऑफिस सुरू झालं. दिवस सरकत गेले, दोघांकडे हळूहळू प्रेम फुलायला लागलं.
बघता बघता दिवस सरत गेले, दोघांच्या प्रेमाच्या वेलीवर आता अंकुर फुलायला लागलं.
अपर्णाला दिवस गेले, या गोड बातमीने सगळ्यांच्या जीवनात आनंद आला. सगळे खूप आनंदात होते.
आता मानस अपर्णाची जास्त काळजी घ्यायला लागला. त्याची आई पण दिवसभर तिच्याजवळ असायची. सगळं नीट व्हावं म्हणून सगळे तिची खूप काळजी घ्यायला लागले.
महिने गेले, अपर्णाची पहिली सोनोग्राफी होती, अपर्णा खूप आनंदात होती. डॉक्टर अपर्णाला सोनोग्राफीसाठी आत घेऊन गेले आणि ती पहिल्यांदा बाळाला बघणार म्हणुन खूप आनंदात होती.
सोनोग्राफी झाली, नंतर डॉक्टरने अपर्णा आणि मानसला डबल गुड न्यूज सांगितली.
अपर्णाला दोन जुळे होणार होते, दोघांना आता डबल आनंद झाला. हे ऐकून त्याच्या आईलाही खूप आनंद झाला. दोघांनी येताना वाटेत तिच्या आवडीच्या डेझर्ट खाल्लं.
हळूहळू दिवस समोर गेले. आता हळूहळू अपर्णाचं पोट वाढायला लागलं. तिला थोडा थोडा त्रास व्ह्यायचा. तिला उलटीचा त्रास सुरू झाला, काही खाल्लं की तिला उलट्या व्ह्यायच्या. डॉक्टरने तिला बेडरेस्ट सांगितलं.तिला मळमळ वाटत असे, छातीत जळजळ होत असे.
बघता बघता सहा महिने पूर्ण झाले, अपर्णाला सातवा महिना लागला. सातव्या महिन्याच्या डोहाळे जेवण करण्याची तयारी सुरू झाली.
अपर्णासाठी हिरव्या कलरचा वन पीस खरेदी करण्यात आला.
"अपर्णा तुझा ड्रेस झालाय. त्याच्यावरच्या बांगड्या झाल्या. तुला काही सामान लागणार असेल तर मला सांग मी जाऊन घेऊन येतो."
"मला आता काही नको."
"अच्छा ठीक आहे."
"मी काय म्हणतोय उद्या आपल्याला दवाखान्यात जायचं आहे, एकदा सोनोग्राफी करूया म्हणजे मग सगळं ओके कळेल आणि हो कार्यक्रमाला आता अवधी आहे तर तू तेवढे दिवस नीट आराम कर. प्रोग्रामच्या दिवशी तुला दगदग होईल."
एक-दोन दिवसांनी मानस आणि अपर्णा दवाखान्यात गेले, आज अपर्णाची सोनोग्राफी होती. अपर्णा आणि मानस दोघांनीही बाळाची हालचाल बघितली आणि बाळाला बघितलं. डॉक्टरांनी सांगितलं की सर्व ठीक आहे. दोघे खूप आनंदात होते.
कार्यक्रमाची सगळी तयारी सुरू होती. कार्यक्रमाचा दिवस उजाडला.
अपर्णाने सकाळी उठून आंघोळ करून पूजा केली.
"आई खूप दिवसानंतर मला छान प्रसन्न वाटतंय."
"हो ना पूजा केलीस ना म्हणून. रोज पूजा करत जा, पूजा केल्याने मन प्रसन्न वाटतं."
"हो आई खरच आहे, रोज पूजा तुम्ही करताय त्यामुळे मला सवयच नाही राहिली पूजा करायची. पण आता करत जाईल, खूप छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय."
"अच्छा आता आवरायला घे, कारण पाहुणे दुपारी लवकर येणार आहेत, आपण कार्यक्रम लवकर लवकर संपवूया. बाहेरचं सगळं काम मानस बघतोय, त्याने बाहेरची सगळी तयारी करून ठेवलेली आहे. आज तुझ्या घरचेपण येणार आहेत ह."
दुपार झाली, संपूर्ण तयारी झालेली होती.
आता फक्त बायका येण्याची वाट बघायची होती.
चौघेही रेडी झाले.
"अपर्णा थोडं खाऊन घे, रात्रीपर्यंत काही खायला मिळणार नाही तुला."
तिचं आवरलं.
हळूहळू बाया जमायला लागल्या.
कार्यक्रमाला सुरुवात झाली, सजवलेल्या झुल्यावर अपर्णाला बसवलं. तिला हळदकुंकू लावून तिचं औक्षण केलं त्यानंतर तिची ओटी भरण्यात आली. आता बाजूला मानसला पण बसायला सांगितलं. त्याचं पण औक्षण केलं.
त्यानंतर अपर्णाने उखाणा घेतला.
"तुम्हा सर्वांचे प्रेम पाहून
डोळे माझे पाणावले
मानसरावांचं नाव गोड,
पुरवा माझे डोहाळे."
डोळे माझे पाणावले
मानसरावांचं नाव गोड,
पुरवा माझे डोहाळे."
सगळ्यांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या आणि गाणे म्हणायला सुरुवात झाली.
गाणी सुरू होती आणि तितक्यात अपर्णाच्या जुन्या मैत्रिणी आल्या. त्यांना बघून आनंदी पटकन पाळण्यावरून उठली. आणि त्यांना जाऊन मीठी मारली.
कार्यक्रम संपला आणि सगळे पाहुणे निघून गेले.
सगळं छान झालं होतं.
अपर्णाच्या मैत्रिणी दोन दिवस राहिल्या आणि त्या निघून गेल्या.
दिवस आनंदात जात होते.
शेवटच्या दिवसात मानसने तिला खुप जपलं, तो तिची खुप काळजी घ्यायचा. पोट खूप वाढल्यामुळे तिला बसायला उठायला त्रास व्हायचा.
शेवटच्या दिवसात मानसने तिला खुप जपलं, तो तिची खुप काळजी घ्यायचा. पोट खूप वाढल्यामुळे तिला बसायला उठायला त्रास व्हायचा.
बघता बघता नऊ महिने पूर्ण झाले आणि अपर्णाच्या पोटात कळा यायला लागल्या.
तिला ऍडमिट केलं. काही कॉम्प्लिकेशन असल्यामुळे डॉक्टरने सिझेरियन करावं लागेल अस सांगितलं.
मानसकडून फॉर्म भरून घेतला आणि तिला ओ टी मध्ये नेण्यात आलं. खूप त्रास सहन केल्यानंतर अपर्णाने जुळ्या बाळांना जन्म दिला. एक मुलगा आणि एक मुलगी.
अपर्णा आणि मानसचं कुटुंब पूर्ण झालं.
पाच दिवसानंतर अपर्णाला डिस्चार्ज मिळाला. मानस तिला घरी घेऊन गेला.
पाच दिवसानंतर अपर्णाला डिस्चार्ज मिळाला. मानस तिला घरी घेऊन गेला.
दारात पाय ठेवत नाही तर त्याची आई आरतीची थाळी घेऊन उभी होती. चिमुकल्या बाळाचं आणि अपर्णाचं औक्षण केलं. बाळाच्या कुंकुवाच्या पावलांनी ठसे उमटवले.
अपर्णा बाळांना घेऊन आत आली, आत खूप सुंदर सजावट केलेली होती, दोन बाळाचे दोन पाळणे सजवले होते.
"मानस किती सगळं केलंयस?"
"पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त." असं म्हणून मानस मिश्कीलपणे हसला.
अपर्णा पण विचार करत राहिली. आत बेडरूममध्ये गेली तर सगळीकडे काळोख होता.
"मानस इथे इतका काळोख का आहे?"
"सरप्राईज.."
लाईट ऑन झाले आणि अपर्णा बघते तर काय समोर तिच्या जुन्या मैत्रिणी उभ्या होत्या.
सगळ्यांना बघून ती खूप आनंदी झाली.
"बापरे तुम्ही सगळे इथे, मला तर खूप मोठं सरप्राईज मिळालं."
"मग तुझ्या सासूबाईने फोन करून आम्हाला बोलावून घेतलं. आता तुझ्या बाळाचं नाव ठेवूनच आम्ही निघणार आहोत.
"चला तिला आराम करू द्या, आपण सगळे बाहेर बसू."
बाराव्या दिवशी बाळाचं नावं ठेवण्याचा कार्यक्रम करायचं ठरलं.
ठरल्याप्रमाणे सगळी तयारी झाली. तो दिवस उजाडला, सगळ्यांनी तयारी केली, बाळांचे झुले सजवले. काही पाहुणांच्या उपस्थितीत नाव ठेवण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली.
बाळांना आत्या नसल्यामुळे मावशीने त्यांच्या कानात नावे फुकली.
"वेदांत.."
"वेदिका.."
सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
"माझं कुटुंब असंच फुलत राहो
हीच सदैव मनी आहे आस
तुझ्यासोबत सुरू झाला
माझ्या आयुष्याचा सुरमयी प्रवास.."
समाप्त:
