Login

सूर्य भेटला सावलीला

सूर्य सावलीची भेट
सूर्य शिवाय सावलीचे
कधीच अस्तित्व नव्हते
सूर्याला सावलीला बघणे
कधीच शक्य नव्हते
सावलीला बघण्यासाठी
सूर्य मावळतीला झुकला
सावलीने ही मग
दूरवरचा वेग घेतला.
लपंडाव हा खेळ
अखेर त्यांनी संपवला
दोघांन मधला अडसर
काही क्षण दूर झाला
सूर्यची तेजस्वी किरणे
सावलीला स्पर्शून गेली
सावलीने बघता सुर्याकडे
नयन दिपून गेली...