Login

सूर्यास पत्र.

माझ्या द्वारे सूर्याला लिहिलेले एक पत्र...!
  || श्री ||    सूर्य,  आकाशगंगा,  सूर्यमंडल,  विश्व.  २५ एप्रिल २०२४.  प्रिय सूर्य आजोबा,  सप्रेम नमस्कार,  मी पृथ्वी वर राहणारा एक छोटासा जीव. पण तुम्ही आमच्या सर्वांसाठी साऱ्या विश्र्वा साठी आमच्या आजोबांसारखे च आहात. म्हणून तुम्हाला मी आजोबा म्हणूनच संबोधनार आहे. कारण तुमचं वय च कित्येक कोटी वर्षांचं आहे. तितका माझा अभ्यास देखील नाही.  तुम्ही अगदी थोर मोठ्यानं सारखे साऱ्या सृष्टी वर नजर ठेवून असता. तुमच्या प्रकाशने सारं विश्व उजळवून काढता. तुम्ही तुमच्या कार्यास कधीच चुकत नाही. रोज नियमित पने सकाळी येऊन तुमच्या गोंडस किरणांनी आम्हाला उठवता दिवसभर तुमच्या तापत्या किरणांचा धाक ठेवून आम्हाला कार्यरत ठेवता. त्यात मग संध्याकाळ झाली की आमचा थकवा समजून घेऊन आम्हाला आराम करायला उसंत देता.  तुमचा हा नियम साऱ्या विश्वाला लागू होतो. तुमचा म्हणणं टाळायचं कोणाची च हिम्मत होत नाही. होणार तरी कधी घरातील थोर मोठयांचा धाक मनात असलाच पाहिजे. हो आजोबा घर च, विश्व हे माझे घर आणि तुम्ही माझे प्रिय आजोबा. किती ही दूर असलात तरी नेहमी आमच्या जवळ च असता.  तुमच्या तापत्या किरणांचा आम्हाला त्रास होऊ नये म्हणून तुम्हीच आमच्या भोवती किरणांच्या मदतीने ओझोन लेयेर ची सौरक्षण भिंत उभी केलीत. पण तुमची ही काळजी तुमची आमच्या वरील माया मनुष्य जातीला कधी कळलीच नाही. स्वतःच्या स्वार्था पोटी तुमच्या द्वारे दिलेल्या सौरक्षण भिंती ची वाट लावतात आहेत. माहीत आहे त्याचा त्रास त्यांनाच होणार असून देखील कोणीच सुधारायला मागत नाही.   माझं तर तुमच्या वर जीवापाड प्रेम आहे. मी ते शब्दात व्यक्त नाही करू शकत मला तुमचे दिवस भराचे विविध रूपं बघायला खूप आवडतं. ते पुन्हा पुन्हा बघायला मिळावं म्हणून फोन च्या कॅमेरात ते टिपून देखील ठेवतो.   तुमच्या कडून खूप काही शिकण्यासारखे आहे ते मी सगळ शिकण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. शिकून ते चांगले विचार लोकापर्यंत देखील पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. कोणा एकाच जरी त्यातून भलं झालं तरी मला ठाऊक आहे तुमच्या कौतुकाची थाप तुमच्या ह्या नातुवाच्या पाठीवर नक्की द्याल.   चला तर मग तुमचा मी जास्त वेळ घेत नाही मला माहित आहे तुम्ही कधीच थांबत नाहीत. बस तुमची कृपादृष्टी सर्वांवर अशीच असूद्या इतकीच मागणी करतो.  तुमचा आज्ञाधारक,  चेतन सुरेश सकपाळ.
0