भाग तीन.* सुर्योदय स्वप्न पूर्तिचा*
दिपुच्या शाळेत ड्रॉइंग कॉम्पिटिशन म्हणून त्याला चित्र शिकायचे होते . रश्मी ने त्याला काकूंजवळ पाठवले ,खूप छान शिकून आला. शाळेच्या मॅडम नी खूप कौतुक केले.
एक दिवस सकाळी सकाळी रश्मी कामाने बाहेर निघाली .काकूंकडे बरेच पाहुणे आलेले दिसत होते.
त्यांचा मुलगा व सून ही पुण्याहून आलेले दिसले. दुपारी काकूंचा मुलगा व सून रश्मीला निमंत्रण द्यायला आले, काकूंचा 61 वा वाढदिवस साजरा करणार आहे तेव्हा जरूर यावे.
रश्मीला खूप आनंद झाला ती बाजारात जाऊन गिफ्ट म्हणून ब्रश पेंट आणि कॅनवास घेऊन आली. व काकूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत भेट केले.
वाढदिवसाच्या नंतर दोन-तीन दिवसांनी काकूं कडचे पाहुणे रवाना झाले, घर रिकाम रिकाम दिसत होत.
.एकासंध्याकाळी दिपु खेळून घरी आला ‘मम्मा--तुझ्यासाठी आजींनी काहीतरी दिल आहे.’
एक लिफाफा त्यात सुंदर स हँडमेड कार्ड होतं.
कार्डवर काळ्या**** घनघोर ढगां आडून दिसणारा सूर्य पेंट केलेला होता.
"जणू निराशेच्या ढगांना चिरून आपल्या उत्साहरुपी सहस्त्र किरणां सकट आकाशाच्या निळ्या फलकावर चमकदार रंग उधळत सूर्य अवतरला होता.
आत मध्ये "थँक्स रश्मी , केवळ तुझ्या मुळे. " लिहिले होते.
त्यानंतर सुषमा काकू दर दोन चार दिवसांनी एक पेंटिंग तयार करू लागल्या त्या रश्मि ला बोलावून तिला आपली पेन्टिंग्स दाखवत .
सुरवातीला थरथरणारा हात आता खूपच सधला होता, जवळजवळ दहा ते पंधरा पेंटिंग्ज तयार झाले.
गणपती उत्सवाच्या निमीत्त्याने रश्मी ने त्यांच्यापेन्टीग्स चे प्रदर्शन ठेवलें .काही रसिक लोकांनी त्यातून एखादं विकत घेतल पण काकूंनी पैसे परत केले. एका समाचार पत्राने स्त्रियांसाठी असलेल्या काॅलम मधे सुषमा काकूंच्या प्रदर्शनीचा व काकूंचा फोटो छापला.
सगळी कडून काकूंच अभिनंदन झाले. काकांना ही जाणवल. ते काकूंच अभिनंदन करत म्हणाले मी तुझ्या कलेला मान नाही दिला मला माफ कर .

आता सुषमा काकूंना काॅलनीतल्या मुलांमुलीं साठी चित्रकला व पेंटिंग चे क्लासेस काढायचे होते. ते त्यांनी पाहिलेले एक स्वप्नं होत
रविवारच्या दिवशी सकाळी रश्मी भाजी घ्यायला म्हणून खाली उतरली,
सुषमा काकू व काका बाहेरच उभे होते .
काका दारासमोरील बोर्ड लावून घेत होते त्यावर "सुषमा कला केंद्र "असे लिहिले होते.
खाली "इथे ड्रॉईंग व पेंटिंग चे प्रशिक्षण दिले जाईल "
वेळ दहा ते चार .
खाली --सुषमा वर्मा: डिप्लोमा इन फाईन आर्टस " लिहिले होते...

काकूंचा चेहरासकाळचा सूर्याप्रमाणे प्रदीप्त दिसत होता. .
काकांनी पण काकुंच्या कलेचा उशिरा का होईना मान ठेवून त्याला प्रतिष्ठा दिली .
आयुष्याच्या मावळतीला का होईना सुषमा काकूंचे “अधुरे स्वप्न” उगवतीचा सूर्याबरोबर पूर्ण होत होते.काकूंच्या कलेचा सूर्योदय होत होता……..
—------------------_—----------------------_
संपूर्ण ..
—------------------_—----------------------_
संपूर्ण ..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा