जलद लेखन स्पर्धा ऑक्टोबर 2025
विषय- गरिबीतलं शिक्षण आणि शिक्षणातील गरिबी
सुशिक्षित की सुसंस्कारित...काय हवे...?
भाग -१
भाग -१
"वैचारिक दारिद्र्याचं पीक आलय नुसतं. कुठे गेली नीतीमत्ता? ज्या शिक्षणाने मुलं सुसंस्कारित होत नसतील तर असं शिक्षण काय कामाचं?"
ज्यांनी काळाचा झपाट्याने होत असलेला बदल अनुभवला असे वयाची साठी पार केलेला सुहास आपल्या साठीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या पत्नीला सिमाला विचारत होता .
"हो आहे तिच्याकडे एम एस सी मॅथ गोल्ड मेडलिस्ट, पीएचडीची डिग्री पण जगण्याचं गणित जर समजलं नसेल तर ती शिक्षणातील गरिबीच म्हणावी लागेल ना?

आणि तोही मराठीचा लेक्चरर असून ना वागण्याचं ज्ञान न बोलण्याचं भान त्याला दरिद्रीच म्हणावे ना?"
सुहास बिथरला होता नेहा नितीनच्या वागण्यावर.
सुहास बिथरला होता नेहा नितीनच्या वागण्यावर.
मी काय म्हटले होते," अगं नेहा, दारावर ती बचत गटाच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह चालवणारी गरीब महिला मातीच्या पणत्या विकायला घेऊन आलीय.  तिच्याकडून कर खरेदी पणत्या.
तिने कानावर घेतले नाही म्हणून मग मीच खरेदी केल्या एक डझन पणत्या तिच्याकडून तेही फक्त वीस रुपयांत."
स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही पण साधल्या जातील.एवढेच म्हणायचे होते मला.
आपल्याबरोबर तिचीही दिवाळी साजरी करायला हातभार लावल्याचे समाधान आपल्याला लाभले असते.

त्यावर आपली तथाकथित उच्चशिक्षित नेहा म्हणते,"त्या काय मातीच्या पणत्या घ्यायच्या चांगल्या नाहीत दिसत नवीन घरात.मी मॉल मधून आणते चांगल्या फॉरेन मेड कॅन्डल्स."
अगं हजारोंची कमाई यांची वाटेल तिथे पाण्यासारखा पैसा उधळतात तेव्हा यांना काही वाटत नाही आणि त्या गरीब बाईला भीक तर देतच नव्हतो वीस रुपयाच्या मोबदल्यात ती पणत्या देत होती.वीस रुपये द्यायला तिच्यासमोर तिची लायकी काढावी हिने ?
तिचे तर काही बिघडले नाही हिनेच आपल्या उच्चशिक्षितपणाचे वस्त्रहरण करवून घेतले.

ती भले गरीब असेल गरिबीचे चटके सोसत फक्त चार बुकं शिकली असेल पण तिच्याकडे विचारांची श्रीमंती होती.
मी तिला पैसे द्यायला लागलो तर ती म्हणाली," बाबा,मला तुम्ही वडिलांसारखे आहात सुनबाई नाही म्हणते तर राहू देत पैसे.हे दीप माझ्याकडून तुमच्यासाठी भेट.
या गरीब लेकी कडली भेट स्वीकाराल ना ?"
मी तिला पैसे द्यायला लागलो तर ती म्हणाली," बाबा,मला तुम्ही वडिलांसारखे आहात सुनबाई नाही म्हणते तर राहू देत पैसे.हे दीप माझ्याकडून तुमच्यासाठी भेट.
या गरीब लेकी कडली भेट स्वीकाराल ना ?"
आज ते दीप उजळतांना तिचा तेजस्वी चेहराच दिसत होता त्यात.
त्याच्यापुढे मिनमिन करणाऱ्या त्या कॅन्डल्स खरेच गरीबच वाटल्यात मला.
गरिबीतलं शिक्षण सुशिक्षित बनवता बनवता सुसंस्कारित बनवतं हे शिकलो मी या प्रसंगातून.
कारण चार बुक शिकण्यासाठी त्याला कोण कोणत्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतं त्यातून ताऊन सुलाखून निघतो तो. 
आयुष्यभराच्या अनुभवाची शिदोरी गाठीशी बांधून बाहेर पडतो तो.
माणुसकीचा पाठ शिकतो तो.
अहंकार शिवतच नाही तिथे.
आयुष्यभराच्या अनुभवाची शिदोरी गाठीशी बांधून बाहेर पडतो तो.
माणुसकीचा पाठ शिकतो तो.
अहंकार शिवतच नाही तिथे.
सुशिक्षित की सुसंस्कारीत... काय हवं?
सुहास बोलत होता.
सीमा निशब्द होऊन ऐकत होती.
क्रमशः
पुढील भाग -२मधे
©®शरयू महाजन
सुहास बोलत होता.
सीमा निशब्द होऊन ऐकत होती.
क्रमशः
पुढील भाग -२मधे
©®शरयू महाजन
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा