Login

सुशिक्षित की सुसंस्कारीत... काय हवे?भाग -३

शिक्षणातील फरक
जलद लेखन स्पर्धा ऑक्टोबर 2025

विषय- गरिबीतलं शिक्षण आणि शिक्षणातील गरिबी

सुशिक्षित की सुसंस्कारित...काय हवे...?
भाग -३ अंतिम

" अहो,परवा नेहाने तीन हजार रुपयांचे एज्युकेशनल टॉईज आणलेत निधान साठी.
तीन-चार प्रकारचे होते .त्याने सगळेच
बॉक्स एकादमानेच उघडले.खेळणे
सगळ्या घरभर पसरवले. त्यातून शिकला काहीच नाही सगळे पार्ट वेगळे वेगळे करून तोड मोड केले."सीमा सांगत होती

यांचं राहणं सगळं हाय फाय खेळणी सुद्धा हाय फाय हवेत ‌.पण मुलांना ते कसे वापरायचे कसे खेळायचे याचे शिक्षण द्यायला मात्र विसरलीत.
पैसा आहे परत दुसरे आणु.ही मानसिकता.
मुलावर मात्र तोच संस्कार बिंबविल्या जातो. आपण तोडले तरी काही फरक पडत नाही दुसरे मिळतेच .
त्यामुळे जपून वापरणे, जपून ठेवणे चार जण मिळून खेळणे हे ते शिकतच नाहीत.
कुणाजवळ नवीन प्रकारची सायकल दिसली की घरी येऊन लगेच हट्ट मला तशीच हवी.
कारण माहीत असते तोंडून निघालं की लगेच हातात मिळतं.
तडजोड शिकतच नाहीत.
ही आजच्या शिक्षणातली गरीबीच म्हणावी लागेल.

या उलट तेच तुटले फुटले खेळणे घरात कचरा नको म्हणून नेहाने आपल्या कामवालीच्या मुलाला दिले.
त्या पोराने मात्र ते एकत्र केलेत आणि स्वतःच डोकं वापरून त्या चार प्रकारच्या खेळण्यातून चांगले पार्ट काढून एक चांगली कलाकृती तयार केली.

मला आठवून गेलं घरात चार जण खाणारी तोंड.तोंडमिळवणी कशी करायची?
त्यावेळी आई घरातल्या डाळीचा कोंडा डाळीतले निघालेले गणंग असं सगळं मिळून त्याच्यापासून एक चविष्ट पदार्थ बनवायची आणि आम्ही सगळे मिटक्या मारत खायचो.
बाबा म्हणायचे ,"कोंड्याचा
मांडा करणे तिलाच जमते."

परिस्थिती माणसाला सगळं शिकवते तसं तो मुलगा गरिबीत शिक्षण घेताना हे सगळं शिकला.
त्याला कुठे माहित अशी महागडी एज्युकेशनल टॉईज.
तो तर चिंध्यांचा बॉल करून आणि घरातल्या मोगरीची बॅट करून आनंदाने क्रिकेट खेळणार.
फरशांचे तुकडे जमवून त्याच चिंध्यांच्या
बालणे मस्त लगोरी खेळणार. बाबांच्या सायकलचा खराब झालेला टायर घेऊन गावातून मस्त खेळत खेळत फिरून येणार.

त्याला जराही दुःख नाही की मला ही महागडी टॉईज का मिळाली नाहीत.
मिळाले त्यात समाधान मानणारा संस्कार त्याला या गरिबीतील शिक्षणातून मिळाला.
आणि उज्वल भविष्य घडवून गेला.

याउलट सर्व सोयी सुविधांनी युक्त शाळा आणि भरमसाठ फी म्हणा की डोनेशन म्हणा भरून ऍडमिशन घेऊन श्रीमंत शाळांमधून शिकणारी श्रीमंत मुलं अति लाडकोड, 'नाही' शब्द ऐकण्याची सवयच नाही.
अशात मुलं हट्टी होतात. करियर बाजूलाच राहतं आणि मुलगा नको त्या गोष्टीत अडकतो.
सुशिक्षित पणाला सुसंस्काराची जोड मिळत नाही. आणि शिक्षणातली गरिबी उघडी पडते.
समाप्त
©®शरयू महाजन
0

🎭 Series Post

View all