जलद लेखन स्पर्धा ऑक्टोबर 2025
विषय- गरिबीतलं शिक्षण आणि शिक्षणातील गरिबी
सुशिक्षित की सुसंस्कारित...काय हवे...?
भाग -२
भाग -२
 सीमा तुला कालचा प्रसंग सांगायचाच राहिला. 
मी काल दर्शनासाठी म्हणून मंदिरात गेलो. दर्शन केले आणि पायरीवर येऊन बसलो.
मी, विनू, शरद मंदिराच्या पायरीवर गप्पा करत बसलो होतो.
तेवढ्यात तिथे एक गरीब घरचा मुलगा जुनाट पण स्वच्छ कपडे, चार ठिकाणी शिवलेल्या दप्तरात आपली पुस्तक घेऊन शाळेत जाता जाता दर्शनासाठी आला.पायातील चार ठिकाणी शिवलेल्या चपला पायरीच्या बाजूला काढून तो मंदिरात जायला निघाला.

त्या पाठोपाठच एक चांगल्या समृद्ध घरचा मुलगा टीप टॉप गणवेशात चांगल्या उच्च क्वालिटीची स्कूल बॅग घेऊन कॉन्व्हेंट मध्ये जाणारा, बूट मोजे घालून आलेला,मंदिरात दर्शनासाठी पायऱ्या चढत होता.
नेमका तेव्हाच तो पहिला मुलगा दर्शन करून पायऱ्या उतरत होता.
त्या मुलाच्या बुटांकडे तो एकटक न्याहाळत होता.
त्याच्या मनात विविध भावतरंग असतील .हा बुट घालून मंदिरात चालला किंवा असे सुंदर बुट मला असते तर ?
माहित नाही त्याच्या अंतरात काय सुरू असेल पण तो पायऱ्या उतरून खाली आला. आम्ही तिघे बसलो होतो तिथे आला आमच्या पायाला हात लावून नमस्कार केला आपली चप्पल पायात अडकवली आणि शाळेकडे निघाला.
हा दुसरा मुलगा मात्र पायात बूट असल्यामुळे मंदिरात गेलाच नाही बाहेरूनच पायरीवर डोकं टेकवले परत आला आणि शाळेच्या रस्त्याला लागला.
माझ्या नकळत माझं मन दोघांची तुलना करू लागलं,
गरीबीतलं शिक्षण आणि शिक्षणातली गरिबी.
दोघांच्याही कृतीतून दोघांचेही संस्कार अधोरेखित झाले होते.

ते बघून विनु म्हणाला ,"काय रे ही आजकालची पिढी कॉन्व्हेंट मध्ये शिकते म्हणे. त्यांना पसायदान तर येतच नाही, शेक्सपियरही धड वाचता येत नाही. ज्येष्ठांचा मान सन्मान ,गुरुजनांचा आदर गुंडाळूनच ठेवला रे यांनी. घरातली कामे करायची लाज वाटते यांना.
तेच ते आधी येऊन गेलेलं पोरगं बघ 
किसन्याचा नातू आहे तो. एवढं गुणाचं पोरगं पहिला नंबर कधी सोडत नाही. वक्तृत्व असो वादविवाद असो पहिला नंबर ठरलेला. घरातून कोणतेच मार्गदर्शन नाही. सगळेच अडाणी पण पोरानं नाव काढलं बघ.
बाप कपडे शिवते तर पोरगा काच बटन करायचं काम करून देते या वयात.

नाहीतर हे बघ घरात सगळे शिकले सवरलेले पोरगा फक्त वरतूनच टापटीप दिसते शिक्षणात मात्र बोंब.संस्कार नावाची तर गोष्टच नाही.
आपणही गरिबीतूनच वर आलो.पण पाय जमिनीवर होते.
क्रमशः
पुढील भाग -३मधे
©®शरयू महाजन
क्रमशः
पुढील भाग -३मधे
©®शरयू महाजन
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा