सुतावरून स्वर्ग भाग २
जलद लेखन
©®आरती पाटील- घाडीगावकर
( मागील भागात आपण पाहिलं की आपल्या आईला घरी काम करायला सांगितल्यामुळे संजय श्रीजावर खूप चिडला होता. श्रीजा नक्की काय झालं असं संजयला विचारते. आता पुढे. )
संजय रागाने श्रीजा कडे पाहत म्हणाला, " तू सकाळी आईला ऑफिसला जाताना म्हणाली नाहीस का? तुमचं तुम्ही बनवून खा. तुमचं करत बसायला वेळ नाही मला. " दोन पोळ्या जास्त बनवायला त्रास झाला का तूला? "
श्रीजा च्या सर्व लक्षात आलं. ती म्हणाली, " संजय सर्वात पहिली गोष्ट मी अश्या भाषेत आईंशी अजिबात बोललेली नाहीये. आणि दुसरी गोष्ट मी सकाळी भाजी पोळी आईसाठी सुद्धा बनवली होतीच. फक्त दुपारी त्यांनी गरम वरण भात मिळावा म्हणून मी कूकर तयार करून ठेवला आणि ऑफिसला निघताना मला ऑफिस कॉल आला आणि त्यावर बोलत मी निघाले आणि निघताना एवढंच म्हणाले की, " आई जेवायच्या १५ मिनिट आधी कूकर लावा. आता मला सांग मी काय चुकीचं बोलले ? गरम जेवायला मिळव म्हणून त्यांना फक्त कूकर चा गॅस सुरु करायला सांगितलं हे चुकलं का ? "
संजय श्रीजा कडे पाहू लागला. तरी कुठेतरी राग होताच.
संजय, " म्हणजे आई खोटं बोलतेय का ? "
संजय, " म्हणजे आई खोटं बोलतेय का ? "
श्रीजा, " ते मला नाही माहित पण मी खरं बोलतेय हे नक्की. आणि जर पुरावा हवा असेल तर तो सुद्धा देते. माझे सर्व कॉल रेकॉर्डिंग होतात. कारण ऑफिस कॉल जास्त असतात. त्यात काही घोळ झाला तर रेकॉर्डिंग असलेलं चांगलं म्हणून मी ते ऑन ठेवलं आहे. हवं तर ते ऐक. " असं म्हणत श्रीजाने रेकॉर्डिंग सुरु केलं त्यात श्रीजा जे बोलत होती तेच होतं.
संजय ला कळत नव्हतं मग आई असं का बोलली. संजय आईकडे आला आणि विचारलं, " आई खरंच श्रीजा तूला 'तुमचं तुम्ही बनवून खा. तुमचं करत बसायला वेळ नाही मला.' असंच म्हणाली का ? संजयच बोलणं ऐकून सविता बाईंना राग आला आणि त्या संजय ला बडबडू लागल्या. ' म्हणजे मी खोटं बोलते का ? आईवर विश्वास नाही तुझा. एवढं वाढवला तूला आणि तू असे उलट प्रश्न करतोस ?
संजय ने सविताबाई ना विचारलेल्या प्रश्नवरून देखील सविताबाईने खूप तांडव केला. संजयच्या लक्षात आलं की आई सुतावरून स्वर्ग गाठतेय. तो त्याच्या रूममध्ये निघून गेला आणि श्रीजा ची क्षमा मागत सॉरी म्हणाला.
थोडे दिवस सविता बाई इथे राहणार असल्यामुळे त्यांच्या वागण्याकडे श्रीजा आणि संजय दुर्लक्ष करू लागले. पण सविता बाई रोज नवीन काही ना काही काढतच होत्या.
क्रमश:
( सविताबाईची सुतावरून स्वर्ग गाठायची सवय तशीच राहील का? त्याचा श्रीजा आणि संजय ला अजून किती त्रास होईल ? पाहुयात पुढील भागात. )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा