Login

सुतावरून स्वर्ग    भाग अंतिम

-



सुतावरून स्वर्ग    भाग अंतिम

जलद लेखन

©®आरती पाटील- घाडीगावकर

( मागील भागात आपण पाहिलं की श्रीजा आपल्या कॉल रेकॉर्डिंग वरून ती निर्दोष असल्याचे संजय समोर सिद्ध करते. सविता बाई संजय ला देखील नको तसं ऐकवतात. दुर्लक्ष करूनही सविताबाईंचा स्वभाव बदलत नाही. आता पुढे. )

सविताबाईंनी दोघांना खूप त्रास दिला पण दोघांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. काही दिवसांनी श्रीजाचे सासरे तीर्थ यात्रेवरून परत आले. तीर्थ यात्रेवरून परत आल्यावर घरी पूजा ठेवायची आणि जेवण ठेवायची जुनी प्रथा आहे. त्यामुळे. श्रीजा आणि संजयने पूजेची तयारी केली.

गावी राहणारे काही नातेवाईक आदल्या दिवशी रात्री घरी आले होते आणि जवळपास राहणारे सरळ पूजेला येणार होते. सकाळी श्रीजा अंघोळ करून बाहेर आली आणि देवाच्या पूजेची तयारी करण्यासाठी ती देवघराकडे निघाली. समोर सासूबाईंनी वापरलेला टॉवेल तसाच होता. म्हणून श्रीजा म्हणाली, " आई जरा तो टॉवेल उचलून ठेवाल का? मी पूजेची तयारी करते म्हणून जरा प्लीज. "

खरंतर श्रीजा चं म्हणणं बरोबर होतं. देवाच्या पूजेची तयारी करायची तर अंघोळ करून पडलेल्या टॉवेल ला हात लावणं बरोबर वाटत नव्हतं. पण यावरून  नातेवाईकांसमोर सविता बाईंच्या तोंडाचा पट्टा सुरु झाला. आम्ही काय घाणेरडे वाटलो का ? कसं बोलते बघा. विचार करा. तुमच्या समोर अशी वागते मागे कशी वागत असेल.  इथे आल्यापासून नुसता कामाला लावल आहे मला. खूप त्रास देते. आता पाहिलंच असेल ना. " वगैरे वगैरे सुरूच होत. एवढे दिवस दुर्लक्ष केलं पण आज सर्व नातेवाईकांसमोर असं वागणं श्रीजा ला सहनच झालं नाही. तिला फार रडू येत होत ती आत जाऊन तोंडावर पाणी मारू लागली.

" एवढे दिवस दुर्लक्ष केलं म्हणूनच सासूबाई अजून जास्त करत आहेत. पण आता बास. आता मी त्यांना चांगला धडा शिकवणार. " असा निश्चय करून श्रीजा बाहेर आली. आणि आपल्या कामाला लागली. हळूहळू नातेवाईकांची गर्दी वाढू लागली. पूजा संपन्न झाली आणि जेवणें झाली. सविता बाई श्रीजाजवळ गेल्या आणि तिरकसपणे बोलू लागल्या, " काय गं, तुझ्या माहेरून कोणीच कसं आलं नाही ? पूजेत काही घेऊन जावं लागेल म्हणून आले नाहीत की काय ? "

श्रीजा ला हवी असलेली संधी मिळाली. श्रीजा जोराने सर्वाना ऐकून जाईल अशी बोलू लागली, " अहो आई केवढी ति हाव ? घरी आल्यापासून माझं जगणं नकोस केलं आहेत तुम्ही. लग्नातल्या गोष्टी अजूनही काढून टोमणे मारता. त्रास देता. तुझ्या घरच्यानी हेच नाही दिलं तेच नाही दिलं. सकाळी सुद्धा पुजेची तयारी करत होते मी तुमचा वापरलेला टॉवेल ला हात लावून मी पूजेची तयारी करायची होती का? असं चालत का ? " श्रीजा गावावरून आलेल्या आत्याकडे पाहत म्हणाली. उत्तरादेखील आत्या म्हणाल्या, " बरोबर बोलतेय सविता श्रीजा. अंग पुसलेल्या टॉवला हात लावून ति कशी पूजेच्या सामानाला हात लावणार होती? "

श्रीजा साळसूद पणे पुढे म्हणाली, " हे असंच सुरु आहे आई आल्यापासून. आता सुद्धा मला बाजूला नेवून मला म्हणतायत तुझ्या माहेरच्यांना भीक लागली आहे का ? आले नाही तर काहीतरी भेट पाठवून द्यायची ना. पण तुझं माहेर भिकारीच आहे. आता तुम्हीच सांगा कुठपर्यंत ऐकून घेऊ मी. भाऊ आणि बाबा दौऱ्यावर आहेत. वहिनीला सातवा महिना सुरु आहे. अश्यात आई माझ्या वहिनीला सोडून येणार आहे का ? माझ्या माहेरी नाही बाई कधी कोणी सुनेला त्रास दिला. इथेच असं सूरु आहे. "

श्रीजा चं बोलणं ऐकून सविताबाईंना धक्का बसला. त्या म्हणू लागल्या., " मी असं काहीही बोलले नाहीये. "

यावर संजय पुढे येत म्हणाला, " आई तू काय बोलू शकते आणि काय नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. त्यादिवशी सुद्धा श्रीजा विरुद्ध माझे कान भरलेस. तिला नको नको ते मी बोललो. पण तिच्या कॉल रेकॉर्डिंग मुळे मला कळलं की तू किती कांगावा केलास ते. आता प्लीज अजून त्रास नको देऊस आम्हाला. "

सासूबाईंना एवढ्या नातेवाईनकांसमोर कुठे तोंड लपवू नी कुठे नाही असं झालं. सासरे सविताबाई वर गर्जत म्हणाले. "तुम्ही बॅग भरायला घ्या. तुमच्यामुळे मुलांना अजून त्रास नको. "

सविताबाई निघाल्या तेव्हा श्रीजा पाया पडायला आली आणि कानात म्हणाली, " सासूबाई सुतावरून स्वर्ग मला देखील गाठता येतो. तेव्हा यापुढे लक्षात ठेवा. जसं तुम्ही माझ्यासोबत वागणार तसंच मी तुमच्या सोबत वागणार. "

सविताबाई निघाल्या तसं श्रीजा म्हणाली, " आई - बाबा काळजी घ्या. " आणि ते जाताच दार लावला आणि मोकळा निःश्वास टाकला.