" तुम्ही आताच्या आता या आणि तिला घेऊन जा."
त्याचा आवज अजूनही तिच्या कानात घुमत होता. निराश हताश नजरेने ती बाहेर बघत बसली होती. रात्रीचे अकरा साडेअकरा वाजून गेले होते. बाहेर अजूनही पाऊस पडत होता. हॉल मधलं वातावरण काहीसं टेन्शन देणारं होत. प्रतीक रागाने लाल झाला होता. हॉलचा मेन दरवाजा उघडा होता. बाहेरून येणारी गार हवा अंगावर शहारे आणत होती. प्रतीकची नजर दरवाज्याकडे टिकून होती. तर त्याची बायको राधिका खाली जमीनीवर बसली होती. गुढघ्यावर डोकं टेकवून तिने चेहरा लपवला होता. डोकं दुखत होत. मघाशी घडलेलं तिच्या मनातून काही जात नव्हत.
घरात शांतता होती, पण ती वादळापूर्वीची. सोफ्यावर बसलेल्या प्रतीकचा चेहरा रागाने लाल झाला होता. त्याच्या हातात मोबाईल होता, ज्यावर ५०,००० रुपये ट्रान्सफर झाल्याचा मेसेज ओपन होता.
“राधिका!”
प्रतीकचा आवाज थिजलेल्या शांततेला भेदून गेला, त्याच्या आवाजात एक वेगळीच धार होती,
"हे काय आहे? मला विचारल्याशिवाय पन्नास हजार रुपये तू कोणाला ट्रान्सफर केलेस?"
राधिका बेडरूमच्या दाराजवळ उभी होती. दोन वर्षांपूर्वी लग्न होऊनही प्रतीकने 'माझा पैसा' हा हक्क सोडलेला नव्हता. तिने कमावलेले पैसे सुद्धा त्याने आपलेच मानले होते. तिचा चेहरा पांढरा पडला.
"प्रतीक, ते आईसाठी आहेत..." ती दबक्या आवाजात म्हणाली.
"आईसाठी ? तुझी आई? मला विचारलं नाहीस?"
प्रतीक उठून तिच्याजवळ आला. त्याच्या डोळ्यांत संतापाची आग होती.
"तुला माहिती आहे का, हे पैसे कशासाठी जमवले होते? आपल्या भविष्यासाठी! आणि तू एका क्षणात... तुझ्या आईला काय गरज होती? आणि गरज असली तरी मला सांगायचं नाही ? " राधिकाने धीर धरला.
"मी तुला सांगणार होते. पण आईला लगेच गरज होती. तिच्या औषधांसाठी आणि प्रतीक, ते माझे पैसे आहेत. मी माझ्या पगारातून वाचवून जमवले आहेत."
“ तुझे पैसे ? ” प्रतीकने एक विचित्र हास्य केले. तिच्या जिव्हारी लागलं ते.
" लग्नानंतर काय तुझं आणि काय माझं ? सगळं आपलं असतं! पण हे पैसे मी कमावलेल्या पैशांसारखेच आहेत. माझी परवानगी घेणे बंधनकारक आहे. असं नाही का वाटतं तुला ! "
राधिकाला हे ऐकून खूप त्रास झाला. दोन वर्षांत प्रतीकने तिला 'एकटी' म्हणून जगू दिलेच नव्हते. तिचा पगार, तिचे निर्णय... सगळ्यावर त्याची मालकी. तिचे स्पष्टीकरण ऐकण्याची त्याची तयारी नव्हती.
"मी फक्त माझ्या..." राधिका काही बोलणार, तोच प्रतीकने तिला थांबवले.
"पुरे झालं तुझं स्पष्टीकरण! मला आता काही ऐकायचं नाहीये!"
त्याने लगेच तिचा फोन घेतला आणि कोणालातरी फोन लावला.
त्याने लगेच तिचा फोन घेतला आणि कोणालातरी फोन लावला.
"अनंतराव ? मी प्रतीक बोलतोय. हो, रात्रीचे खूप झालेत, मला माहिती आहे. पण आताच्या आता तुम्ही राधिकाला येऊन घेऊन जा. हो, घेऊन जा! या मुलीला काहीच संस्कार नाहीत. आई-वडिलांना मदत करण्यापूर्वी नवऱ्याला विचारायचं नसतं का? तिला शिकवण्याची खूप गरज आहे! तुम्ही कधी येताय?"
प्रतीकच्या कठोर शब्दांनी राधिका आतून हादरली. अपमान आणि दुःखाने तिचे डोळे भरून आले. ती फक्त उभी राहिली, शब्दांनी वेदना होत असतानाही. प्रतीकने फोन ठेवून दिला आणि राधिकाकडे तिरस्काराने पाहिले.
बाहेर पाऊस अधिकच वाढला. राधिकाच्या डोळ्यांतून अश्रूंचा पाऊस सुरू झाला. ती फक्त प्रतीककडे पाहत राहिली. 'संस्कार' आणि 'शिकवणे' हे शब्द तिच्या हृदयाला टोचत होते.
" अहो मी काहीच चुकीचं केलं नाही. आईला मदत करणं काही चुकीचं नाही." तिने शांतता चिरत बोलण्याचा प्रयत्न केला. तिने समजावण्याचा प्रयत्न केला.
" मदत करणं काही चुकीचं नाही ! खरचं असं वाटतं तुला ? माझ्या मागे तुझी असं काही करण्याची हिंमत कशी झाली ? या घरात पैसे कोण कमावतं ? या घरात अंतिम निर्णय कोण घेतं ? जबाबदारी कोणाची आहे ? " प्रतीक रागाने गुरगुरत होता.
" हे तुझं वागणं आता अतीच होत आहे. त्यापेक्षा तू एक काम कर. तूझ्या बापाला बोलावून घे. सांग त्याला, त्याच्या मुलीला एखाद्याची बायको बनण्याआधी जरा नीट शिकव. नवऱ्याची इज्जत कशी ठेवायची हे शिकण्याची गरज आहे तुला."
रागाने थरथरत होता. रागाच्या भरात त्याने आपल्या सासऱ्याला फोन केला होता.
रागाने थरथरत होता. रागाच्या भरात त्याने आपल्या सासऱ्याला फोन केला होता.
पलीकडे काही वेळ शांतता पसरली होती. ते म्हणाले,
" ठीक आहे अर्ध्या तासात येतो."
आता प्रतीक घड्याळाकडे बघत होता. वीस मिनिटे होऊन गेली होती. इतक्यात बाहेर गाडी थांबल्याचा आवज ऐकु आला. प्रतीकच्या चेहऱ्यावर जिंकल्याचा असुरी आनंद दिसत होता. त्याला वाटतं होत तिचे वडील तिला घेऊन जातील. किंवा इथेच तिला ओरडतील. तिलाच चार समजुतीच्या गोष्टी सांगतील. त्याचा पुरुषी अहंकार सुखावला होता.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा