स्वाभिमानी भाग 9
तो... नक्कीच नाही ,माझी पारखी नजर आहे मॅडम जी मुळात सुंदर आहे ती त्याची कदर करत नाही हे मी चांगलेच जाणतो..तू ही त्यातलीच..तुला कसलीच कदर नाही ,ना तुझ्या सुंदर केसांची, ना तुझ्या सौंदर्याची, ना ह्या तुझ्या हँडसम नवऱ्याची ,ना त्याने केलेल्या स्तुतीची..ना त्याने काढलेल्या फोटोंची...
ती... ok, ok, हँडसम नवऱ्या, माझी माघार..मला सगळ्यांची कदर आता तर करावीच लागणार आहे...माझी, माझ्या केसांची, माझ्या सो कॉल्ड सौंदर्याची,ह्या सगळ्यांची कदर करणाऱ्या माझ्या नवऱ्याची, त्याने काढलेली फोटोंची, त्याने भरभरून केलेल्या स्तुतीची ...आणि आता हातात असलेल्या वेळेची ही...ती त्याचे नाक ओढत त्याची समजूत घालून,ती म्हणते," parlour कडे निघायचे का आता म्हणत गाडी सुरू कर वेळ होत आहे हँडसम.."
तो पुन्हा तिच्या केसांतील येणाऱ्या सुगंधात पुन्हा रमतो ,एक श्वास भरतो आणि म्हणतो, खरंच इतके सुंदर केस कापायचे का तुला, मग तर मला त्यांच्यात असे पुन्हा रमता येणार नाही, त्या निमित्ताने तुझ्या श्वासात माझे श्वास ही असे अडकणार नाही...हेच केसू सावली आहे माझ्या साठी जिथे असा निवांत पणा घेऊ शकेल आता इथून पुढे मी...इतके दिवस मी इतका जवळ आलोच नाही, ही अनुभूती ही विलक्षण आहे ना सुप्रिया... आणि आजच हे समजले आणि आजच तुला मी केस कट करायला घेऊन जात आहे...खरंच गरजेचं आहे का हे करणे..ह्या लुक मध्ये ही तू सुंदर जानवतेस मला खूप...तुला आवडत असेल तर कर कट पण मला विचारशील तर मला हा लुक मनात बिजली पडावी तसा भासतो... अफाट सुंदर दिसतेस तू...नको कापू तू हे तुझ्या मानेवर रेंगळणारे केस...उडू दे त्यांना असेच जरा हेववर... मला बेधुंद करू दे ...
ती... तू तर कवी पण आहेस असे जाणवते मला..काय हे अचानक तुझ्या मनात आले..
तो.... तिच्या केसात हात घालत... त्यांना बोटाने गोल गोल फिरवत...आज माझी चॉईस हावी होते तुझ्या इच्छे वर..म्हणजे बघ तुझे मन झाले असेलच केस कापून टाकायचे, जरा वेगळा लुक आपण करू ह्यासाठी...पण मला वाटते तू राहू दे हेच लांब केस...
ती... काय ही द्विधा, मी मन बनवले होते...आणि तू...
तो... आता मी म्हणतो म्हणून मनाला तू मुरुड घालशील का, माझ्यासाठी
ती...ok, पण आईला काय सांगायचे...
आता आईला काय सांगणार होते हे दोघे..
क्रमशः?????
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा