Login

स्वामी भाग चार

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५

"डॉक्टर.. विधिता कधी पर्यंत ठीक होईल. म्हणजे किती दिवस किंवा महिने."विनीतने डॉक्टरांना विचारले.


"याबाबत अजून सांगता नाही येणार कारण
मानसशास्त्रीय उपचार आणि काही सायको सोशल मॉडेल वापरून पेशंटला त्यातून बरं केल जात. पण ते किती वेळ लागेल हे नक्की सांगता नाही येत."डॉक्टर म्हणाले.


"ओके डॉक्टर..."डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून विनीत एकदम शांत झाला. खरंतर इतकं छान सगळं सुरू असतांना हे नवीन संकट आल्याकारणाने सगळेच टेन्शन मध्ये होते.

विधिताचा स्वामींवर प्रचंड विश्वास होता म्हणून विनीत आई आणि विधिताच्या आईवर सगळं सोपवून अनवाणी अक्कलकोटला जायला निघतो. एकीकडे बायको आणि लेकीची काळजी आणि दुसरीकडे स्वामी नामाचा जप सुरू असतो.
पुण्याहून अक्कलकोटला पोहोचायला विनीतला दोन रात्र तीन दिवस लागतात. स्वामींच्या महाद्वाराजवळ जाताच पायांना होणाऱ्या लादीच्या थंडगार स्पर्शाने त्याच शरीर आणि मन दोन्हीही सुखावते आणि दोन दिवसांचा थकवा दूर करते.

समोर गाभाऱ्यात विराजमान झालेले स्वामी जणू त्यालाच बघत आहेत असा आभास विनीतला होत असतो. डबडबलेल्या डोळ्यांनी विनीत स्वामींसमोर हात जोडून उभा राहतो.


"तुमच्यापासून काही लपलेलं नाहीये स्वामी. माझी विधी आज कित्येक दिवसांपासून हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे. कोणताही प्रकारे तिच्यात सुधारणा होत नाहिये. तिला एक बाळ आहे जिला नुकताच जन्म दिला आहे तिने याचाही विसर पडला आहे. स्वामी..कसली परीक्षा घेत आहात माझी आणि माझ्या बाळाची. माझ्याकडून काही चुकलं असेल तर हात जोडून माफी मागतो मी पण माझ्या विधीला बरं लवकरात लवकर बरं करा. माझ्या लेकीला तिच्या आईचं प्रेम मिळू दे स्वामी. मी खूप हतबल झालोय. विधीने नेहमी तुमची मनोभावे सेवा केली आहे. कधीच काहीच मागितलं नाही तुमच्याकडे पण आज मी माझ्यासाठी आणि माझ्या लेकीसाठी तुमच्याकडे आलोय. माझ्या लेकीला तिच्या आईच्या कुशीची ऊब मिळू द्या स्वामी.. माझ्या लेकीला तिच्या आईच्या कुशीची ऊब मिळू द्या.' डोळयातून झरणारं पाणी बघून स्वामींची सेवा करणारे पुजारी बाहेर आले आणि त्यांनी त्यांच्या हातातली फुलांची माळ त्याचा समोर धरून म्हणाले.


"स्वामी कधीच त्यांच्या भक्ताला असं रिकाम्या हाती जाऊ देत नाही. हे घे..स्वामींच्या चरणाशी असलेली माळ आहे. ठेव तुझ्याजवळ."एवढ म्हणून पुजाऱ्यांनी ती माळ विनीतच्या हातात दिली.
विनीत पुन्हा हॉस्पिटल मध्ये आला. विधिताची तब्बेत सुधारण्याऐवजी आणखी खराब होत होती.
क्रमशः
©®श्रावणी लोखंडे


0

🎭 Series Post

View all