Login

स्वामी भाग तीन

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५

"विधी.. अगं परी रडतेय..तिला जवळ घे."विनीतची आई म्हणाली.
विधिता मात्र इकडे तिकडे भिरभिरत्या नजरेने बघत होती. विनीतच्या आईला ही बाब फार गंभीर वाटली म्हणून त्यांनी विधिताच्या आईला फोन करून बोलावून घेतले. तासाभरात त्याही हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या. विनीतला महत्वाची मीटिंग होती त्यामुळे नाईलाजास्तव त्याला जावं लागलं होतं


"अहो.. बघाना ही अशी का बघतेय सगळीकडे. परीला घेत सुद्धा नाहीये. मला खूप भीती वाटतेय." थरथरत्या स्वरात विनीतची आई म्हणाली.
विधिताच्या आईला वेगळीच शंका आली. विधिताचे बाबा गेल्यानंतर सरकारी हॉस्पिटलमध्ये मावशीचे काम केल्याकारणाने अश्या काही स्त्रियांना त्यांनी पाहिलं होतं ज्यांची डिलिव्हरी झाल्यानंतर मानसिक स्थिती ढासळते. अश्या नवीन आया ज्या मानसिक रित्या ढासळलेल्या असतात अशाच नवीन मातांची सगळी सोय वेळच्यावेळी आणि स्वच्छता याची जबाबदारी त्यावेळी विधिताच्या आईकडे होती.
त्यावेळी त्यांना आठवते ती त्यांनी देवाकडे केलेली प्रार्थना ..
देवा..या सगळ्या लेकींना बरं वाटू दे.. एक नवीन जीव यांच्या भरोश्यावर या जगात आला आहे.

विधिताची आई विनीतला थोडक्यात तशी कल्पना देऊन डॉक्टरांकडे त्यांची शंका मांडते.
डॉक्टर पण लागलीच पावलं उचलून सगळ्या टेस्ट करून घेतात आणि रिपोर्ट्स आल्यावर कळतं की विधिताच्या आईची शंका खरी ठरली.
पोस्टस्टपार्टम सायकोसिस नावाचा मानसिक आजार विधिताला जडला होता. विधिताच्या आईला अशा मानसिक रुग्ण असलेल्या नवीन मातांची काळजी कशी घ्यावी हे माहित असल्याने फार काळजीच कारण नव्हतं पण विधिताला पूर्णपणे बरं होण्यासाठी किती काळ लागेल याची माहिती नव्हती. विनीतला या सगळ्याचा खूप मोठा धक्का बसला. आपलं बाळ लहान आणि बायको मनोरुग्ण हे सत्य त्याला पचवणं खूप जड गेल्याकारणाने तो जागीच कोसळला. विनीतला लागलीच ऍडमिट करून घेतलं गेलं.

" बीपी शूट झाल्याने त्याला चक्कर आली काळजी करण्यासारखं नाहीये." असं डॉक्टर म्हणाले.


एकावेळी अशी सगळी संकटं धावून येत होती हे बघून विनितची आई रडकुंडीला आली.


"हे बघा ताई..आता आपल्याला दोन बाळांना सांभाळायचं आहे. तुम्ही बाळाची काळजी घ्यायची आणि मी विधिताची. जावई...आता तुम्ही पण खंबीर व्हायला पाहिजे. आपल्याला तुमच्या विधीला पूर्ण बरं करूनच घरी न्यायचं आहे समजलं. सगळं ठीक होईल काळजी करू नका." विधिताची आई विनीतला आणि त्याच्या आईला समजावणीच्या सुरात म्हणाली.
क्रमशः
©®श्रावणी लोखंडे

0

🎭 Series Post

View all