Login

स्वामी भाग दोन

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५


"विधी.. श्वास घे राणी. विधी मी आहे काळजी करू नको."स्ट्रेचरवर असलेल्या विधीताचा हात हातातून सुटला. डॉक्टरांनी आयसीयू मध्ये जाण्याआधी विनितला खांद्याला थोपटून त्याला दिलासा दिला.

विनीतने त्याच्या आईला आणि विधिताच्या आईला लगेच फोन करून विधिताला ऍडमिट केल्याचं कळवलं. दोघीही लागलीच हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या. विनीतची बहिण सुद्धा आली. आधीच अंगात रक्त कमी असल्यामुळे डॉक्टरांनी ब्लड बँक मध्ये जाऊन विधिताच्या ब्लड ग्रुपच रक्त तयार ठेवायला सांगितलं होतं. राहिलेल्या फॉर्मलिटी रिसेप्शनवर जाऊन पूर्ण करून विनीत पुन्हा सगळ्यांसोबत आला. तासाभराने डॉक्टर बाळाला घेऊन बाहेर आले.


"अभिनंदन..मुलगी झाली." डॉक्टर म्हणाले

आनंदाच्या भरात काय करू आणि काय नको अशा अवस्थेत असलेल्या विनीतने त्याच्या बहिणीला घट्ट मिठी मारली आणि अश्रूंना वाट मोकळी करून करून दिली. नंतर दोन्ही हातांनी डोळे पुसून त्याने त्याच्या परिराणीला अलगद आपल्या दोन्ही हातात घेतले. इवली इवली परी आणि तिचा तो उबदार स्पर्श अनुभवून त्याच्या डोळ्यात पुन्हा एकदा पाणी तरळलं.


"आई..आई..मी बाबा झालो आई..मी बाबा झालो."आईने आणि बहिणीने त्याला दोन्ही बाजूंनी हलकी मिठी मारून बाळाच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. बाळाला विधिताच्या आईकडे दिल्यावर तिच्याही डोळ्यांत आसवं दाटून आली.


"जणू माझ्या विधीचं बालपण पुन्हा बघते असं वाटतेय. जावईबापू..खूप खुश आहात ना..तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे तुमची परिराणी भेटली. विधी सांगायची मला 'आई.. विनीतला माझ्यासारखी गोड गोड परी पाहिजे म्हणे' तुमची परी आली हो. लक्ष्मी आली. अभिनंदन आत्याबाई आणि आजीबाई" विधिताची आईं विनीतच्या आईला आणि बहिणीला शुभेच्या देत म्हणाली.

"तुमचंही अभिनंदन विहिणबाई."दोघी विहिनींनी एकमेकींना मिठी मारली. पण म्हणतात ना जिथे सगळं काही छान असतं तिथे दृष्ट लागतेच. इथेही सगळ्या आनंदावर दुःखाचं सावट दबा धरून होतं.

"थँक यू विधी..तुझ्यासारखी गोड परिराणी मला दिलीस. तुझ्यामुळे मला बाप बनण्याचं सौख्य लाभलं. माझ्या लहानपणी मला बाबांचं प्रेम मिळालं नाही पण आता बाप म्हणून मी माझ्या लेकीवर खूप खूप प्रेम करेन.. थँक यू सो मच" विधिताच्या कपाळावर ओठ टेकवत विनीत म्हणाला.

आठेक दिवसांनी विधिताच्या वागण्यात खूप फरक पडायला लागला. बाळ रडले काय किंवा कोणी काही सांगितलं काय
विधिताच्या चेहऱ्यावर मात्र काहीच भाव नव्हते. जणू तिला या सगळ्याशी काहीच देणं घेणं नाहीये. विनीतला वाटलं सिजेरियन मुळे त्रास होतं असावा तिला म्हणून विधिता जास्त काही बोलली नाही.
काळजीपोटी त्याने विधिताला पुन्हा हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं.
क्रमशः
©®श्रावणी लोखंडे

0

🎭 Series Post

View all