भाषण क्रमांक 1
आज 12 जानेवारी म्हणजे राष्ट्रीय युवा दिन म्हणून आपण साजरा करतो पण हा दिवस म्हणजे स्वामी विवेकानंद यांचा जन्म दिवस आहे आणि त्यांचा जन्म दिवस म्हणजेच राष्ट्रीय युवा दिन म्हणून आपण साजरा करतो.
आज 12 जानेवारी म्हणजे राष्ट्रीय युवा दिन म्हणून आपण साजरा करतो पण हा दिवस म्हणजे स्वामी विवेकानंद यांचा जन्म दिवस आहे आणि त्यांचा जन्म दिवस म्हणजेच राष्ट्रीय युवा दिन म्हणून आपण साजरा करतो.
सुर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे व्यासपीठ, आणि व्यासपीठावरील अध्यक्ष गुरुजन वर्ग, परीक्षक आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार! आज मी जे सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही नम्र विनंती
स्वामी विवेकानंद यांचा जन्म कोलकता इथे 12 जानेवारी 1863 दिवशी एका बंगाली कुटुंबात झाला.त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त होते तर आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते. त्यांचे नाव आई-वडिलांनी नरेंद्र असे ठेवलं. ते लहानपणापासून कुशाग्र बुद्धिमत्तेचे धनी होते.ते शिक्षण घेत असताना ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल त्यांचे विचार मंथन सुरू असायचे. असे विचार मंथन सुरू असतानाच त्यांची भेट स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्याशी झाली आणि विवेकानंद यांनी त्यांचे शिष्यत्व स्वीकारले.स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्याकडूनच स्वामी विवेकानंद यांना दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली.
आणि पुढे नरेंद्र स्वामी विवेकानंद या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांनी तरुण्यातच संन्यास घेतला. ते हिंदू धर्माचे प्रचारक आणि तत्वज्ञ होते. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य लोककल्याण आणि देशाला समर्पित केले होते.त्यांचे गुरू स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्या मृत्यूनंतर यांचे पवित्र कार्य पुढे नेण्याची जबाबदारी स्वामी विवेकानंदांवर आली आणि ती त्यांनी समर्थपणे पेलली. हिंदू धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी त्यांनी भारतभर भ्रमण केलं. त्यांना त्यात आपल्या मातृभूमीच्या दहा समस्यांची जाणीव झाली आणि त्या सोडवण्यासाठी त्यांनी त्यांचे विचार मांडले.
१८९३ मध्ये शिकागो येथे भरलेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद हे भारतीय संस्कृती व हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.
त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीच्या 'माझ्या बंधू आणि भगिनींनो' या दोनच शब्दांनी संपूर्ण जगाला जिंकले होते. भारतीय तत्त्वज्ञानाच्या किनान्यापासून पाश्चात्यां 'च्या विज्ञानवादापर्यंत समन्वयाचा खळखळाट करत वाहणाऱ्या त्यांचा अमोघ वक्तृत्त्व वाणीने सारे पाश्चात्य देश दिपून गेले.पाश्चात्यांना भारतीय तत्वज्ञानाची शिकवण देऊन १८९७ साली ते भारतात परतले. इंग्लंडमधून निघतांना एका इंग्रज मित्राने त्यांना एक प्रश्न केला.
"विलासाची लीलाभूमी असलेली पाश्चात्यभूमी सोडल्यावर चार वर्षांनी आपली मातृभूमी आपल्याला कशी वाटेल?
त्यावर स्वामीजींनी उत्तर दिले,
“पाश्चात्य देशात येण्यापूर्वी मी फक्त भारतभूमीवर प्रेम करत होतो. पण आता भारत हा माझ्यासाठी तीर्थ होऊन बसला आहे,
जेव्हा स्वामी विवेकानंदांनी भारतभूमीत प्रवेश केला तेव्हा तेजाचा देदीप्यमान पुतळा असलेल्या या महान युगपुरुषांच्या स्वागतासाठी संपूर्ण राष्ट्र उभे 'राहिले. अवघ्या चाळीस वर्षांच्या मर्यादीत आयुष्यात अमर्याद अशा विचार आणि कर्तृत्वाने त्यांनी भारतीयांच्या समोर एक दीपस्तंभ उभा केला.
स्वामीजींच्या प्रखर बुद्धिमत्तेने सारे जग आश्चर्यचकीत झाले. त्यांच्या अढळ तपस्वितेतून समाजमनावर आदर्शाचे प्रतिबिंब उमटले. त्यांच्या महान तेजाने सारे जगच दिपून गेले आणि त्यांच्या महान विचारांनी दशदिशाही प्रकाशमान झाल्या अशा या युगपुरुषाला विनम्र अभिवादन !
समाजमनावर आदर्शाचे प्रतिबिंब उमटले. त्यांच्या महान तेजाने सारे जगच दिपून गेले आणि त्यांच्या "महान विचारांनी दशदिशाही प्रकाशमान झाल्या. वयाच्या अवघ्या चाळिसाव्या वर्षी म्हणजे 4 जुलै 1902 साली या तेजस्वी आणि ओजस्वी महापुरुषाने बेलूर मठ, हावडा येथे अखेरचा श्वास घेतला.
अशा या युगपुरुषाला विनम्र अभिवादन !
भाषण क्रमांक 2
आदरणीय व्यासपीठ माझे पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे उपस्थित माझ्या बाल मित्रांनो. आज आपण इथे जमलो आहोत एका महान व्यक्तीची जयंती साजरी करायला. ते महान व्यक्ती म्हणजे स्वामी विवेकानंद आज 12 जानेवारी म्हणजे स्वामी विवेकानंद यांची जयंती. हा दिवस आपण राष्ट्रीय युवा दिन म्हणून ही साजरा करतो.
आदरणीय व्यासपीठ माझे पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे उपस्थित माझ्या बाल मित्रांनो. आज आपण इथे जमलो आहोत एका महान व्यक्तीची जयंती साजरी करायला. ते महान व्यक्ती म्हणजे स्वामी विवेकानंद आज 12 जानेवारी म्हणजे स्वामी विवेकानंद यांची जयंती. हा दिवस आपण राष्ट्रीय युवा दिन म्हणून ही साजरा करतो.
स्वामी विवेकानंद यांचा जन्म कोलकता इथे 12 जानेवारी 1863 दिवशी एका बंगाली कुटुंबात झाला.त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त होते तर आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते. त्यांचे नाव आई-वडिलांनी नरेंद्र असे ठेवलं. त्यांचे वडील विश्वनाथ दत्त हे कोलकता उच्च न्यायालयात नामवंत वकील होते. ते लहानपणापासून कुशाग्र बुद्धिमत्तेचे धनी होते.त्यांना लहानपणापासूनच एकटं ध्यान करण्याची आवड होती.त्यांनी इतिहास, साहित्य आणि तत्वज्ञान या विषयांचा अभ्यास केला आणि बी.ए ची परीक्षा प्रथम विभागात पास झाले.
त्यांना सर्व काही जाणून घेण्याची इच्छा होती. त्यांचा जास्त कल हिंदूधर्म आणि वेद यांच्याकडे होता. ते लहानपणी प्रत्येकाला विचारायचे की
“तुम्ही देव पाहिला आहे का?”
ब्राह्मो समाज ही एक आधुनिक हिंदू चळवळ होती ज्यामध्ये त्यांच्या अनुयायांनी भारतीय समाज आणि जीवनाचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला आणि आध्यात्मिक ज्ञानाचा प्रचार केला. त्यांनी प्रतिमा आणि मूर्तींच्या पूजेला विरोध केला. मात्र, ब्राह्मसमाजाची समज विवेकानंदांना तेवढी अध्यात्म देऊ शकली नाही. त्यांच्या आयुष्यात अध्यात्मिक अनुभवांची सुरुवात अगदी लहानपणापासूनच झाली आणि वयाच्या १८ व्या वर्षी त्यांच्या मनात “देव पाहण्याची” इच्छा निर्माण झाली.
ते मोठे झाल्यावर देव आणि धर्म या विषयी त्यांचे विचार मंथन सुरू होते आणि त्यांना रामकृष्ण परमहंस भेटले. आणि इथेच त्यांच्या आयुष्याला नवीन वळण मिळाले. रामकृष्ण परमहंस हे महाकालीचे निस्सीम भक्त होते आणि त्यांना महाकालीने प्रत्येक्ष दर्शन दिले होते. अशा व्यक्तीचे शिष्यत्व स्वामी विवेकानंद यांनी स्वीकारले.रामकृष्ण परमहंस यांच्याकडूनच त्यांना सर्वोच्च ज्ञान प्राप्त झाले. त्यांनी रामकृष्ण परमहंस यांच्या मृत्यू नंतर घर सोडले. आणि हिंदू धर्माच्या प्रचार आणि प्रसासाठी भारत भ्रमण केलं. ते वेदांचे गाढे अभ्यासक होते.
त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली आणि त्यातून अनेक सामाजिक कार्य आणि हिंदू धर्माचा प्रचार केला.
१८९३ मध्ये शिकागो येथे भरलेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद हे भारतीय संस्कृती व हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.
१८९३ मध्ये शिकागो येथे भरलेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद हे भारतीय संस्कृती व हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.
त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीच्या 'माझ्या बंधू आणि भगिनींनो' या दोनच शब्दांनी संपूर्ण जगाला जिंकले होते. भारतीय तत्त्वज्ञानाच्या किनान्यापासून पाश्चात्यां 'च्या विज्ञानवादापर्यंत समन्वयाचा खळखळाट करत वाहणाऱ्या त्यांचा अमोघ वक्तृत्त्व वाणीने सारे पाश्चात्य देश दिपून गेले.
उद्घाटन समारंभात बोलणाऱ्या शेवटच्या काही लोकांपैकी विवेकानंद हे एक होते. त्यांच्यासमोर बोलणाऱ्या व्यक्तीने स्वतःच्या धर्मातील चांगुलपणा आणि विशेष गोष्टी सांगितल्या, परंतु स्वामी विवेकानंदांनी सर्व श्रोत्यांना संबोधित केले आणि सांगितले की त्यांचा दृष्टिकोन हा देवासमोर फक्त सर्व धर्मांचा एकता आहे. स्वामी विवेकानंद हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करण्यासाठी चीनला गेले. परंतु विवेकानंदांनी आपला धर्म मोठा आणि चांगला दाखविण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही, उलट त्यांनी मानवतेप्रती विश्वधर्म समरसता आणि अध्यात्माची भावना व्यक्त केली.
अमेरिकेत विवेकानंदांनी आपल्या जवळच्या शिष्यांना वेदांताची शिकवण पसरवता यावी म्हणून त्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. आपल्या शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी अमेरिका आणि ब्रिटन या दोन्ही ठिकाणी छोटी केंद्रे सुरू केली. विवेकानंदांना ब्रिटनमध्ये वेदांताची शिकवण घेण्यात रस असलेले काही लोकही सापडले.
मिस मार्गारेट नोबल हे त्या उल्लेखनीय नावांपैकी एक होते जे नंतर मिस निवेदिता बनले. त्या आयर्लंडच्या होत्या ज्या विवेकानंदांच्या शिष्य होत्या. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतीय जनतेसाठी समर्पित केले. पाश्चात्य देशांमध्ये काही वर्षे घालवल्यानंतर विवेकानंद भारतात परतले. सर्वांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. भारतात परतल्यानंतर स्वामी विवेकानंदांनी भारतातील त्यांच्या मठांची पुनर्रचना केली आणि त्यांच्या वेदांतिक तत्त्वांच्या सत्याचा प्रचार करण्यास सुरुवात केली. निस्वार्थ सेवेचे फायदेही त्यांनी सांगितले.
स्वामी विवेकानंद यांचे 4 जुलै 1902 रोजी वयाच्या 39 व्या वर्षी बेलूर, भारत येथे निधन झाले. पण आपल्या आयुष्याच्या या अल्पावधीतही त्यांनी खूप काही शिकवले जे आजपर्यंत संपूर्ण जगाच्या स्मरणात आहे. या कारणास्तव स्वामी विवेकानंदांना आधुनिक भारताचे संरक्षक संत म्हणून नाव देण्यात आले.
अशा या संतास माझे कोटी कोटी नमन!