Login

स्वप्न चालून आले बघता बघता भाग १

आपल स्वप्न पूर्ण करणारा जोडीदार मिळाला की लग्नगाठ हवीशी वाटते.
" टिना उठ लवकर अजून किती वेळ अशीच झोपून राहणार आहेस तू."

" आई एकच दिवस असतो सुट्टीचा त्यातून पण तू नीट झोपून देत नाही."

" सीमा झोपू दे माझ्या राणीला. नको उठवू सारखी. आठवडाभर काॅलेज, प्रॅक्टिकल मधे स्वत:चे भान विसरुन अभ्यास करत असते."

" घ्या, तुम्ही आता तिचीच बाजू. आता थोड्या दिवसांनी तीचे लग्न करुन सासरी पाठवायची तयारी करावी लागणार आपल्याला."

" आई, मी तुम्हा दोघांना सोडून कुठेच जाणार नाही. इथेच राहणार."

" तस असत तर मी सुद्धा माझ्या आई-बाबांच्या घरी नसते का? मी पण अशीच तुझ्यासारखी बोलायचे. पण पासतेस ना माझे लग्न होवून आता तुझ्या देखील लग्नाची वेळ आली आहे."

" मला आधी शिक्षण पूर्ण करु दे. त्यानंतर शिक्षणाचा उपयोग करत प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेवू दे. मग पुढे लग्नाच बघू."

" आता बोलल आणि लगेच झाले. असे होत नाही. लग्न ठरायला कधी तीन-चार वर्ष देखील लागतात. तुझी परीक्षा संपली की आपण मुल पाहण्याच्या तयारीला लागणार आहोत. आणि तुझी नोकरी हि नव-याची घरी गेल्यावर करायची."

" बाबा आईला काही समजवाना. आज सुट्टीच्या दिवशी सकाळी सकाळी काय चालले तिचे."

" सीमा लग्नाचे बघायला अजून वेळ आहे. तिला मोकळेपणाने जगू दे."

" सितारा अग ये ना. आज आपण मिळून प्रोजेक्ट पूर्ण करणार आहोत ना."

" मला यायला उशीर झाला का ग. "

" नाही ये ना."

" मला तुला काहीतरी सांगायचे आहे."

" सांग‌ ना."

" मला यापुढे काॅलेज पूर्ण नाही करता येणार."

" काय झाले. परीक्षा तरी देशील ना? "

" नाही. काहीच नाही करता येणार मला."

" अग पण झाले तरी काय? "

" माझ्या मामाने एक स्थळ लग्नाकरता आणले आहे. मुलाच्या घरी खूप चांगले आहे. त्यांना माझा फोटो मामाने दाखवला होता. त्यांना मी पसंत पडले. आईला देखील स्थळ आवडले. परत असे स्थळ लाखात भेटणार नाही. मला लग्न करायचे नाही असे नाही ग. पण परीक्षा तरी व्हायला हवी होती. निदान पदवीधर झाल्याची डिग्री हातात आली असती."

" वा.. वा.. अभिनंदन! सितारा तुझे. आम्ही सकाळी टिनाच्या लग्ना विषयी बोलत होतो. त्यात तुझे लग्न ठरले."

" काकू पण माझी परीक्षा? "

" पुढे जावून संसारच करायचा आहे. त्यापेक्षा जे होतय ते गोड मानून घ्यायचे."

" अग काय मुलींमधे चालले तुझे. आपण बाजार घेवून येवूया. त्यांना करु दे अभ्यास त्यांचा."

" मी काकूंना समजवायला घरी येवू का? " रडणा-या सिताराला धीर देत टिना बोलत होती.

" काहीही झाल तरी माझी आई ऐकणार नाही. बाबा गेल्यापासून तिने एकटीने आम्हा दोघी बहिणी आणि भावाचा सांभाळ केला आहे. तिच्या मना विरुद्ध जाता येणे शक्य नाही."

टिना समजावू शकेल का सिताराच्या आईला पाहुया पुढच्या भागात.

🎭 Series Post

View all