" काकू येवू का घरात. गरमा गरम कांदा भजीचा वास येतो आहे खमंग."
" टिना ये की. आज कसे काय आली घरी. तुला सितारा जवळ कधीच निरोप पाठवला होता. टिनाला घरी बोलव म्हणून."
" आजचा मुहर्त मिळाला बघा घरी यायला."
" सितारा आताच किराणा मालचे थोडे से सामान आणायला गेली आहे. येईल इतक्यात. तोपर्यंत तू हि कांदा भजी खा."
" काकू तुमच्या हातची कांदा भजी म्हणजे दुग्धशर्करा युक्त योगच. आणि माझ तुमच्याकडेच काम आहे. सितारा येण्याच्या आत कदाचित मी जाईल इथून. जर नाही गेले तरी तिला सांगू नका मी आले होते घरी ते."
" एवढे काय काम काढले माझ्याकडे तू."
" तुम्ही सिताराच लग्न फिक्स केल मी ऐकले आहे."
" हो ग. मुलगा लाखात एक आहे. चांगला शिकला,नोकरी करतोय मोठ्या कंपनीत."
" सगळे बरोबर आहे तुमचे काकू. माझ एक ऐकाल का? "
" सांग ना काही बोलली का सितारा तुला."
" ती नाही पण मला अस वाटत. निदान तीची परीक्षा होवू द्या. शेवटचच वर्ष आहे. नाहीतर दोन वर्षाची तिची मेहनत वाया जाईल.शिवाय एक आनंदाची बातमी सांगणार आहे तुम्हांला मी. सितारा आता झालेल्या तोंडी परीक्षा आणि सेमिस्टर मधे पहिल्या नंबरने पास झाली आहे."
" मी तरी काय करु सांग. अस स्थळ परत येणार नाही बघ. काॅलेजातून फोन पण आला होता. मला भेटायला बोलवल होत. पण आता लग्नाच्या गडबडीमुळे जाता आलच नाही."
" काकू एकदा माझ्यासाठी सिताराच्या शिक्षणा विषयी विचार कराल का? "
" हे बघ टिना आता सगळ तिच्या सासरच्या मंडळींवर टिकून आहे. त्यांना पुढे शिकवायच असेल तर शिकू देतील नाहीतर नाही."
टिना उदास मनाने सिताराच्या घरातून निघून गेली होती. परीक्षा जवळ आली होती. सिताराच्या काळजीने टिना आजारी पडली होती. पण तितक्याच जिद्दीने तिला परीक्षा चांगल्या मार्काने पास देखील व्हायची होती. टिनाचे पेपर उत्तम पद्धतीने जातात. त्या कालावधीतच सिताराचे लग्न झाले होते.
" काकू सितारा कधी येईल आता."
" आता ती सासूरवाशीण आहे. तिला सासरकडचे सोडतील तेव्हाच येईल ती माहेरी."
" ती फोन देखील उचलत नाही. आणि परत काॅल बॅक पण करत नाही."
" तिच आताच लग्न झाले. सासरच्या लोकांमधे रमत असेल. काही काम करत असेल."
" बर काकू. तुम्ही कधी जाणार आहात तिला भेटायला? तेव्हा मला सांगा मी पण येईल तिला भेटायला. परीक्षेमुळे तिच्या लग्नाला मला येता आले नव्हते."
टिना आणि सिताराची भेट होईल का? टिना सिताराच्या आईसोबत सिताराची भेट घेईल की एकटीच सिताराला भेटायला जाईल पाहूया पुढच्या भागात.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा