" आई एक विचारायच होत तुला."
" बोल ना काय ग? "
" सिताराची आई अजून तिला भेटायला गेली नसेल का? मला सांग म्हटले होते."
" तिच्या आईचे काहीतरी दुसरे काम निघाले असेल, किंवा सितारा कामात असेल दुस-या."
" महिना होत आला आई. काकूंना मी सांगितले होते. आता परीक्षा संपल्या तर मला सुट्टीच आहे. तरीपण त्या काहीच बोलल्या नाही."
" तुला जायचेच असेल तर, बाबांना रविवारी सुट्टी असते. तेव्हा तिला फोन करुन घरी जा तिच्या."
" तेच तर ती फोनच उचलत नाही माझा."
तेवढ्यात फोनची रींग वाजली होती.
" फोन घे तिचाच असेल बघ. "
" काहीतरीच तुझे. इतक्या दिवस म्हणजे महिनाभर फोन केला तरी परत केला नाही. आणि आता ती करते होय फोन मला."
" बघ तर खर मग बोलत बस तू."
" खरच तिचाच फोन आहे आई. "
" बोल मग आता पोटभरुन."
" हॅलो ऐक ना मला बोलायच आहे."
" वाह बोला सितारा मॅडम. लग्न काय झाले तुम्ही विसरल्या मैत्रिणीला."
" अग काय सांगू तुला मी आईकडे आली आहे. आपण भेटायच का? "
" कधी? आत्ता येवू का मी घरी तुझ्या बोल."
" नको आपण सागर कॅफे मधे भेटूया तू तिकडेच ये. संध्याकाळी पाच वाजता भेटूया."
" चालेल ना."
" काय सांगू तुला. माझ लग्न झाले खरे. पण.. "
" काय झाले नवरा ठिक वागतो ना तुझ्याशी. सासू-सासरे त्रास देतात का? "
" ऐकून घेशील का नाही माझे."
" सांगा."
" नवरा खूप चांगला मिळाला बघ. मला समजून घेतो."
" मग अडचण नेमकी काय आहे."
" मी पुढे शिकण्याची इच्छा नव-याजवळ व्यक्त केली. तो मला शिकवण्यासाठी तयार आहे. पण सासूबाई तयार होत नाहीत. त्यांच म्हणण असे आले की घरदांज घरातल्या बायकांनी शिकायच नाही जास्त. आणि शिकल्या तरी घराबाहेर जावून त्यांना नोकरी करता येणार नाही."
" तुझा नवरा तुला पाठिंबा देतो ना. मग झाले तर. "
" ते आहेच. पण सासूने आईला फोन करुन हि गोष्ट सांगितली. सासूने आईला समजवायला हवे म्हणून मला माहेरी मोकळ्या मनाने पाठवले आहे. हे अस झाले दोघींच्या मनाप्रमाणे घडतय. "
" लग्न झाल्यावर हे पण एक मोठे टेन्शन असते हे मला आताच कळते."
" मला काही समजत नाही काय करु. आदेशला देखील काही कळत नाही."
" मला एक सुचतय. म्हणजे हे बघ तू बाहेरून परीक्षा देत रहा. घरात राहून अभ्यास करु शकते."
" ते खर, पण क्लास तर लावायला हवे. अकाऊंट विषय त्याशिवाय कळणार कसा."
" तासाभराचा प्रश्न आहे. काहीतरी सांगायच."
" रोज काय नविन सांगू.आणि तिच वेळ कशी साधायची."
सिताराच्या पुढिल शिक्षणाकरता टिना योग्य सबब देवू शकेल का? आदेश यावर काही उपाय शोधेल का? पाहुया पुढिल भागात.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा