Login

स्वप्न चालून आले बघता बघता भाग ४

स्वप्न पूर्ण करणारा जोडीदार मिळाला की लग्नबंधन हवेशे वाटते.
" हे तर कोडच आहे बघ. पण तरी मला वाटत तू एखाद्या लहान मुलाला शिकवायला त्यांच्या घरी जाते सांग. किंवा त्याचवेळी एक भाजीपाला वाला फ्रेश भाजी‌ घेवून येतो अस काहीतरी सांग."

" नाही ग यातल कोणतेच कारण न पटण्यासारख आहे. बर चल संध्याकाळी आदेश घ्यायला येणार आहेत. तुझ्याशी बोलून मन हलके झाले. सासू समोर मला बोलताच आले नसते."

" काळजी घे तुझी. काय होतय फोन करुन सांगत जा मला."

" कधीची बाहेर जावून बसली होतीस ग. काय आणायला गेली होती. जावई बापू कधीची तुझी वाट पाहत आहेत."

" ते मला आवडणारा फाफडा आणि भोपळ्याची मिरची या स्वीट वाल्याकडे नव्हती तर मी गावातल्या अंबिका स्वीट मधे ते आणायला गेले होते. तिथली बालुशाही आणि सुतारफणी पण आणली घरी न्यायला."

" इतक्या लांब गेली होतीस का तू. अग बबनला सांगायच त्याने आणले असते."

" अग त्याची परीक्षा चालू आहे. कुठे काम सांगायच त्याला."

" चला येवू का आता आम्ही."

" पोहचल्यावर फोन करा."

" हो आई करते फोन. बबन्या नीट अभ्यास कर. "

" हो, ताई."

" भेटली का जीवाभावाची मैत्रिण."

" हो. भेटली ना. पण तिच्या कडून देखील काही मार्ग सापडलाच नाही."

" मला एक सुचलय. पण वेळ आल्यावर सांगेल मी."

" आता तुम्हीच यावर उपाय काढू शकता."

आदेश कंपनीच्या कामानिमित्त दुस-या शहरात ‌ महिनाभरासाठी गेला होता. तो आता कंपनीचे काम आवरुन घरी परत येतो.

" कधी आलात तुम्ही. मी भाजी आणायला गेले होते. तुम्ही येणार म्हणून तुमच्या आवडीची घोसाळ्याची भजी बनवणार आहे आज मी."

" अरे वा! मस्तच. आज मला पण एक गोष्ट सांगायची आहे."

" काय ओ. "

" सर्वांना एकत्रच जेवणाच्या टेबलावर सांगेल."

" आई-बाबा मला बोलायच आहे थोड. कंपनी कामानिमित्त माझी तीन वर्षांकरता मुंबईत बदली झाली आहे. पुढच्या आठवड्यात मला जावे लागेल."

" तीन वर्ष? " आश्चर्यजनक चेह-याने सितारा आदेशकडे पाहत होती.

" अरे पोरा तुझ आताच लग्न झालय. या पोरीला इथे सोडून तिकडे जाणार. आतापर्यंत तुझी बदली नाही झाली. आता कशी झाली? "

" आई अधून-मधून भेटायला येवू की आम्ही."

" आम्ही म्हणजे अजून कोणाला बरोबर घेवून जाणार आहेस तू."

" बाबा मी आणि सितारा. मी माझ्यासोबत सिताराला घेवून जाणार आहे."

" तिला एकटीला तिकडे करमेल का? आणि ती इथे राहिली तरच तिची सासारच्या लोकांशी ओळखी-पाळखी होतील."

" तुला इतरांची पडली आहे का? पोरगा आणि सून एकत्र राहणार याचा आनंद नाही का तुला."

" आई मला कळतय तुला काय वाटे ते. पण तू काळजी नको करु. सुट्यांमध्ये, सणवाराला आम्ही तुझ्या समोर हजर राहणार."

सिताराची सासू आपल्या मुलाबरोबर तिला पाठवेल का? सिताराच स्वप्न पूर्ण करण्यात आदेश तिला शेवटपर्यंत साथ देईल का? लग्नाविषयी टिनाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल का? पाहुया अंतिम भागात.

🎭 Series Post

View all