Login

स्वप्न चालून आले बघता बघता अंतिम भाग ५

स्वप्न पूर्ण करणारा जोडीदार मिळाला की लग्नबंधन हवेशे वाटते.
" सितारा आवरल का नाही तुझे अजून."

" अहो, झालय आवरुन."

" चल आता निघायला हव. आई-बाबा काळजी घ्या. येतो आम्ही. "

" तुम्हा दोघांना एकदम अस जाताना पाहून मला चांगल वाटत नाही. आदेश थोडे दिवस हिला राहू दे आमच्या बरोबर नंतर हवतर आम्ही घेवून येतो तिला."

" सामानाची बांधाबांध झाली आता. गाडी पण ठरवली आहे. हवतर आम्ही दोघे भेटायला लवकरच येतो. पण आता जावू दे."

" तू जा. मी हिला सांभाळतो. जा सूनबाई सुखाने संसार करा."

" मला एक सांगा अचानक तुमच्या कामाने कसे काय दुस-या शहरात पाठवले."

" तुला अजूनही समजले नाही का? "

" नाही."

" तुझ्या शिक्षणाकरता आपण इथे शिफ्ट झालो. आणि मी माझी बदली करुन घेतली."

" आदेश, तुम्ही माझ्याकरता एवढ मोठ पाऊल उचलल. "

" सप्तपदीमधे एकमेकांना आपण वचन दिले होते. एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होणार. तुझ स्वप्न हे माझे मानून मी जगणार."

" तुमच्याशी लग्न करायला आधी मी चलबिचल होते. पण आता माझी खात्री पटली जोडीदार जर आपल स्वप्न स्वत:चे समजून घेणारा लाभला तर जीवनात अजून काय हव. "

" वा!! तुला किती छान बोलता येत."

" मस्करी नाही मी खरच बोलत आहे."

"बर ,बायको आपल्या घराच्या पुढच्या गल्लीतच तुझा क्लास आहे. परवा पासून सुरु होईल. मी तुझा आॅनलाइन फाॅर्म देखील भरला आहे."

" माझे डिटेल्स तुम्हांला कसे कळाले."

" बबनकडून मी ते डिटेल्स मिळवले. आणि तुझा फाॅर्म भरला पण. आता अभ्यासाला तयार रहा."

" तो तर माझ्या आवडीचा विषय आहे."

सितारा जोमाने अभ्यासाला लागली होती. अधून-मधून सितारा आणि आदेश आई-बाबांकडे चक्कर मारुन येत होते. सिताराची परीक्षा आता जवळ आली होती. क्लास लावल्यामुळे सितारा परीक्षेत चांगले पेपर लिहू शकली होती.

सिताराची परीक्षा झाली. आता घरात ती कंटाळत होती. जवळच्याच कंपनीत तिने नोकरी करता अर्ज भरला होता. त्यात ती सिलेक्ट झाली होती. मूळता हुशार असल्याने तिने काम काही दिवसात आत्मसात केले होते. सिताराचे जग आदेशच्या एका निर्णयामुळे बदलले होते. आई-बाबा देखील खूश होते. आणि सितारा तिला आवडीच्या गोष्टी करता येतात म्हणून आनंदी होती.

" टिना मी बोलते. कशी आहेस तू."

" मी मस्त. तू सांग."

" मी मुंबईत आले राहायला. मी आणि आदेश. त्यांची इकडे बदली झाली. आणि माझा परीक्षेचा फाॅर्म पण भरला त्यांनी. मी इथे छोटीशी नोकरी पण करते.'

" काय सांगते. शेवटी उपाय निघाला तर. तू तुझ स्वप्न आज जगत आहे. दुसर काय हव मला."

" कालच एक स्थळ आलय मला. मी तुझाच विचार करत होते. लग्नानंतर सगळे बदलले तर कस होईल. हाच विचार चालला होता. पण तुझ्याशी बोलून अस वाटतय जे होईल ते चांगले होईल."

" नव-याचा पाठिंबा मिळाला की गोष्टी सोप्या होतात."

" राहूल चांगले आहेत. नात्यातले आहेत आमच्या. मला वाटत मी लग्नाला होकार द्यावा."

" उशीर नको करु. तुझे स्वप्न लग्नानंतरही नक्की पूर्ण होईल माझ्यासारखच."

" हो ग."

" मला बोलव हा लग्नाला. तू माझ्या लग्नाला नाही आली तरी आम्ही दोघ जोडीने येवू लग्नाला."

" हो नक्की या."

" आई मी लग्नाला तयार आहे. लग्ना नंतर मला राहूल नोकरी करुन देणार आहेत."

" देवच पावला म्हणायचा. पोरीन ऐकल एकदाच.

जलद लेखन फेब्रुवारी
विषय : लग्नसंस्था

🎭 Series Post

View all