Login

स्वप्न की सत्य ? ( भाग 3 )

About Love


स्वप्न की सत्य? (भाग 3 )

चार्जर घेऊन सुजय बेडरूममध्ये चालला गेला. मीनलने नाश्ता कसाबसा पटकन संपवला व सेजलला बाहेर जाण्यासाठी ती घाई करू लागली.

सेजल व मीनल बाहेर जाण्यासाठी घरातून निघणारच होत्या,तेवढ्यात जीन्स,टीशर्ट घालून सुजय बाहेर जायला निघाला होता.

"आई, मी माझ्या मित्राकडे चाललो आहे,येतो थोड्या वेळात."
असे आईला सांगून तो निघणारच होता,तितक्यात सेजल त्याला म्हणाली,

"दादा, तू बाहेर चालला आहेस तर आम्हांलाही मॉलला सोडून दे ना .. प्लीज."
आपला दादा आपल्याला कधी नाही म्हणतचं नाही हे सेजलला माहित होते.

"अगं,मी थोडा घाईत आहे..त्यामुळे तुम्हांला नाही सोडू शकत.."
असे सुजलने म्हटल्यावर तिला थोडे आश्चर्य वाटले.
"अरे,सुजय दे ना सोडून त्यांना, कितीसा वेळ होणार आहे असा.."
असे आईने सांगितल्यावर तो त्यांना घेऊन जायला तयार झाला.

त्याला घाई वगैरे काही नव्हती. पण मीनलला पाहिल्यापासून आपण अगोदरच गोंधळलेले आणि अजून काही गडबड नको व्हायला म्हणून तो नाही म्हणत होता.

त्याच्या गाडीत जायचे म्हणून मीनलला तर धडकीच भरली होती.

गाडीत सुजय व मीनल दोघेही शांत होते. फक्त सेजल दोघांशी गप्पा मारत होती.दोघेही शांत होते तरी,एकमेकांना चोरून बघत होते आणि तेव्हाचं गाडीत FM वर गाणे सुरू होते,

\"अखिया मिलाऊ कभी अखिया चुराऊ,क्या तूने किया जादू
कभी घबराऊ कभी गले लग जाऊ
मेरा खुद पे नहीं काबू
....\"


मॉलला पोहोचल्यावर, आपल्याला नक्की काय घ्यायचे होते हे मीनलला आठवेना.तिच्या मनात वेगळेच विचार सुरू होते. पण आता आलो आहोच तर काही तरी घेऊ या ..म्हणून थोडीफार शॉपिंग करून ती घरी पोहचली.

ज्या मित्राकडे काम होते त्याच्याकडे न जाता आपण दुसऱ्याच मित्राकडे आलो आहोत, हे सुजयला मित्राच्या घरी पोहोचल्यावर समजले.त्या मित्राशी थोड्याफार गप्पा मारून तो ही घरी पोहोचला.

सेजल व मीनलची मैत्री जशी वाढत होती,तसे दोन्ही कुटुंबातील संबंधही दृढ होत होते.त्यांच्या आईवडिलांचे ही चांगले जमत होते. एकमेकांच्या घरी जाणेयेणे सुरू झाले होते.जशी सेजल मीनलच्या आईवडिलांना आवडायची तशीच मीनलही सेजलच्या आईवडिलांना आवडत होती.दोघींच्या मैत्रीमुळे दोन्ही घरात आनंदच आनंद होता. सर्व खूप खूश होते.

इंजिनिअरिंग कॉलेजला असलेला,दिसायला देखणा,रुबाबदार व आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे सुजय कॉलेजमधील बऱ्याच मुलींचा क्रश होता.

सुजयचे काही मित्र असे होते की, त्यांची एकदोन प्रेमप्रकरणे होऊन ब्रेकअप्स झालेले होते व ते नवीन प्रेमाच्या शोधात होते.काही होते ,जे प्रेमात यशस्वी झाले होते...ते भविष्याची स्वप्ने पाहत होते . तर काही देवदास झालेले होते.
सुजयला अजून अशी कोणी भेटली नव्हती, ज्यामुळे तो ना आशिक झाला होता ना देवदास ...

मीनलच्या पहिल्या भेटीपासून त्याच्या डोक्यात टिकटिक सुरू झालेली होती. व ह्रदयाची धडधड वाढलेली होती. तिचे आपल्या घरी येणे त्याला आवडू लागले होते. दोन्ही परिवारातील प्रेमाचे,मैत्रीचे संबंध ,त्याच्या मनातील तिच्याविषयीच्या भावनांना उत्साहीत करत होते.तो मीनलशी डायरेक्टली कधीही बोलत नव्हता. पण जेव्हा सर्वजण एकत्र जमायचे तेव्हा थोडेसे कामापुरते बोलायचा.