स्वप्नांच्या पलीकडले ( 15)
( माघील भागात आपण पाहिले मयुरी ला प्रश्न पडला होता की अभिमान ला कसे कळले असेल तिने डायरी पूर्ण वाचली नाही )
आता पुढे ....................
मला मनात प्रश्न पडला याना कसे कळले ,
मी हिंमत करून विचारलेच
" सॉरी मी न विचारता तुमची पर्सनल डायरी वाचली पण तुम्हाला कसे कळले मी अर्धी च वाचली"
ते माझ्याकडे बघून हसू लागले,
"मयुरी मॅडम
जर तुम्ही ती डायरी पूर्ण वाचली असती ना तर तुम्हांला तुमच्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर त्यातच मिळाले असते,
मला विचारायची गरज पडली नसती "
ते असे म्हणताच मी वाचण्यासाठी डायरी शोधू लागले ,
"आता कशाला शोधतेस आता मी सांगतो ना "
असे बोलून त्यांनी हाताला पकडून जवळ घेतले,
व बोलू लागले,
"हो मयू माझ्या आयुष्यात एक मुलगी होती मला खुप आवडायची ती म्हणजे आम्ही दोघे पण आवडायचो एकमेकांना पण मला स्वप्ना दाखवून ती अचानक निघून गेली लग्न करून मग मी खुप तुटलो, कोलमडून पडलो आणि डायरीत ते कोरे पान सोडलेत ना ते त्याच साठी की कधी जर भविष्यात ती समोर आली तर माझे नेमके काय चुकले ज्याने ति मला सोडून गेली हे तरी कळेल , आणि मग मी ते लिहून ठेवणार त्या पानांवर,
मग माझा मुली बघण्याचा सपाटा चालू झाला मुळात मला लग्न च करायचे नव्हते पण आई बाबा साठी मी फक्त मुली बघून यायचो व काहितरी कारण सांगून मुलगी नापसंत करायचो हा माझा नेहमीच दिनक्रम होता,
व तुला देखील मी नकार देण्यासाठी च आलो होतो,
पण तू अशी चहा चा स्ट्रे हातात घेऊन आली,
तुझी ती गुलांबी रंगाची साडी,
एका हातात घड्याळ व दुसऱ्या हातात बांगडी, लांब केस, बोलण्यातील आत्मविश्वास, आणि सगळ्यात जास्त आवडलेलं वाक्य,
मी लहानपणापासूनच टॉपर आहे"
तेव्हा खुप हसलो होतो मी मनातल्या मनात कारण मित्राने तुला मार्क्स विचारले व म्हणाला जे 80% च्या पुढे असतील त्या वर्गाचे सांगा व तू न घाबरता म्हणालीस
"दादा मी लहानपनापासून च टॉपर आहे, कुठलेही विचारा 80% च्या पुढे च आहेत,
तुला नाकाराव अस मनाला पटत नव्हतं व मी लगेच हो म्हणून बसलो,
नंतर मित्राच्या खुप शिव्या खाल्या
तुला तर मुलगी नापसंत करायची होती ना मग काय झालं
का माती खाल्ली,
उगाच मला तोंडावर पाडले त्या मुलीने, वैगरे वैगरे .........
आणि मग आपले लग्न झाले,
पण मी मनातून तुला स्वीकारलं होत,
तुझं असणं नसणं सगळं माझ्यावर परिणाम करत ग
पण आज मी त्या डायरीमुळे नाही चिडलो,
मला त्या प्रसंगाला कसे सामोरे जायचे हे समजले नाही
मी शांततेत घेऊ शकत होतो पण नाही समजले मला,
"मयू मला माफ कर"
ते कळवळून बोलत होते मला त्यांच्या बोलण्यात विश्वास जाणवत होता,
"ओ
जाऊ द्या ना आता
झालं गेलं गंगेला मिळालं"
असे म्हणून मी त्यांना बिलगले,
मी पुन्हा विचारात पडले,
कसे नाते आहे यार हे नवरा बायकोचे
असे भांडतो असे गोड होतो,
खुप राग येतो चिडचिड होते
पण एकाने माघार घेतली की दुसरा आपोआपच थांबतो,
ऊन सावली सारखे झालेय आमचे,
काहीवेळा पूर्वी माझा हक्क नाकारत होते व आता अस्तित्व मला सोपवून माझ्यात सामावले होते,
अवघड आहे आम्हा नवरा बायकोचे,
मी विचार करत होते व हे झोपी देखील गेले,
किती शांत व निरागस वाटतात हे प्रत्येक पुरुषाचे हे रूम फक्त त्याच्या आई व पत्नी लाच दिसत असेल,
नेहमी खंबीरपणे वावरणारे हे आज लहान लेकरा प्रमाणे वागत होते,
त्यांच्या विचारात
त्यांच्याच हाताची उशी करून मी झोपी गेले,
दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मी माझ्या कामाला उठले,
पण नेहमी माझ्या नंतर उठणाऱ्या आई आज लवकर उठल्या होत्या,
कसलीतरी लगबग चालू होती त्यांची,
"आई तुम्ही का उठलात मला सांगायचं ना करायला मी उठले असते लवकर पण काय आवरताय "
मी आई जवळ जात म्हणाले
"अग निशा ला माझ्या हातच्या पुरणपोळ्या खुप आवडतात म्हणून घेऊन जातेय"
आई पोळी लाटत म्हणाल्या,
"तुम्ही निशा आत्याकडे जाताय का??"
व तेही इतके अचानक मी प्रश्नार्थक नजरेने विचारले
"म्हणजे आम्ही यांच्या मित्राकडे जातोय त्यांच्या घरी पूजा आहे पण वाटेत गाव लागते त्यांचे म्हणून म्हणाल आई ला भेटून जाऊ पुढे तसेही खुप दिवस झालेत मला आई ला भेटून आठवण येतेय आता त्यांची"
आई अगदी सहज बोलून गेल्या
किती घट्ट वीण आहे ना यांच्या नात्यांची इतके वय झाले तरीही आई त्यांच्या सासूबाई ला अजूनही मानतात व त्यांचे च सल्ले घेतात आणि निशा आत्या व आई तर छान मैत्रिणी सारख्या राहतात,
यांचे असे प्रेम बघून मलाच हेवा वाटतो कधी,
मी व आई बोलत होतो व बोलत बोलत आई चे सामान देखील भरत होतो,
आता आजीकडे जायचे म्हणून आई आठवून आठवून आजी ना जे जे पाहिजे तेते भरत होत्या तेवढ्यात प्रिया तिची बॅग घेऊन हॉलमध्ये आली
" हे काय ताई तुम्ही कुठे निघालात"
मी प्रियाकडे बघत म्हणाले,
"मी पण जातेय आई सोबत
उगाच कशाला तुमच्या राजा राणी मध्ये मी अडथळा व माझी आई नसेल तर मला खाऊ कोण घालेल आणि आई गेली व तुम्ही नवरा बायकोनि माझ्याकडून काम करून घेतले मग"
प्रिया बोलून मोकळी झाली
त्या बोलून गेल्या व माझ्या डोळ्यातून पाणी वाहू लागले मी त्यांना नेहमी माझ्या लहान बहिणी प्रमाणे मानत होते पण त्यांनी असे बोलणे मला अपेक्षित च नव्हते, मी राडतेय हे बघून त्यांनी पटकन मला मिठी मारली व म्हणाल्या
"ओ ........
रडक्या वाहिणीसाहेब अहो
माजा घेत होते तुमची
"
तेवढ्यात हे हॉलमध्ये आले
"दादा अवगड आहे तुझे
काही झाले की काय रडतात वहिनी
तुला सांगू आपल्याला पाणी नाही आले तरी चालेल आपण हे पाणी वाफरात जाऊ "
आणि सगळे हसू लागले,
"चला येतो आम्ही
तुझी काळजी घे,
दरवाजा नीट लावत जा,
दिवसा देखील गॅस बंद करत जा,
स्वयंपाक दोघांना पुरेल इतका च कर वाया घालवू नको,
तुला जे जे हवे ते मी आणून ठेवलं आहे तुला कुठे जायचे गरज नाही,
आणि हो शेजारच्या काकू बसायला बोलावतील पण तू जाऊ नको??
समजलं
आणि अभिमान ही एकटी आहे तर घरी लवकर येत जा
मित्राकडे जायचे नाही,
आई बोलत होत्या तोच हे आई ला म्हणाले,
"आई एक काम कर तू एक तर आम्हाला देखील घेऊन जा नाहीतर तूच जाऊ नको कारण तुझ्या सूचना संपेपर्यंत गाडी निघून जाईल"
"हो हो चल"
म्हणत आई ने एक बॅग उचलली
बघता बघता सगळे निघून गेले हे त्यांना सोडवायला स्टॉप वर गेले,
घरातील सगळे गेले आता मला करमेल का हा मोठा प्रश्न माझ्यासमोर होता ,
पण दुसरीकडे एक मोकळीक मिळाली होती,
अचानक एक दडपण कमी झाल्यासारखे वाटले,
मी मस्त हॉलमधील सोप्यावर अंग टाकले असे हॉलमध्ये मी लग्नानंतर पहिल्यांदा झोपले असेल,
आता काय मला बघायला कुणी नाही हे मनाला व मेंदूला दोघांना समजले होते आपोआप पाऊले रूमकडे वळली व मी साडी बदलून ड्रेस घातला,
आज माझ्या सासरी मला माहेरचा अनुभव येत होता,
क्रमशः .........
जाणून घेण्यासाठी मयुरी व अभिमान चा प्रेमातील प्रवास सोबत राहा व आवडल्यास लाईक नक्की करा,
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा