स्वप्नांच्या पलीकडले ( भाग 16 )
( माघील भागात आपण पाहिले की अभिमान त्याच्या घरातील लोकांना स्टॉप वर सोडायला गेला होता व मयुरी घरी होती )
आता पुढे.......
हे त्यांना सोडवायला स्टॉप वर गेले व तोपर्यंत मी कपडे बदलून बसले होते,
आज पहिल्यांदा मला सासरी माहेरचा फिल येत होता,
म्हणजे अचानक खुप मोकळं वाटत होतं मला सगळे दडपण कमी झाल्या सारखे,
म्हणजे आता कधी दिवस तरी आम्ही दोघेच राहणार होतो आता आम्हाला मानाजोघे वागता येईल कुठलेही बंधन नव्हते आम्हाला,
मी विचारच करून इतकी खुश होत होते तर अनुभव घेऊन किती होईल याचा माझा मलाच हेवा वाटत होता,
मी मस्त सोप्यावर लोळत पडले यांची वाट बघत,
अर्थात दरवाजा लावला होता नाहीतर सासूबाई बाहेरगावी गेल्यात म्हणून मी काय करतेय याचे रिपोटिंग करायला शेजारच्या काकू येऊ नयेत म्हणून ,
तेवढ्यात मुख्य दरवाजा ची बेल वाजली मला माहित होतं हेच असतील पण मुद्दाम आता बदला घ्यायचा म्हणून मी विचारले
"कोण आहे ???
कोण पाहिजे ??? "
तिकडून आवाज आला
" दरवाजा पलीकडे माझी सुंदर बायको आहे ना
ती हवी आहे"
"हो का पण त्या कामात आहेत नंतर या"
मी मुद्दाम डीवचण्यासाठी बोलले
"तू फक्त आतमध्ये येऊ दे मग तुझे काम पाहतो
खोल पटकन"
हे जिद्दीने म्हणाले,
त्यांचे शब्द ऐकताच मी दार उघडले,
बघता तर काय
मला बघून ते फक्त बघतच राहिले,
रोज साडीत बघणाऱ्या बायकोला आज मोकळे केस, टीशर्ट असे मॉडर्न बघून त्यांच्या पायाखालची जमीन च सरकली,
" ये ......
तू हे कपडे कधी आणलेस
व तुला कुणी बघितले मग
पण तशी भारीईईईईई दिसतेस यार या लूक मध्ये"
ते हात पकडून जवळ ओढत म्हणाले,
"ओ ....
मी माझ्या घरी अशीच राहायचे
तुमच्या घरी नाही चालत असे म्हणून काकूबाई झालेय समजलं"
मी तोंड वाकड करत बोलले
"हो का पण मॅडम हे माझे नाही बर आपले घर आहे ,
तूच तर म्हणाली ना जे माझं आहे ते सगळं तुझं म्हणून बर"
ते केसासोबत खेळत म्हणाले
"हो का
बर .....
ओ माझ्या केसांची सेटिंग बिघडेल " मी केस सोडवत म्हणाले
"हो का बघू ना आता तुझ्या केसांची सेटिंग कितीवेळ टिकते"
ते डोळ्यासमोर आलेली बट कानामाघे लावत म्हणाले"
"बर ऐक ना तूच म्हणाली होती ना की आपण एकमेकांना वेळ मिळावा म्हणून बाहेर फिरायला जाऊ बग बर आता मिळाला की नाही वेळ म्हणजे तुझी आणखी एक ईच्छा पूर्ण केली देवाने "
ते रिमोट ने चॅनेल बदलत म्हणाले
" एक मिनिटं उगाच कशाचा संबंध कुठे जोडू नका
मी बाहेर फिरायला म्हणाले होते असे घरात बसून नाही, व वेळ तिथे घालवायचा होता असा इथे नव्हे, कशाने पण काही झाकण्याचा प्रयत्न करू नका"
मी ठामपणे मत मांडत म्हणाले,
"अरे तूच तर म्हणाली होती एकमेकांना देण्यासाठी निवांत वेळ हवा, प्रेम करण्यासाठी समजून घेणं गरजेचं व समजून घेण्यासाठी सोबत वेळ घालवणे गरजेचे विसरली पण "
ते माझ्याकडे बघत म्हणाले
" हो म्हणाले होते पण असे घरात नाही बाहेर कुठेतरी"
मी वैतागून म्हणाले
त्यांनी एक हात खांद्यावर टाकला व डोक्याने माझ्या डोक्याला मारत म्हणाले
"मयू एक सांगू प्रेम करण्यासाठी वेळ, ठिकाण, कपडे, पैसा, अस काहीच लागत नाही फक्त दोन मन लागतात एक व्यक्त होणार व दुसरी समजून घेणार आणि नवरा बायकोच प्रेम असाच असत अग त्यांच्या प्रेमासमोर बाकीच्या गोष्टी नगण्य असतात,
म्हणजे बग असे मोठे मोठे गिफ्ट, पार्टी, दिव्याची रोषणाई असे काही नको असत अग फक्त साथ हवी असते सुखात आणि दुःखात,
आणि जर असे नसेल तर आपली झिरो फिगर वाली बायको जेंव्हा प्रेग्नन्सी मध्ये डबल, टिबल
होते तेव्हा तिच्यावरील प्रेम कमी व्हायला पाहिजे ना पण असे होते नाही तर मुळात आणखी वाढते,
थोडक्यात काय तर प्रेम करण्यासाठी ठिकाण आवश्यक नसते,
हो ना बायको "
असे म्हणून त्यांनी दुसऱ्या हाताने त्यांच्या अगोदर च्या हाताला हातात घेतले म्हणजे मी आपोआपच त्यांच्या कुशीत गेले,
"समोरच्याला कसे अडकवायचे हे तुमच्याकडून शिकावं
चला सोडा चहा टाकते
चहा घ्यायचा असेल ना "
मी त्यांचा हात सारत म्हणाले
"आज नात्याला थोडी मोकळीक
देऊन पहा
तू बस मी करतो तुझ्यासाठी माझ्या हातचा चहा"
ते माझ्या समोर उभा राहून ऍक्शन करून म्हणाले,
"बाप रे आज एकदम कविता काय व चहा आणि तुम्ही .....
हा हा हा ...............
साहेब गॅस पेटवता येतो का ???
आणि म्हणे मी करतो चहा "
मी हसत म्हणाले
"हे असं असत तुझं
तुझ्यासाठी काही करावं म्हणलं तरी तुला अडचण नाही केलं तरी अडचण
जा नाही करत"
ते असे बोलून तोंड फुगवून सोप्यावर बसले
" सॉरी
करा नाही हसत"
मी कान पकडत म्हणाले
"माझ्या माघे येऊ नको मी करतो बरोबर"
असे बोलून ते किचनमध्ये निघून गेले
ते गेले होते पण माझ्या मनातील विचारांनी वेग घेतला होता किती कमाल आहे जो माणूस त्याच्या घरच्या समोर माझी बाजी देखील घेऊ शकत नाही, एरव्ही साधा पाण्याचा ग्लास देखील भरून घेत नाही व आज चक्क चहा बनवतोय तोही माझ्यासाठी,
म्हणजे घरात इतर माणसे असल्याचा फायदा असतो की तोटा ,
तेच मला कळत नव्हते,
पण यांनी केलाय का यापूर्वी कधी चहा,
मी बघून येऊ का??
असा विचार करून मी जागेवरच उठून उभा राहील तोच आतून आवाज आला,
"खबरदार एक कदम भी आगे बढाया तो............
हम भूल जायेंगे की आप हमारी बीबी हो"
आता तर मला हसू च आवरत नव्हते .....
मी जोर जोरात हसत म्हणाले
"वा ह वाह ................
हे पण गुण आहेत वाटतं ..........
"
तेवढ्यात किचनमधून जोराचा आवाज आला
मी आवाजाच्या दिशेने धावले .......
काय झाले असेल अभिमान च्या चहाचे ????
मिळेल मयू ला चहा की वाढेल आणखी काम????
जाणून घेण्यासाठी सोबत राहा
लाईक करा,
कथा कशी वाटली नक्की कळवा,
क्रमशः .......
धन्यवाद
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा