स्वप्नांच्या पलीकडले ( भाग 17)
( माघील भागात आपण पाहिले अभिमान किचनमध्ये चहा करत होता व तेवढ्यात किचनमधून जोराचा आवाज आला )
आता पुढे ...............
मी हॉलमध्ये बसले होते व हे किचनमध्ये चहा बनवत होते,
तेवढ्यात जोराचा आवाज झाला कशाचा आवाज झाला हे बघण्यासाठी मी किचनकडे धावले बघते तर काय पातेलं खाली पडलेलं होत व चहा हा जमिनीवर पसरलेला, आणि हे हात चोळत उभा होते,
मी किचनमध्ये गेले व यांना असे बघून घाबरून गेले
"ओ तुम्हांला काही लागले तर नाही ना , मी म्हणत होते मी करते मी करते पण ऐकेल कोण ना ??
एक तर कुणी घरी नाही त्यात तुम्हांला लागले आता हॉस्पिटलमध्ये कसे जाणार आणि सोबत कोण थांबणार अरे देवा मला तर आताच काही सुचत नाहीये,
आई नि विचारले तुम्ही किचनमध्ये काय करत होते तर मग काय सांगू,
पण सध्या काय लावू त्याला चला बर रूममध्ये क्रीम लावते, की इथेच काहितरी शोधू "
मी इकडे तिकडे शोधू लागले
"अग हो हो
हळू
जरा थांब
"
त्यांनी दोन्ही हात मला दाखवत म्हणाले
"माझा हात शाबूत आहे व मला काहीही झाले नाही फक्त माझ्याहातून पातेलं सांडलं, पण सगळं चहा नाही सांडलं थोडा आहे तू तो घेऊन मला चव सांग , चालेल"
ते मला शांत करत म्हणाले
"काय ओ तुम्ही पण लवकर सांगायचे ना मला किती काळजी वाटत होती माहीत आहे का??
जीव गेला असता माझा,
"मी नाराज होत म्हणाले
त्यांनी लगेच तोंडावर हात ठेवला व म्हणाले "तुझा जीव गेला तर मी कसा जगेल"
"काही पण नका बोलत जाऊ"मी त्यांचा हात बाजूला करत म्हणाले
" बर चला बाजूला मला आवरू द्या हे सर्व"
मी त्यांना बाजूला करत
म्हणाले
"नको मी करतो तू हॉलमध्ये जा बर "
त्यांनी हाताला पकडून मला किचनबाहेर काढले
"हो हो जाते
मला फक्त हे सांडलेले साफ करू द्या मग जाते चालेल ना"
मी त्यांचे मन राखत म्हणाले,
"नाही चालणार
मी करतोय ना सगळं
मग जा ना तू बाहेर
का मुद्दाम मध्ये मध्ये येते
तुला तुझा नवरा स्वावलंबी होतोय हे बघवत नाही का ??"
हे तोंड बारीक करत म्हणाले
"बाप रे स्वावलंबी....
ऐकायला पण जड गेलं ओ पचायला किती जाईल "
मी हसत म्हणाले
त्यांनी मला हॉलमध्ये काढून दिले व त्या किचनभर पसरलेल्या चहावर ते आणखी चहा करत होते,
त्यांनी तो पातेल्यात उरलेला चहा दोन कपात थोडा थोडा ओतला व हॉलमध्ये घेऊन आले,
"चला मॅडम गरमागरम चहा"
हॉलमध्ये प्रवेश करताच ओरडले
"चहा नेहमी च गरम असतो"
मी हसू आवरत म्हणाले
"हो का बरं बर
तुम्हा बायकांना ना कौतुक च नसते नवऱ्याचे "
हे तोंड फुगवत म्हणाले
"तसे नाही ओ
तुम्ही पण ना "
मी चहा घेत म्हणाले
पहिला घोट घेतला व काही सेकंदाने तो गिळला, हळूहळू मी संपूर्ण चहा संपवला
"वा खुप छान मस्त झाला होता अप्रतिम आणि हे काय तुम्ही पण घ्या ना"
"हो घेतो"
म्हणत त्यांनी एक घोट घेतला
जसा घोट घेतला तसे ते बागेत पळाले थुकण्यासाठी ,
" शी ........
किती घाण झालाय हा
आणि हा तिखट व गोड का लागतोय,
उलटी येतेय मला तू पण ना सांगायचे ना,
ये मयू पण तू कसा काय घेतला इतका घाण चहा"
हे कळवळून म्हणत होते यांचे तोंड बघण्यासारखे झाले होते मी त्यांना थोडी साखर आणून दिली व किचन आवरू लागले चहा चा त्यांच्यावर खुपच परिणाम झाला होता त्यांचा चेहरा अजूनही वाकडा तिकडा च होता
मी किचन आवरून घेतले व हे आतमध्ये आले,
" सॉरी यार नाही जमला मला चहा पण सगळं नीट टाकलं होतं कसे काय झाले काय माहित
व तू कशी पिली ग "
हे विचार करत म्हणाले
" अहो चहा चे , दुधाचे , भाजी चे , पाणी तापवायचे असे सगळे पातेले वेगवेगळे असतात,
तुम्ही भाजी च्या पातेल्यात केला होता चहा म्हणून तो तिखट लागत होता
आणि हो मी चहा ची चव विचारात च घेतली नाही फक्त तुमचा त्या चहा ला झालेला स्पर्श अनुभवत होते,
मला माहित होतं माझा नवरा काय फाईव्हस्टार हॉटेल चा शेफ
नाहीये पण जे करतोय ते मनापासून व माझ्यासाठी मग मी का घाण म्हणू , आणि मला छान लागला,
मी त्यांची समजूत काढत म्हणाले
" अवघड आहे ग
व इतके सगळे वेगवेगळे पातेले असतात हे आज च समजलं आणि तुम्ही लक्षात कसे ठेवता मग कोणते कशाचे"
ते विचारपूर्वक म्हणाले
" ते बायकांचे बायकांना बरोबर कळते "
मी हसत म्हणाले
मी सगळं आवरून घेतले व पुन्हा चहा केला व मग आम्ही दोघांनी चहा घेतला,
मस्त वाटत होतं
आता आम्ही दोघेच कुणीच नव्हते तिसरे,
गप्पामध्ये तर वेळ कसा निघून जात होता ते कळतही नव्हते,
बोलता बोलता यांच्याकडून कळले यांनी सुट्या टाकल्या होत्या,
एरव्ही काही कार्यक्रम असेल तरी घरी न राहनारे पतीदेव
आता स्वतः च्या मनाने सुट्ट्या टाकून मोकळे झाले होते,
मी निवांत बसले तर होते पण आता माझी खरी कसोटी होती रात्री च्या स्वयंपाकाची ,
एरव्ही आई सगळं सांगायच्या आता माझी कसोटी होती??
"चल आवरते काम "
असे म्हणून मी कामाला लागले
नेहमी चहा चा कप उचलुन न ठेवणारे हे आज मला मदत करत होते ,
सगळी कामे आवरून मी स्वयंपाकाला लागले,
लागले खरी पण आता माझी कसोटी होती.
जमेल का मयुरी ला एकटीला स्वयंपाक ???
की घडेल अभिमान ला उपवास ??
जाणून घेण्यासाठी सोबत राहा
क्रमशः ...............
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा