स्वप्नांच्या पलीकडले (भाग 19)
( माघील भागात आपण पाहिले मयुरी तिच्या विचारात च झोपी गेली होती)
आता पुढे .........................
आज मी निवांत होते नेहमीप्रमाणे धावपळ नव्हती ना कुठले टेन्शन माझी सर्व कामे आवरून मी यांना उठवले, शेजारच्या काकूंची
"अभिमान आज ऑफिस ला नाही जाणार का ग ......
तो उठला नाही का आणखी अशी दोन वेळा विचारपूस करून झाली होती"
त्यांनी विचारले की मला आई चे शब्द आठवायचे
कधी कधी मोठे लोक जे काही सांगतात त्यात त्यांचा अनुभव असतो हे आज पटले होते,
नास्ता, जेवण, असे सगळे आवरून मी माझे पुस्तक वाचत बसले मुळात तो माझा छंद होता पण सगळे असते की कामामुळे वेळ च मिळत नसे,
पण आज मिळाला होता म्हणून मी वाचू लागले हे त्यांचे ऑफिस चे काम करत होते व मी वाचन वेळ कसा गेला कळलेच नाही,
बघते तर संध्याकाळ चे सहा वाजले होते, दिवे लागणीची वेळ झाली होती,
"चल मयुरी तुझी कामे तुलाच करावी लागतील "
असे मनाला समजावत मी कामाला लागले
हे अजूनही कामात व्यस्त होते,
"अहो चहा घेणार का ???
मी यांना आवाज देत म्हणाले
पण कामात व्यस्त असताना पहिल्या आवाजात ऐकतील ते हे कसले
मी पुन्हा आवाज दिला
"अहो साहेब
चहा घेणार का ???"
"तू दिले तर विष ही घेईल"
हे पुन्हा माझी खेचत म्हणले
"झाले चालू
दुसरे काही काम नाही का ओ "
मी नकारार्थी मान हलवत म्हणाले
मी चहा बनवून त्यांना दिला व माझा चहा हातात घेऊन काम आवरत आवरत किचनमध्ये चहा घेत होते
तेवढ्यात त्यांनी आवाज दिला
"स्वयंपाक करू नको आज बाहेर जाऊ जेवायला"
चक्क जेवायला आणि तेही बाहेर
मला तर धक्का च बसला
"अगोदर आई ची परवानगी घ्या कॉल करून मग बघू "
मी हसून म्हणाले
कारण आमच्या घरात आई याना साधे बिस्कीट देखील खाऊ देत नाहीत कारण बाहेरचे खायचे नाही म्हणून,
तसे पाहिले तर आई चे खाण्यापिण्याकडे खुप बारीक लक्ष असते,
त्या भाज्या देखील अगोदर ठरवून ठेवतात, म्हणजे कडधान्य, भाज्या सगळे व्हिटामिन मिळालेच पाहिजे हा त्यांचा अट्टाहास असतो,
म्हणून मी यांना तसे म्हणाले
"हो ते मी बघून घेईल आई ला काय सांगायचे त्याची काळजी तू करू नकोस"
ते थोडा राग आणत म्हणाले
आई चे नाव घेतले की कसा राग येतो नाकावर मी मनातल्या मनात म्हणाले,
"बर तू आवरून तयार राहा मी आलोच मित्राकडे जाऊन "
ते गाडी ची चावी शोधत म्हणाले
"बिल्कुल नाही
तुम्ही कुठेही जाणार नाहीत"
मी त्यांच्या हातातील चावी घेत म्हणाले
"अग मयू असा गेलो व असा आलो तू तयार तर होऊन बस"
हे हट्ट करत म्हणाले
"काही नको
एकदा नाही म्हणाले ना
तुमचे मित्र व तुमचे पाच मिनिटं दोन्ही परिचयाचे आहे मला,
जातात व चार तासाने घरी येतात
ते काही नाही तुम्ही कुठेही जाणार नाही"
मी हट्टाला पेटले होते
"बर बाई आवर तू
नाही जात मी "
ते सोप्यावर बसत म्हणाले
मी आवरण्यासाठी निघून गेले
आणि त्याच संधी चा फायदा घेत हे पसार झाले ,
मी तयार होऊन हॉलमध्ये येऊन बसले, त्यांना कॉल केला तर पाच मिनिटं पाच मिनिटं करत करत 20 मिनिटे झाली होती पण त्यांचा पत्ताच नव्हता,
शेवटी चेंज करून निवांत बसावं म्हणून मी उठले तर तेवढ्यात दारावरील बेल वाजली
मी रागातच दरवाजा उघडला समोर पाहते तर काय निशा आत्या आल्या होत्या,
त्यांचा नंदेला बरे नव्हते म्हणून त्या आल्या होत्या मग त्यांना वाटलं चला घरी आम्ही दोघेच आहोत तर तिकडे च थांबू
त्या पाहुण्यांना भेटून मुक्कामी आमच्याकडे आल्या होत्या मी त्यांना चहापाणी केले व तेवढ्यात हे आले,
समोर मला व निशा आत्याना बघून हे शॉक झाले,
त्यांना काय बोलावे हेच कळेना
कारण आम्ही बाहेर जाणार होतो व आता ते रद्द होणार व मी ओरडणार असे त्यांनी ठरवून टाकले होते,
त्यांना मी साडीत आवडते म्हणून आज मुद्दाम मी त्यांच्या आवडीची पिवळ्या रंगाची साडी घातली होती,
पूर्ण प्लेन साडी व त्यावर बारीक बॉर्डर खुलून दिसत होती, म्हणतात हळदीची साडी एका वर्षात वापरून टाकावी पण यांना ही इतकी आवडत होती की मी आयुष्यभर जपणार आहे या साडीला,
मी कमरेला पदर खोचला व कामाला लागले,
हे सारखे सारखे इकडून तिकडे चक्कर मारत होते
त्यांना वाटले आता काहितरी बोलेल मग काहितरी बोलेल
पण खरं सांगू नेहमी खुप चिडणारी मी,
प्लँन फसला तर ओरडणारी मी आज शांतच होते मला वाईट वाटले होते बाहेर जायचे कॅन्सल झाले तर पण दुःख नव्हते झाले,
आत्या चा तर बिल्कुल च राग नव्हता आला आणि माहीत नाही हे कसे झाले होते,
मलाच नवल वाटत होते मी शांत कशी याचे
कळत नव्हतं हा यांच्या या चार दिवसातील प्रेमाचा असर होता की माझ्यातील शहाणपण,
माणूस अनुभवाने मोठा होतो असे म्हणतात हे आता मला कळले होते,
मी निशा आत्या चा मदतीने सगळा स्वयंपाक केला,
हे अजूनही फक्त माझ्याकडे बघत होते,
त्यांना माझ्या वागण्याचा धक्का बसला हे मलाही कळत होते पण मला काहीच वाटत नव्हते तेही खरे होते,
मी नेहमीप्रमाणे सगळे आवरून घेतले आत्या एकट्या होत्या म्हणून आता त्यांना सोबत थांबणे माझे कर्तव्य होते,
म्हणून मी सगळे आवरून आई बाबा च्या रूममध्ये झोपण्यासाठी गेले जिथे आत्या थांबल्या होत्या
"हे काय तू का आलीस"
आत्या चौकशी करत म्हणाल्या
"ते मी .......
तुम्हांला सोबत थांबते ना"
मी घाबरत च म्हणाले
"का ????
मला कुणी खाईल का
आणि तसेही
मयुरी तू लहान आहेस ना तर लहानच राहा उगाच मोठी होऊ नकोस बर...
चल हो तुझ्या रूममध्ये "
त्या मला दम देत म्हणाल्या
"नाही नको ना "
मी माघार घेत म्हणाले
"ते काहिनाही चल तू जा
आणि तसेही खुप नटून थटून बसली होतीस तेव्हा च कळाले होते काहितरी प्लँन आहे पण तुम्ही काहीच बोलले नाही मग म्हणलं जाऊ द्या बघू केव्हार शांत राहते पण तुम्ही दोघेही खुप पक्के झालात बर "
आत्या म्हणाल्या
आता माझ्यासमोर पर्याय उरला नव्हता व मला देखील रूममध्ये च झोपायचे होते आणि आता तर आत्या नि देखील परवानगी दिली हे समजताच पाऊले अचानक वळली होती,
क्रमशः .................
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा