Login

स्वप्नांच्या पलीकडले (भाग 24)

Competition

स्वप्नांच्या पलीकडले (भाग 24) 

( माघील भागात आपण पाहिले 
दारावरील बेल वाजली म्हणून मयुरी ने दार उघडले व समोर बघते तर ..........)

आता पुढे ........

मी दार उघडले व समोर बघते तर काय ??
समोर आई बाबा व प्रिया उभा 
 मी बघाताक्षणी आई ला मिठी मारली 
"अरे अरे हे काय आतापर्यंत आई ला एक कुकुल बाळ होत आता दुसरं पण झालं " 
प्रिया माझी उडवत म्हणाली 

"तू गप ग 
काही पण बोलत असते " 
आई प्रिया ला रागावत म्हणाल्या 

"आई या ना बसा 
मी पाणी आणते "
असे म्हणून मी  किचनमध्ये गेले 

"प्रिया तिला काही काय बोलत असतेस तिला राग येत नाही म्हणून बर आहे " 
आई प्रिया ला समजावत म्हणाल्या 

"काळजी नको करू ग आई 
माझी लाडकी 
वहिनीसाहेब आहे ती 
व त्यांना राग येत नाही म्हणून तर बोलते 
आता थांब 
आणखी घेते थोडी 
" प्रिया हसत म्हणाली 

"चालू दे तुझे तू काय ऐकणार आहे का ???
शेवटी तुझ्या बाबा वर च गेलीये तू " 
आई बाबाकडे बघत म्हणाल्या 

"झालं का 
आले माझ्यावर 
तरी बरे मी जास्त बोलत नाही 
नाहीतर तुझ्या या आई ने मला घरात च घेतलं नसत " बाबा हसत म्हणाले 

"म्हणजे बाबा आई ला तुम्ही देखील घाबरता मला वाटलं आम्ही च घाबरतो " 
प्रिया आई ची खेचत म्हणाली 

"घाबरतो ......
नको रे बाळ 
नाव जरी घेतले तरी भीती वाटते" 
बाबा पुन्हा हसत म्हणाले 

"ओ ......
उगाच पोरी व सुने समोर काही बोलू नका व घाबरतो म्हणे "आई बाबा ना कडसावत म्हणाल्या 

"बग असेच चालू आहे आयुष्यभर"

बाबा आई ला चिडवत म्हणाले 

" घ्या सर्वांसाठी चहा" 

मी स्ट्रे खाली ठेवत म्हणाले

"अरे वा बघ बघ तुझी सून किती लाड करते तुझा, 
देव करो व अशी सून सर्वाना मिळो " 

प्रिया माझ्या जवळ आली व माझ्या डोक्यावरून हात ओवाळून बोट मोडू लागली 

"अरेच्चा बोट काही मोडेना 
जाऊ दे देवा ची ईच्छा नाही बहुतेक " 

असे म्हणून ती हसू लागली 

"गप ग नको छळू तिला" 
आई प्रिया ला हळूच चापट मारत म्हणाल्या 

"बघा बघा आताच सून नाही आली तर लेक परकी झाली 
देवा बघ रे तू ......" 

प्रिया चे फिल्मी डायलॉग चालू झाले 

"पण वाहिणीसाहेब मग 
काय काय केलं राजा राणी ने आमच्या माघारी 
कुठे फिरायला गेले की नाही 
तुमची काय बुवा मज्जा होती 
मस्त दोघेच ......
मग काय ......" 

प्रिया बिनधास्त बोलत होती 
व मला काय बोलावे ते कळेना 
बाबा देखील बघत होते आता 
या  पोरी ला ना बिल्कुल अक्कल नाही कुठे काय बोलावे मी मनातल्या मनात म्हणत होते, 

ती आणखी पुढे बोलेल तेवढ्यात आई ने विषय

कट केला व म्हणाल्या 

"मयुरी 
खरं सांग बर तू का ??
रडत होतीस 
तुझं रडणं ऐकलं व मला तिथे राहवेना मग मी धावत पळत आले 
काय झालं होतं ग ........" 


आई मला जवळ बसवून विचारू लागल्या 


आता आई ना काय सांगू पण मी बोलू लागले 
" आई मला लहान आहे ना तर लहानच राहू द्या 
मला इतकी मोठी जबाबदारी नाही पेलवत 
मला तुमच्या पंखाखाली वाढवू द्या मग या जबाबदाऱ्या नको 
माझा जाव गुदमरतो यात 
मला तुमच्या पासून वेगळं करू नका ??
"
व मी पुन्हा रडू लागले 

"वेडी आहे का ग 
मी कुठे वेगळं केलं तुला 
आम्ही थोडे दिवस गेलो होतो व तुम्हांला देखील दोघांना एकमेकांना वेळ देता यावा म्हणून पण तुझे तर काही पण असते
नाही जाणार मी कधीच कुठे " 

आई माझ्या डोक्यावरून मायेने हात फिरवत म्हणाल्या 

"पण वाहिणीसाहेब तुम्ही यांना बाहेर काढू नका म्हणजे मिळवले "
प्रिया पुन्हा खेचत म्हणाली 

"तू जाते का आता" 
आई मध्यस्ती करत म्हणाल्या 

सगळीकडे आनंदी आनंद पसरला होता, 
मला तर आज स्वर्गसुख लाभले होते नेहमीप्रमाणे घर भरले होते माझे पुन्हा आई आई करणे चालू झाले होते, 
आई मुळे घराला घरपण येते हे आज पुन्हा मनाला पटले होते,
यांना देखील मला बघून बरे वाटले माझी घरभर थिरकणारी पाऊले बघून हे तर फक्त हसत होते, 
माझ्यातील हा बदल मलाच पचवणे अशक्य होते 
मी खुप बदलले होते या आठ दिवसात, 

आज खुप दिवसांनी आम्ही सगळे असे एकत्र जेवायला बसलो 
प्रिया व यांची काहीतरी खुसुर फुसुर चालू होती पण मला काही ऐकायला येईना 

मी फक्त कान देऊन ऐकत होते पण काही थांगपत्ता लागू देतील तर हे बहीण भाऊ कसले, 

काहीच कळायला मार्ग नाही
हे समजताच मी माझी माझ्या कामाला निघून गेले 


सगळ्यांची जेवणं आवरली
प्रत्येकजण आपापल्या रूममध्ये निघून गेला 
मी देखील माझी कामे आवरून रूममध्ये गेले, 

मी रूममध्ये गेले व बघते तर काय आज चक्क साहेब झोपी गेले होते 

"आज कुठून देव पावला यांना एवढ्या लवकर झोपायला नेहमी तर मला तरी परेशान करतील किंवा मोबाईल मध्ये गाणे तरी ऐकतील, 
कुठे मित्राला च कॉल कर किंवा 
कुठे न्युज च ऐक 
असे रिकामे उधोग चालू असतात, 

आज खुप दिवसांनी इतके मनसोक्त हसले होते, 
त्याच बरोबर मनसोक्त जेवले देखील होते, 
थोडा पोटाला आराम मिळावा म्हणून मी गॅलरी मध्ये चकरा मारू लागले, 

सहज चकरा मारत असताना कुणाचा तरी आवाज ऐकू आला कोण आहे हे बघण्यासाठी मी थोडे पुढे झाले तर 
बघून धक्काच बसला 
प्रिया ताई आई च्या मोबाईल वरून कुणाशी तरी बोलत होत्या, 

एवढ्या रात्री कॉल 
कुणाचा असेल ???
काही सिरीयस तर नाही ना म्हणून मी थोडे पुढे सरकले तर 

तर प्रिया  ताई हसून कुणाशी तरी बोलत होत्या
बोलण्यातून तर जाणवत होते की 
समोर कुणीतरी मुलगा असेल 

मी थोडा वेळ तिथेच थांबले काय मॅटर आहे हे जाणून घेण्यासाठी


पण तेवढ्यात माझा हात लागून 
फुलझाडांची कुंडी खाली पडली 
मी घाबरले आता ताई ना काय वाटेल 
मी 
त्यांच्यावर पाळत ठेवते म्हणून 
उगाच आले मी बाहेर आता अपराधी वाटत होते 
पण माझ्यापेक्षा त्यांना जास्त वाटत होते  
मला बघून त्यांनी घाईत कॉल कट केला व मोबाईल लपवला 
त्यांना कळून चुकले होते वहिनी ला कळाले आहे की आपण मुलांसोबत बोलत होतो 
पण त्यांनी तरीही हिंमतीने मला बोलण्याचा प्रयत्न केला 

"वहिनी please मी उद्या  तुम्हांला सगळं सांगते 
फक्त तुम्ही कुणाला म्हणू नका व गैरसमज करून घेऊ नका 


मी तुम्हाला च सांगणार होते सगळ्यात अगोदर पण पुन्हा विचार केला 

तुम्ही नाही समजून घेतले तर
म्हणून काही बोलले नाही " 

प्रिया घाबरत घाबरत बोलत होती 
मला तर काय बोलावे कळेना 
मनात हजार प्रश्न येत होते 
आई चे इतके बारीक लक्ष असताना 
इतके कडक संस्कार असताना प्रिया चुकली च कशी 
मला त्यावेळी त्यांना काय बोलावे काहीच कळेना, 
पण त्यांना तसे सोडून देखील येऊ शकत नव्हते 
पुन्हा त्यांना कुणाशी बोलताना बघितले व मी घरात सांगेल या भीती ने त्यांनी काही चुकीचे पाऊल उचलले तर अवघड होईल 
म्हणून मी माझ्या सद्सद्विवेक बुध्दी चा विचार करून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला, 

"आपण उद्या बोलू या विषयी 
चालेल ना 
व टेन्शन घेऊ नका 
जर तुम्ही कुठे चुकत नसाल तर मी तुमची साथ देईल
पण आत तुम्ही रूममध्ये जा 
आणि टेन्शन घेऊ नका " 
असे बोलून मी त्यांना रूममध्ये पाठवून दिले, 
त्या रूममध्ये जाताच मी देखील रूममध्ये आले 
पण मनात खुप प्रश्न होते 
मी त्यांना योग्य न्याय देऊ शकेल का??
त्या चुकताय व मी त्यांना साथ देण्याचे वचन देऊन बसले उद्या काही बरे वाईट झाले तर आई माझ्यावर किती ओरडतील, 
यांना आवडेल का माझे असे 
वागणे, 

विचारांनी मनात थैमान घातले होते, 
त्याच विचारात मी रूममध्ये जाऊन झोपी गेले 

काय असेल प्रिया च्या प्रेमाची कहाणी ??
मयुरी देईल का साथ??
की ठरेल घरच्यांच्या बंधनाची बळी ???
जाणून घेण्यासाठी सोबत राहा 
भेटुयात पुढील भागात 
आवडल्यास लाईक करा, 

क्रमशः ............

🎭 Series Post

View all