Login

स्वप्नांच्या पलीकडले (भाग 28)

Competition

स्वप्नांच्या पलीकडले (भाग 28) 

( माघील भागात आपण पाहिले मयुरी ला छान सरप्राईज मिळाले होते व आता पुढे ......


मी साडी हातात घेऊन त्यांच्या कुशीत विसावले 

"मग मॅडम खुश ना " 
हे केसावरून हात फिरवत  म्हणाले 

"हो खुप खुश ....."
मी अजून बिलगत म्हणाले 
मुळात आज जगातील सगळे गिफ्ट, सगळे सरप्राईज, या एका क्षणापुढे फिके पडले होते, 
मुळात माझा गिफ्ट चा अट्टाहास आज संपला होता 
कारण त्यांची भावना, त्यांचे प्रेम, त्यांचा सहवास, त्यांचा स्पर्श हे आज माझ्यासाठी खुप मोठ सरप्राईज होतं,
घरात चालत नाही हे माहीत असूनही त्यांनी फक्त माझ्यासाठी ही गोस्ट केली 
हा अनुभव च खुप विलक्षण होता, 
त्यांनी लाईट बंद केला 
व मी डोळे.....

सकाळी जाग आली तेंव्हा खुप उशीर झाला होता, 
सूर्यनारायण दर्शन देऊन पुन्हा ढगाआड गेले होते, 

"बाप रे 
खुप उशीर झाला ओ .....
उठा पटकन 
आई रागावतील " 
मी यांना कळवळून म्हणत होते
माझ्या आवाजाने हे देखील खडबडून जागे झाले, 

मी माझे आवरत आवरत त्यांना सूचना करत होते, 
"आज टिफिन होणार नाही माझ्याकडून 
तुम्ही बाहेर च काही खाऊन घ्या 
व लवकर आवरून बाहेर या 
मी नास्त्याचे बघते"
त्यांना सांगून मी धावत किचन घातले , 
एक तर पायात अडकणारी साडी त्यात ओले केस, उठायला झालेला उशीर व बनवायचा नाष्टा 
सगळं कसे माझी फजिती करण्यासाठी जुळून आले होते, 
मी हॉल ओलांडून किचनकडे वळले तोच कसलातरी खमंग वास किचनमधून येत होता 

बाप रे आई उठलात व प्रिया देखील 
आता मेले मी 
असा विचार करून किचनमध्ये आले, 
कुणी काही बोलणार तोच मी बोलू लागले 

"सॉरी आई आज उठायला उशीर झाला
ते मी ......." 
पुढे काही बोलणार तोच मी गप्प झाले 

"चालतं वाहिणीसाहेब 
तसेही काल वाढदिवस होता तुमचा म्हणून म्हणलं झालं असेल लेट पण तुम्ही समोर बसा व मी बनवलेला नाष्टा करा व सांगा कसा झाला " 

प्रिया मला हॉलमध्ये पाठवत म्हणाली 

"नाही नको मी करेल नंतर "
मी माघे वळत म्हणले 

"ते काही नाही चला बर सगळे समोर जा बघू" 
प्रिया ने सर्वाना काढून दिले तेवढ्यात हे देखील घाईत आले,
मला असे हॉलमध्ये बसलेले बघून त्यांनी डोक्याला हात मारून घेतला त्यांना वाटले आई चा  प्रसाद मिळाला बहुतेक 
पण तेवढ्यात प्रिया आली सर्वाना नाष्टा घेऊन 

"चला चला 
आज स्पेशल नाष्टा माझ्या हातचा 

प्रिया यांच्याकडे बघत म्हणाली 


"आई मला भूक नाहीये व तसेही माझे पोट मला खराब करून घ्यायचे नाही" 
यांच्या या प्रतिक्रियेवर सगळे  हसू लागले , 

"दादा खाऊन तरी बघ ना " 
प्रिया बारीक तोंड करत म्हणाली 

"बर बर तुझ्यासाठी 
खातो ..."असे म्हणून हे नाष्टा करू लागले 

प्रिया ने माझ्या हातात देखील प्लेट दिली, 
मी पाहिलं घास घेतला व तिच्याकडे पाहिले 

"कसे झालेत " 
ती उत्सुकतेने म्हणाली 

"खुप .......छान " मी आनंदाने। म्हणाले 

पण खरंच आई चा सुगरणपणा लेकीच्या उतरला होता त्यांनी खुप छान नाष्टा बनवला होता, 
आज सगळ्यांनी ताई चे भरभरून कौतुक केले 
त्याही खुश होत्या,

हे ऑफिस ला निघून गेले, 
बाबाच्या पेन्शन चे काम होते मग ते व प्रिया बँकेत गेले , 
आई त्याच्या भजनी मंडळाची मीटिंग होती म्हणून गेल्या 
आता उरले मी व माझे काम 

असेही आज लेट झाल्यामुळे कामाची खुप मोठी यादी पडली होती माझी , 
मी एक एक काम आवरत होते पण मनात अजूनही ते यांनी दिलेले सरप्राईज आठवत होते, 

तेवढ्यात कॉल आला 
कोण असेल मी मनात विचार केला 
बघते तर हे होते, मी कँटीन मध्ये जेवण केलं तू काहितरी खाऊन घे हे सांगण्यासाठी, 

अरे आपण तर विसरून गेलो होतो आज हे उपाशी गेलेत 
माझे ना असेच असते, 
मी माझ्याच डोक्यात चापट मारत म्हणाले, 
तसे पाहिले तर मी कॉल करून विचाराने अपेक्षित होते त्यांना 
तुम्ही जेवणाचे काय केले म्हणून पण मी तर अडकले होते त्या 
सरप्राईज मध्ये ,

मी माझ्या माझ्या विचारात इतकी मग्न होते की दुपारच्या जेवणाचे भान देखील राहिले नाही, 

आता दुपारचे दोन वाजून गेले होते 
प्रिया व बाबा बँकेतून आले होते 
आई ची मीटिंग देखील संपली होती, 

" आई जेवायला घेऊ का सर्वाना" मी विचारले 

"तू आणखी जेवली नाहीस...." 
आई म्हणाल्या 

"नाही जेवले" 
मी शांतपणे उत्तर दिले

"तू जेऊन घ्यायचे स ना मयुरी " 
माझे मलाच हसू येत होते 
खर तर मी जेवायला विसरले होते व आई ला वाटले मी त्यांच्यामुळे नाही जेवले 
आज आणखी एक शिकले होते
गैरसमज वाईटच असतात असे नाही ते चांगले देखील असतात, 
मी मनातल्या मनात म्हणाली 
आम्ही सगळ्यांनी जेवण केलं 
खर तर वेळ चुकली होती आज पण आम्हाला वेळेपेक्षा सर्वाना सोबत जेवायला जास्त आवडायचे, 


आज मला थोडा देखील आराम मिळेल नव्हता, 
उठायला उशीर झाल्यामुळे 
आज प्रत्येक काम उशिरा झाले मग दुपारी मिळणारा वेळ त्यात कसा गेला ते देखील कळले नाही, 
दिवसभरातील काम आवरून मी संध्याकाळच्या कामाला लागले, 

मी कामात व्यस्त होते पण मधेच पोटात काहितरी दुखत होते, 
अर्थात त्रास थोडाच होता पण जाणवत होता, 

का ???
दुखत असेल, 
केक ने झाले असेल का ???
कसे ते लोक कधींपासून व कसा बनवतात हे त्यांनाच माहीत...
नाहीतर आज आराम मिळाला नाही म्हणून दुःखत असेल, 
तसेही या महिन्यात अजून मला पाळी देखील आली नाही डेट तर येऊनही गेली म्हणून दुखत असेल उशीर झालाय म्हणून, 
अशी मी मनात समजूत काढली, 


की प्रिया च्या नाश्त्याने दुखतंय 
मी स्वतः ला च हसत म्हणाले 

कारण काही का असेना पण पोट दुखतंय हे सत्य होत व हळूहळू त्याच्या वेदनेची तीव्रता देखील वाढत होती,
मी तसाच स्वयंपाक केला 
कुणाला काहीच न सांगता पण जस जसा दिवस ढळत होता माझ्या वेदना वाढत होत्या 
मी सर्व काम आवरून सर्वाना जेवायला घेतले पण माझी जेवणाची ईच्छा नव्हती, 
पण सांगणार कसे म्हणून मी सर्वांसोबत जेवायला बसले
पण पोटातील वेदना मला जेऊ देत नव्हत्या, मी एक घास घेतला व तशीच ताट बाजूला करून बाथरूम मध्ये गेले, 
उलट्या पण होत नव्हत्या फक्त मळमळ होत होती, 

माझे काहितरी बिघडले हे 
आई नि हेरले मी फ्रेश होऊन हॉलमध्ये आले 
पण माझे सुकलेले तोंड बघून यांना वेदनेची जाणीव होत होती 

"मयुरी काय होतंय " 
आई काळजीने म्हणाल्या

"आई माझं खुप पोट दुखतंय" 
मी बारीक तोंड करत म्हणाले 


"केव्हा पासून " 
हे जेवण थांबवत म्हणाले 


"सकाळपासून " 
मी हळू आवाजात म्हणाले 


"बघ आई सकाळपासून पोट दुखतंय व ही आत्ता सांगतेय 
काही कमी जास्त झाले मग " 
हे थोडे ओरडत म्हणाले 

"तुम्ही रागावू नका ना please " 
मी यांच्याकडे विनवणी करत म्हणाले

"अग रागावू नका काय तो चिडणे स्वाभाविक आहे 
तू दिवसभर दुखणे अंगावर काढले काही झाले असते मग 
व आता रात्र झाली रात्री जास्त त्रास झाला मग दिवस पर्याय असतात रात्री नाही " आई मला समजावत म्हणाल्या 


मलाही कळत होते पण मला वाटलेच नाही असे काही होईल मला वाटले बरे वाटेल काही वेळाने म्हणून मी कुणाला च नाही बोलले, 

हे मला जवळ असलेल्या डॉक्टर कडे घेऊन गेले, मॅडम ने बरीच चौकशी केली, 
पण काही गोळ्या न देता सलाईन लावली व ऍडमिट करावे लागेल बोलल्या 

"बाप रे ऍडमिट साधा काटा टोचला तर ओरडणारी मी आज सुई टोचून घेणार होते , 
मी मन घट्ट करून बसले 
मॅडम नि सलाईन लावली 
व सकाळी कसल्या तरी टेस्ट सांगितल्या , 

"अभिमान तू जा घरी मी थांबते "
आई ने फर्मान सोडले व आई चा शब्द हे मोडतील असे कधी होईल का ????

पण मला मनातून यांनी थांबावे असे वाटत होते, 
मला सारखे मनात वाटायचे हे घरी गेले व मला काही झाले तर, 
मी मजाक मध्ये खुप वेळा म्हणायचे 
मला मरण तुमच्या कुशीत आले पाहिजे आज मला त्याच गोष्टी ची भीती वाटत होती, 
म्हणून मला ते जवळ हवे होते 
तेवढ्यात सिस्टर आल्या 
"पेशंट जवळ कुणीही एकच थांबू शकता" 

असे सांगून त्या निघून गेल्या 

"आई तू जा मी थांबतो " 
हे म्हणाले 

"काही नको तुला काही कळणार आहे का तिला काय होतंय तू जा " 
आई ठाम होत्या 

"आईई......
तू खरच जा 
मी आहे " 
हे आई ला विश्वास देत म्हणाले 

आई घरी निघाल्या 
मी फक्त यांच्याकडे पाहिले व डोळ्यातून अचानक एक अश्रू बाहेर आला 
किती मनकवडे आहेत हे यांना कसे कळते माझे मन 
असे म्हणून मी मनोमनी तृप्त झाले 

काय असेल मयुरी च्या पोटदुखी चे कारण 
मिळेल गोड चाहूल की असेल काही विपरीत 

जाणून घेण्यासाठी सोबत राहा 

क्रमशः .............. 

🎭 Series Post

View all