Login

स्वप्नांच्या पलीकडले (भाग 29)

Competition

स्वप्नाच्या पलीकडले ( भाग 29 ) 

( माघील भागात आपण पाहिले मयुरी चे पोट दुःखत असल्यामुळे तिला ऍडमिट केले होते व अभिमान तिच्या जवळ थांबला होता ) 


आता पुढे .......

हे माझ्या सोबत थांबले हा विचार करूनच मी थोडी रिलॅक्स झाले, 

यांना इतके अस्वस्थ मी या अगोदर कधीच पाहिले नव्हते, 
मला झोपायला सांगून हे देखील झोपी गेले 
परिस्थिती चे गांभीर्य मला अजूनही नव्हते, 


दुसरा दिवस उजाडला 
मॅडम पुन्हा चेक करण्यासाठी आल्या, 
त्यांनी मला प्रेग्नन्सी टेस्ट करायला सांगितली 
अर्थात मी सुशिक्षित असल्यामुळे मला त्या काय करताय हे तरी कळत होते 
मला त्यांनी टेस्ट करायला सांगितली म्हणून मला हसू आले
कारण 
डेट होऊन मला फक्त 13 दिवस वरती झाले होते व खुप वेळा असे होते माझ्यासोबत 


पण त्यांनी सांगितले म्हणून मी गेले व बघते तर काय ???
मी प्रेग्नंट होते माझा माझ्या डोळ्यावर च विश्वास बसेना मी आल्यावर यांच्या हातात स्ट्रीप देत म्हणाले 
"पॉझिटिव्ह आहे " 

मला हजार प्रश्न पडले झालेच कडे पण हे खुप खुश होते 
त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता

ते फक्त माझ्याकडे बघत होते, 
त्यांना इतके खुश बघून मलाही आनंद झाला, मला इतक्या लवकर मुलं नको होते पण जाऊ द्या कधीतरी होऊच द्यायचे आहे ना मग ती वेळ आत्ता आहे असे समजू
असे म्हणून नेहमीप्रमाणे मी सोडून दिले, 

तेवढ्यात आई आल्या टिफिन घेऊन 
यांनी खुणेने च मला काही सांगू नको 
म्हणून सांगितले 
मी देखील ऐकले म्हणलं काही असेल यांच्या मनात वेगळं काही असे समजून 

आई नि माझ्यासाठी गरम गरम मुगाच्या डाळीची खिचडी आणली होती 
छान तूप टाकून 
ती इतकी स्वादिष्ट वाटत होती की  पूर्ण रूममध्ये 
तिचाच वास पसरला होता 

"मयुरी गरम गरम आहे 
चल खाऊन घे " 
आई ने तंबी दिली 
मी देखील पटकन 
टिफिन घेतला कारण कालपासून पोटात काहीच नव्हते 
मी घास घालणार तोच मॅडम आल्या 

"तिला खायला काही देऊ नको 
आपण सोनोग्राफी करून घेऊ " 
असे सांगून निघून गेल्या 

मी डबा खाली ठेवला व सोनोग्राफी नंतर पण झाली असती ना पण या डॉक्टर लोकांचे खुप असते 
असे नकारार्थी बोलून गप्प बसले, 


सोनोग्राफी झाली 
रिपोर्ट देखील 
आले पण अजूनही मला काही खाण्याची परवानगी मिळाली नव्हती 
फक्त ती सिस्टर पुन्हा पुन्हा एकच विचारात होती 
कधीपासून पोट दुखत होते 
काही जड उचलले होते का???
उपाशी राहिल्या होत्या का ???
पडल्या होत्या का???
किंवा कुठल्या गोळ्या खाल्ल्या होत्या का ???
व मी नाही नाही 
सांगून थकून गेले होते, 

मी लोळत होते पलंगावर व हे मॅडम च्या केबिन मधून बाहेर आले त्यांचा चेहरा उतरला होता 

"काय ओ ....
काय झालं " 

मी यांना म्हणाले 


"काही नाही ग 
तू प्रेग्नंट नाहीयेस " 

हे म्हणाले 

"कसे शक्य आहे मी स्वतः च्या डोळ्यानी पाहिलंय " 
मी त्यांना म्हणाले 

"मयू जाऊ दे ग इतका काय विचार करायचा तसे पण आपण कुठे प्लॅनिंग करून ठेवले होते व राहील नंतर पुन्हा " हे मला धीर देत म्हणाले 

मी समजून घेतले होते काहितरी अडचण असेल म्हणून काढून टाकायचे आहे पण काय ?????


"पुढे काय मग" 
मी काळजीने म्हणाले 


"काहिनाही 
मॅडम करून घेतील सगळं 
तू फक्त थोडा धीर धर

"हो मी धरेल धीर 
पण काय झालंय ते तरी कळू द्या " 
मी यांना समजदारपणे म्हणाले 

"मयू 
अग 
गर्भ खराब आहे असे डॉक्टर चे म्हणणे आहे 
पण मला काय वाटते माहितीये का आपण काही प्लॅनिंग केलं नव्हतं त्यामुळे काळजी न घेतल्याने किंवा दुसरी एखादी गोळी खाण्यात आल्याने झालं असेल असं तू बिल्कुल मनावर घेऊ नको सगळं ठीक होईल 
व ही काय खुप मोठी गोस्ट नाहीये " ते माझा हात हातात घेऊन म्हणाले 


"तुम्ही सोबत असाल तर कुठलीही गोस्ट मोठी नाहीये माझ्यासाठी तरी "
मी त्यांना विश्वास देत त्यांच्या खांद्यावर डोकं ठेऊन म्हणाले 


वाईट तर दोघांनाही वाटत होतं पण एकमेकांच्या धीर देण्यासाठी आम्ही व्यक्त होत नव्हते 
त्यांचा कालचा चेहरा व आजचा चेहरा यात खुप मोठा फरक होता 

माझीही अवस्था काही वेगळी नव्हती एक तर देवाने न माघता दिल होत मग नीट ठेवायचं तरी असत 
व नसेल नीट द्यायचे तर दिलेच का ???
सुखात होतो ना आम्ही उगाच जीवाला व मनाला त्रास 

मनात विचाराचे काहूर माजले होते पण मी चेहऱ्यावर काहीच दाखवले नाही, 

एक क्षण का होत नाही 
आई होणं काय असत हे मी आज अनुभवलं होतं 
कदाचित आता तरी मला आई कधी चुकीच्या वाटणार नाहीत याची मला जाणीव होत होती, 

हॉस्पिटलमध्ये झालेल्या घडामोडी चा इथंभूत वृत्तांत यांनी आई ला सांगितला होता व आई कडून तो घरात पसरून 
आजूबाजूच्या दोन घरापर्यंत गेला होता, 

मला हॉस्पिटल मधून सुट्टी मिळाली व आम्ही घरी निघालो 
कॉलनी मध्ये उतरताच 

"बर वाटत का ग 
काळजी घे " 
अशा सुराच्या रांगा लागल्या 
आम्ही समजून घेतले 
यांनी तर मला याही पुढे सांगून ठेवले होते 
कदाचित जन्मच न घेतलेल्या नात/नातू 
यांच्यासाठी शोकसभा देखील भरवेल आई पण तू संयम ठेव ती अडाणी आहे तू नाही हे विसरू नको 

त्यांचे हे बोलणे आठवून मी शांतच राहिले 

घरात प्रवेश करणार तोच आई नि 
भाकरीचा तुकडा आणला व माझ्यावरून ओवाळून 
काहितरी पुटपुटत फेकून दिले 
इतका वेळ दुःखात असलेली मी आता थोडी स्थिर झाले होते, 

"वहिनी तुम्ही आराम करा 
व काही लागले तर सांगा " 
प्रियाताई सांगून गेल्या 

मी रूममध्ये आले 
आज तीच रूम मला वेगळी वाटत होती कदाचित जर गर्भ खराब नसता तर आज स्वागत वेगळे झाले असते, 
कदाचित त्या नवागताचे स्वागत करण्यासाठी आम्ही पोस्टर देखील खरेदी केले असते 
मी या विचारात अडकले होते तोच दुसरी बाजू आठवली मी पण किती वेडी आहे इतकी हळवी कशी झाले, 
ते काय कुणी मुद्दाम केलं का ???
किंवा कुणाच्या हातात देखील नाही, 
डॉक्टराणी  दिलेल्या गोळ्या औषधी घेऊन हे पाठीमाघून रूममध्ये आले, 
आज एक गोस्ट मला प्रकर्षाने जाणवत होती एरव्ही घरच्या समोर बाजू बाजू देखील न घेणारे हे, 
मला चार चौघात कुठलीच गोस्ट हक्काने न सांगणारे हे 
आज कुणाची च परवा न करता माझी काळजी घेत होते, 
माझी बॅग घेणे, 
मला पाणी देणे, 
उठताना , बसताना आधार देणे 
एवढेच काय तर स्वतः च्या हाताने खाऊ घालणे हे सगळं ते सर्रास करत होते 
आई किंवा इतर कुणाला न जुमानता 
कुठेतरी हा बदल बाळामुळे होता की मी आजारी पडले म्हणून ते काही कळत नव्हते, 
रात्रीची जेवण करून आम्ही रूममध्ये आलो , 
सगळी औषधे त्यांनी
 अजून थोडं , 
फक्त एकच, 
आता हे शेवटचं 
बघ बर संपलं 
असे करत दिली 
गोळ्या तर चक्क त्यांनी चमचाभर पाण्यात विरघळून 
आज माझ्या त्रासावर त्यांनी त्यांच्या प्रेमाची फुंकर घातली होती, 

आई होणं इतकं सुखदायक असत हे आज अनुभवलं होत...........

मी गोळ्या औषधे घेऊन पलंगावर पडले, 
रोज मी करणारी सर्व कामे ते करत होते, 
पाणी आणणे,
लाईट बंद करणे 
खिडक्या  बंद करणे, 
पडदे ओढणे 

आज यांच्यामध्ये मला माझी आई दिसत होती 
खरच नवरा बायकोचे नाते किती वेगळे असते ना , 
ते कधी कधी एकमेकांचे मुलं होऊन हट्ट करतात, 
तर कधी विरोधक होऊन भांडतात, 

कधी कधी एकमेकांचे मित्र/मैत्रीण बनून समजून घेतात 
तर कधी आई/वडील बनून काळजी घेतात 

"मयू 
खुप त्रास होतोय का ग ???
जर जास्त झाला तर मला उठवशील बर " 
ते केसांवरून हात फिरवत म्हणाले 

"हो ओ ......
सांगेल तुम्ही नका ना 
काळजी करू ..." 
मी त्यांच्या हाताची उशी करत म्हणाले 

आज हातही तोच होता व केस ही तेच पण स्पर्श वेगळा जाणवत होता, 
आज माझी आई दिसली मला यांच्यामध्ये ........

जाणून घेण्यासाठी कथेचा अंतिम प्रवास  भेटू 
पुढील भागात 

क्रमशः .................

🎭 Series Post

View all