स्वप्नांच्या पलीकडले अंतिम ( भाग 30 )
( माघील भागात आपण पाहिले अभिमान मध्ये स्वतः च्या आई चे अस्तिव बघून मयुरी झोपी गेली होती )
आता पुढे ..............
माझी तब्बेत बरी नव्हती म्हणून थोडे दिवस मी उशिरा उठले,
काही दिवसांनी मला बरे वाटल्यावर माझे नेहमीचे रूटीन पुन्हा चालू झाले,
आमचा संसार सुरळीत चालला होता
प्रत्येकजण स्वतः च्या कामात व्यस्त होता,
डॉक्टरांनी दिलेली गोळ्या औषधी
हे न विसरता स्वतः च्या हाताने मला देत होते
त्या प्रसंगापासून यांच्यात व माझ्या आयुष्यात खुप बदल झाले होते,
मॅडम ने सांगितलेला काळही संपला होता,
आता घरातील सर्वाना बाळाचे वेध लागले होते, कधी कधी तर मला पाळी आली की आई नकळत का होत नाही चिडचिड करायच्या ,
असेच दिवसमाघून दिवस जात होते व एका महिन्यात माझी पाळी पुढे ढकलली
पण माघाचा अनुभव पाठीशी होता म्हणून आम्ही जास्त काही बाऊ केला नाही,
दोन च दिवस वरती झाले व आई चे चालू झाले,
काळजी घे
जड उचलू नको
जास्त गरम खाऊ नको
पायऱ्या उतरू नको
पपई खाऊ नको
शिळे अन्न खाऊ नको
गाडी जोरात चालवू नको
बाहेर काही खाऊ नको
केशर टाकून दूध घे
नारळ पाणी पीत जा
फळ खात जा
जास्त पाणी पीत जा
"अहो आई अगोदर टेस्ट तर पोसिटीव्ह येऊ द्या "
मी डोक्याला हात मारत म्हणाले
"येईल ग पोसिटीव्ह त्यात काय एवढे
पण माघच्यावेळी सारखे नको व्हायला,
अग आमच्यावेळी असे नव्हते मुलं कसे होतं होते हे आई ला देखील माहीत पडत नव्हते पण आता काळ बदलला आहे
त्यामुळे काळजी ही घ्यावीच लागते"
आई नेहमीप्रमाणे चालू झाल्या,
दुसऱ्या दिवशी मी टेस्ट केली
मी प्रेग्नंट होते
यावेळी मी व आई हॉस्पिटलमध्ये आलो होतो,
मॅडम ने ट्रीटमेंट चालू केली,
पण ही आनंदाची बातमी यांना मी समोर सांगणार होते म्हणून मी कॉल केला नाही,
रात्री मी यांना तुम्ही बाबा होणार आहात हे सांगितलं
त्यांचा तर आनंद गगनात मावत नव्हता,
त्यांनी दोनी हातानी मला वरती उचलून घेतलं पण दुसऱ्या क्षणी मी आई होणार आहे याची जाणीव होताच पटकन
सॉरी, सॉरी .............म्हणत यांनी मला खाली ठेवले,
मग काय चालू झाला आमचा आई बाबा चा प्रवास,
मळमळ ....
उलट्या ....
करत करत तीन महिने निघून गेले
चौथा महिना लागताच माझा थोडा त्रास कमी झाला
चोथा.....
पाचवा ....
सहावा .....
महिना माझे व बाळाचे कुणाचेच वजन वाढेना
प्रत्येकवेळी मॅडम रागवायाच्या
व हे चिडायचे
आता माझे सगळे डायट यांनी स्वतःकडे घेतले,
सातवा महिना
डोळ्याचे पारणे फेडणारा सोहळा आई नि केला,
माझा प्रत्येक हट्ट पुरवला,
माझा हट्ट पुरवणाऱ्या आई व त्यांचा हट्ट करणारा मुलगा आई दोन्ही बाजू भक्कमपणे सांभाळत होत्या,
आठवा महिना माझे व बाळाचे वजन प्रचंड वाढले माझे तर रोजच वाढत होते,
माझ्या वाढलेल्या वजनाकडे बघून हे म्हणायचे
"कधी कधी वाढलेले वजन सुद्धा किती सुखदायक असते ग मयू "
व मी फक्त हसून त्यांना साथ द्यायचे,
रोज मी महिने मोजत होते व ते दिवस,
शेवटी नववा महिना लागला
मी साधे आई ......
जरी म्हणाले तरी हे झोपेतून जागी व्हायचे
कधी कधी तर मला इतके हसायला यायचे की जसे
आई मी नाही ....
हेच होणार आहेत,
रात्र रात्र जागत
कधी गप्पा मारत तर कधी रडत नववा महिना देखील संपला,
आत आई व हे खुप च काळजी करायचे
हे तर दिवसातून चार वेळा कॉल करायचे माझी तब्बेत विचारण्यासाठी
मुलगा होईल की मुलगी यांचे त्यांना काही घेणेदेणे नव्हते पण फक्त सगळं नीट व्हावे हीच अपेक्षा होती,
शेवटी उजाडला तो दिवस,
मला सकाळपासूनच काहितरी जाणवत होते,
मी जेवणही केले नाही
कुठेच मन लागत नव्हते,
मी फक्त घरातून बाहेर बाहेरून घरात चकरा मारत होते,
काळजी पोटी आई व यांनी मला माहेरी देखील जाऊ दिले नाही
मला त्रास चालू झाला हे समजताच आई ने माझ्या आईला बोलावून घेतले,
मला जास्त वेदना होत होत्या म्हणून हॉस्पिटलमध्ये नेले
मॅडम ने चार तासात मोकळी होतील म्हणून सांगून टाकले,
तोपर्यंत घरातील देव आई चे पाण्यात ठेऊन झाले होते,
घरात कुणीही जेवण देखील केले नव्हते,
वेळ जशी जशी जात होती माझ्या वेदना वाढल्या होत्या मॅडम ने दिलेला चार तासांचा कालावधी देखील संपला होता,
मी याच वेदनेसोबत रात्र काढली हे अजूनही माझ्या सोबत होते,
शेवटी सगळे प्रयत्न थकल्यावर डॉक्टर नि सीझर करायला सांगितले,
पण काही पण करा पण सीझर करू नक
अशी अडून बसलेली माझी आई
व डॉक्टर माझ्या मयू ला काही होता कामा नये असे सांगणारे हे यात डॉक्टर ची अडचण झाली होती
पण शेवटी सगळे प्रयत्न थकल्यावर अखेर डॉक्टर ने सीझर करण्याचे ठरवले
मला सीझर साठी नेले तेव्हापासून हे बाहेरच होते,
शेवटी सीझर झाले
व मुलगा झाला ....
सगळे खुश होते पण हे अजूनही मलाच शोधत होते, जेंव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा यांनी सुटकेचा निस्वास सोडला,
सुट्टी होऊन मी घरी आले
सासरी काही दिवस थांबून आराम मिळावा म्हणून माहेरी आले,
आमचे येणं हे यांना व घरातील लोकांना पचण्यासारखे नव्हते,
काही दिवसातच यांनी मला पुन्हा सासरी आणले,
बाळाचे
पालथे पडणे,
रागने,
हसणे
रुसने फुगणे
या सर्वांनी घर आनंदाने भरून गेले होते,
त्याच पडलेलं पहिलं पाऊल
त्यानं बोललेलं पहिला शब्द
व त्याचा पहिला वाढदिवस
हे सगळ काही यांनी मोबाईल च्या कॅमेऱ्यात कैद केलं होतं
बाळ हळूहळू मोठे होत होते
व घरातील सर्व गुण्या गोविदाने नांदत होते
तेवढ्यात प्रियाताई साठी स्थळ चालून
आले
उद्या मुलगा बघायला येणार आहे
व आज हे घरात सांगण्यात आले
मनात हजार प्रश्न होते
ताई तयार होतील का???
काय वाटेल त्यांना
मी यांच्याशी बोलू का???
नाही नको उगाच चिडतील
आता वेळच ठरवेल काय ते .....
असे म्हणून मी आवरायला लागले,
व बघते तर काय प्रिया आवरून समोर आली
कदाचित गेलेल्या काळामध्ये किंवा वयासोबत आलेल्या समजुतदार पणामुळे प्रिया तयार झाली असेल
माझ्यासाठी हा सुखद धक्का च होता,
पाहुण्यांची जागेवर पसंती दिली व प्रिया चे लग्न ठरले
"वाहिणीसाहेब कुठे हरवलात
अहो आम्ही बाहेर जाऊनही आलो
तुम्ही अजून इथेच बसून आहात तर "
प्रिया च्या या वाक्याने मी भानावर आले,
नेहमीप्रमाणे स्वतःवर हसत
मी किचनमध्ये गेले .....
मनातल्या मनात देवाचे आभार मानत होते
कारण खरच .......
मी अनुभवत होते एक गाव
स्वप्नाच्या पलीकडले ..........
स्वप्नांच्या पलीकडले .........
@ कथा सत्य घटनेवर आधारित असून एका सामान्य कुठूबातील आहे,
कथा माघील 6/7 वर्ष अगोदर ची असून
कथेमध्ये काही दोष आढळल्यास ती लेखकाची उणीव समजून माफ करावे,
कथा इतर कुठे प्रकाशित करायची असेल तर लेखकाच्या नावासहित करू शकता पण साहित्य चोरी नको
कारण लेखन हे लेखकाचा आत्मा असते
कथेला आपण सर्वांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार
आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा मी वाट बघतेय त्यांची,
कथेचे सर्व अधिकार लेखिका गीता सूर्यभान उघडे यांच्याकडे राखीव आहेत.
धन्यवाद
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा