स्वप्नांच्या पलीकडले ( भाग 5)
( माघील भागात आपण पाहिले
मयुरी अभिमान च्या रूम मध्ये पाणी ठेवण्यासाठी गेली होती पण तो काहीच बोलत नाही म्हणून ती निघून येते लटका राग आणून)
आता पुढे .....................
आज मी आत्या सोबत झोपलेली यांना आवडले नव्हते,
रोज झोपताना येणारा
Good night
चा मेसेज आज आला नाही,
मला थोडे हसू आले किती लहान मुलासारखे वागतात हे,
मी मनाशीच हसले व मीच मेसेज केला पण त्यांनी रिप्लाय काही केला नाही,
"चल मयुरी साहेब रुसले वाटत"
असे म्हणून मी झोपी गेले,
सकाळी मी सर्वात अगोदरच उठले, झाडून, रांगोळी आवरून किचनमध्ये जाऊन काम आवरू लागले, मग आई, आत्या, प्रिया , बाबा ,आजी सगळे उठले,
मी आई च्या प्रत्येक सूचनेचे पालन करत होते,
कुणाला काय हवं नको ते सगळं नीट बघत होते,
मी आई नि सांगितल्याप्रमाणे नास्ता तयार केला,
पण साहेबांचा अजूनही पत्ता नव्हता,
मुळात घरात आजी चे नियम खुप कडक होते त्यांना उशिरा पर्यंत झोपलेले आवडायचे नाही,
"मयुरी तुझा नवरा उठला नाही का आणखी"
आजी ने कडक आवाजात विचारले,
"नाही"
मी बघून येते
असे म्हणून मी रूम कडे आले,
आजी ला सांगून तर आले होते की बघून येते पण स्वारी चिडलेली आहे हे माहीत असूनही
रूम मध्ये जाणे म्हणजे
तोफेच्या तोंडी हाताने जाण्यासारखे होते,
तरीही मी हिम्मत करून गेले,
"ओ .........
ओ ...शुक शुक.........
उठा ना,
मी त्यांना हलवण्याची पुढे केलेला हात मागे केला,
अंगावरील काढावं म्हणाले तर त्यांनी ते डोक्या व पायाखाली इतके मजबूत पकडले होते की मला काढता येन शक्य नव्हतं,
आता मी अडकले होते बाहेर गेले तर आजी ला काय सांगू ???
व इथे थांबले तर यांना कसे उठवू,
मी विचार करू लागले व हिम्मत करून मी अंगावरील काढले,
मी जसे अंगावरील काढले ते पटकन उठून बसले व जोरात माझ्यावर ओरडले
काय आहे ???
त्यांचे डोळे,
त्यांचा आवाज
व त्यांनी दिलेला हाताला झटका,
मी घाबरले व रडायला लागले,
समोर मला बघताच ते देखील घाबरून गेले,
"ये आग रडू नको ना मला वाटलं प्रिया आहे ती रोज अशीच करते मला ,
मग वाटलं आज पण तीच आहे म्हणून ओरडलो व तू येशील असे वाटले देखील नाही ना ,
ये बाई अग गप्प बस ना घरातील लोक जमा होतील"
"काय वैताग आहे यार " असे म्हणून ते मला शांत करण्याचा प्रयत्न करू लागले,
मला देखील रडायचे नव्हते पण माझ्या डोळ्यातून आपोआप पाणी येत होते,
मी तोंड पाडून माघारी फिरणार तोच त्यांनी हात पकडला,
एक वीज संचारल्या चा अनुभव आला,
माझा गोधळ उडाला काय बोलावे, काय करावं काही सुचेना, मी दरवाजातून कुणी येते की काय ते बघत होते फक्त ,
त्यांनी हात तसाच पकडून ठेवला व ते उठून समोर येऊन उभे राहिले,
त्यांचं ते एकटक माझ्याकडे बघत मला अवघडल्यासारखे वाटत होते, त्यांच्या नजरेला नजर देणं तर दूर मला वरती मान करून बघणे देखील अवघड झाले होते,
ते तसेच समोर उभा राहीले,
ते हळूहळू समोर येत होते त्यांची पाऊले जशी समोर येत होती तशी माझी माघारी सरकत होती,
ते अंतर कमी करत होते व मी वाढवत,
मी माघे सरकत ,सरकत
मी भिंतीला टेकले ,
आता मी भीतीचा आधार घेतला,
त्यांनी एक हात भीतीला टेकवत एका हाताने चेहऱ्यावर आलेले केस मागे केले,
तितक्यात प्रिया चा आवाज आला ,
"वहिनी मुक्काम करता की काय????"
आम्ही दोघे ही गोधळलो,
त्यांचे प्रियाकडे लक्ष विचलित झाले हे समजताच
मी त्यांच्या हाताला झटका देत सुटका करून घेतली,
माझा बदला देखील पूर्ण झाला होता,
मी किचनमध्ये जाऊन आई ची मदत करू लागले,
मी शरीराने कामात गुंतले होते पण मनाने अजूनही रूम मध्ये च होते,
त्यांच्या त्या स्पर्शाची जाणीव अजूनही मला जाणवत होती,
खरच प्रेमाचे, स्पर्श, नजर, भावना च वेगळ्या असतात ना ???
ते ओळखावे कधीच लागत नाहीत फक्त अनुभवावे लागतात,
मी किचनमध्ये काम आवरत होते व बाहेर कुणाच्या तरी बोलण्याचा आवाज आला,
कोण आहे हे बघण्यासाठी मी बाहेर गेले तर आई चे शब्द आठवले आई सांगायची लग्नानंतर कुणी जर घरी आले मग ते पाहुणे असो की शेजारचे कुणी तर आपले हातातील काम टाकून त्यांना अगोदर पाणी द्यायचे, त्यांचे दर्शन घ्यायचे
व मग आपले काम करायचे
आई च्या आज्ञेप्रमाणे मी हॉलमध्ये गेले त्या बायकांना पाणी देऊन दर्शन करून आले, स्वतः चे काम बाजूला ठेऊन त्यांना चहा करून घेऊन गेले मी दुरून दिसताच त्या काहीतरी कुजबुजत होत्या पण काय ते मला देखील कळले नाही , मी चहा ठेवला व निघून आले,
काही वेळाने त्या निघून गेल्या
मनात खुप प्रश्न होते कोण होत्या त्या ??
का आल्या होत्या ???
व माझ्याकडे असे का बघत होत्या??
कधी नविनवरी बघितली च नाही अश्या ???
त्या गेल्या नंतर प्रिया ताईकडून कळले की त्या मला बघायला आल्या होत्या,नविनवरी खुप शिकलेली आहे,
त्यात शहरातील मग तिला काही काम येत का नाही ती कशी वागते कशी बोलते
तिला स्वतः ची काही समज आहे की नाही ,
मनाने पायाला वाकते की नाही,
अशा सर्व कसोट्यावर माझे मूल्यमापन झाले होते व आनंदाची गोस्ट म्हणजे मी त्यात पास झाले होते,
"अभिमान तुझी बायको सुंदर ते सोबत वळणदार देखील आहे बर"
त्यातील एकीचे शब्द प्रिया ताई ने मला सांगितले,
किती कमल आहे या बायकांची
एखादी मुलगी तिचे आई वडील सोडून येते ,
वस्तू पासून तर माणसापर्यंत सगळं जग तिच्यासाठी अनोळखी असते,
अरे तीच तिची भानावर नसते
तिला स्वतः च्या वस्तू कुठे आहेत हे देखील माहीत नसते ती दुसऱ्याच्या काय ठेवणार,
व तुम्ही मूल्यमापन तरी कसे करता तिचे, जर तुम्ही तिला काही शिकवले व नंतर तिला ते जमते की नाही हे बघितले तर वेगळी गोस्ट आहे,
पण तिला तुमचे काहीच सहकार्य नाही तर तिचे मूल्यमापन करण्याचा तुम्हांला अधिकार दिला कुणी,
मुळात एक स्त्री च दुसऱ्या स्त्री ची वैरी असते ?????
हे पटतंय का ????
नवी नवरी तिला सांभाळावे, सावरावे, की तिचे मूल्यमापन करावे?????
मला तरी यांचे हे वागणे आवडले नव्हते,
आणि मी ते प्रियाकडे बोलून दाखवले,
प्रत्येकवेळी ठरते नेहमी
मूल्यमापनाची बळी
जरी असेल ती अजून
उमळणारी कळी
घरातील माणसे ती
विश्वासाने जोडते
तरीही ती कुठेतरी
कमीच पडते
पण या बाबतीत
मी माझे नशीब काढले
अनुभवत होते मी
एक गाव स्वप्नांच्या पलीकडले
क्रमशः ..........
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा