आयुष्याच्या बाबतीत कमनशीबी राहीली लतिका , बाबा गेल्यावर सतत कष्ट ऊपसत राहीली माझी लतिका , शेवट ही तिचा कष्टाने गेला रे ss तुझ्यात खुप जीव होता तिचा , खुप प्रेम करत होती तुझ्यावर , तिला मैत्रिणी ही जास्त नव्हत्या , ती तुझ्यातच जास्त रमायची , तिच्याआठवणीने सगळेच रडायला लागले , सुशीलाबाईंची तब्येत खराब व्हायला लागली , तसे रमाबाई म्हणाल्या , अवी आवर स्वतःला , लतिकाची जबाबदारी आता तू घे , सुशीला आता तुझी जबाबदारी आहे , रडू नकोस , बघ तिची तब्येत खराब होईल आता , सावर स्वतःला , तसे डोळे पुसत अवी लतिकाच्या फोटोला बघू लागला , किती सुंदर माझी लतिका , केवढी मोठ्ठी लाल बिंदी लावली कपाळावर , लाल लिपस्टिक तर शोभून दिसतेय तिला ,
कानातले किती सुंदर निळ्या खड्यांचे , निळी सुंदरशी साडी , गळ्यात निळ्या खड्यांचा हार , हातात हिरवा चुडा , सोबत निळ्या बांगड्या , लांबसडक केसांची वेणी समोर घेतलेली , मोगर्याचा गजरा केसांत माळलेला , एकदम मोगर्याचा सुगंध दरवळला चहूबाजुला , तसा अवी चमकलाच , ही ,, हे तर,, स्वप्नातल माझ्या , अशीच तर दिसली मला लतिका ! म्हणजे ,,, म्हणजे,,, ते,, स्वप्न नव्हतं,,,,?
कस शक्य आहे ! त्याला कळेचना , अस कस काय ?
मी आणि लतिका खरेच ते दिवस जगलो ,,, तिच्या माझ्या मनातले,,,,ते क्षण ! पण हा फोटो इथे कसा आला,,,,,!
काय आहे हे ! हे भगवान , काय ही तुझी लीला , तीव्र दुःखाने आईकडे बघून अवी मोठ्यांने म्हणाला , हा ,, हा,, फोटो इथे कसा ? म्हणजे कधी आणला , कोणी आणला ? अरे अवी ती लग्नासाठी पैसे बाजूला ठेवायचीच , तुझ्यासाठी निदान काही खरेदी करायची असे स्वप्न होते तिचे , एक ड्रेस तिला आवडला तुझ्यासाठी , तर तिने घेतला निळ्या रंगाचा ड्रेस , मग स्वतःसाठी त्याच कलरची साडी घेतली , म्हणजे ही ! ती तुला देणारच होती ड्रेस दिवाळीमधे , साडी आणल्यावर ती कशी दिसते अंगावर म्हणून तिने घालून बघीतली होती , सोबतच हे सगळे दागिने पण घातलेत , कसे दिसतात म्हणून , अहो पण काकू दागिने तर आई जवळ होते ना ? हो बेटा , तुझ्या ड्रेसची साईज बघायसाठी म्हणून आणि आईला तुझा ड्रेस दाखवायला आम्ही तुझ्याकडेच आलो होतो , त्या दिवशी तू ऊशीरा घरी परतलास , तसेही आईला सांगीतले होते , सिक्रेट ठेवायचे म्हणून , मग तुला काही कळू दिल नाही , तुझ्याकडे येताना , ती गजरेवाली दिसली , तर तिच्याकडून गजरे घेतले होते लतिकाने , आदल्या दिवशी त्या शेजारच्या मुलीच लग्न होत , तर मेहंदी काढलेली होती तिथे आम्ही सगळ्यांनी , तुझा साईज बघायसाठी कपाटातून एक शर्ट आईने काढले , तर सहजच लाॅकर मधले दागिने दाखवलेत रमाने , लतिकाने मंगळसूत्र वगैरे घालून बघीतलेत आणि मेघा ने फोटो काढले तिचे ! ऐकुण अवी अचंबित झाला ! बापरे , भगवंता काय ही तुझी लीला ! स्वप्न की हकीकत , कळत नाहीये मला ! का केलस माझ्या सोबत अस ? का ,, का,,,मला लतिका हवी ,, म्हणजे हवी ,,,,लतिकाssपरत पाठव तिलाsssभगवंताsssपाहीजे मला तीssssआणि अवी ने एकचं किंकाळी फोडली , लतिकाssssssलतिकाssss
००००००००००००
००००००००००००
अहो संध्याकाळी लवकर याल ना ?
काय काम आहे ?
प्रश्नार्थक नजरेने पायात बुट घालत अवी म्हणाला ,
अहो आज कपडे घ्यायला जायच ना ?
अंजली चा वाढदिवस आहे ना ऊद्या !
ओ हो ! कस काय डोक्यातून निघाल माझ्या ,
कुठे आहे माझी लाडकी ?
ती ना शेजारच्या तिच्या मैत्रिणीकडे गेली आहे आईंसोबत ,
अरे इतक्या सकाळी शेजार्यांकडे खेळायला ?
अहो आई म्हणाल्या ऊद्या पुजा करुया ,
मग भटजींचा नंबर घ्यायचा होता शेजारच्या काकूं कडून , त्यांची नात वैभवी , तिच्याशी हिची चांगली गट्टी आहे ,
म्हणून ही पण गेलीय आई सोबत , बस येतीलच एखाद्या तासात , बरं मग मी निघतो आणि संध्याकाळी येतो लवकर , मग जावू बाजारात ,
बरं ठिक आहे ,
निघतो गं मी ,
हो ,, या ,,, .
अवी च्या मागे मागे भार्गवी दारापर्यंत आली ,
अवी आपल्या कार मधे बसून तिला टा,,टा,, करत आॅफीस ला गेला , मग भार्गवीने गेट बंद केले आणि आत सोफ्यावर येऊन पसरलीच , चला आता थोडा आराम करु ,
सोफ्यावरुन तिची नजर हाॅलभर भिरभिरली ,
ओ हो , बाई आली की जरा कोपर्यातल जळमट तिला काढायला सांगते ,
नाही , पुर्ण घरच तिला ना , आज साफ करायला सांगते ,
म्हणजे अंजली झोपली की रात्री घर सजवायला बरे जाईल , तेवढेच तिला सरप्राईज मिळेल सकाळी ,
नाही का ? ती स्वतःशीच बोलून खुदकन हसली ,
तिच्या नजरेसमोर अंजलीचा आनंदी चेहरा तरळला ,
हसतच तिची नजर समोर भिंतीकडे गेली ,
भिंतीवर मोठ्ठा फोटो टांगलेला होता ,
फोटोला बघताच तिचे हसणे थांबले ,
क्षणभर तिला वाटलं ,
ती फोटोतून तिला निहारत आहे ,
ऐ ,, अशी काय बघतेस ?
हो पण तू तेवढच करु शकतेस !
पण कधी तरी अशी माझ्याकडे बघणे बंद कर बाई ! हातजोडून , थोडी त्रस्त होत भार्गवी मोठ्ठ्याने म्हणाली , कुणाशी बोलतेस गं ?
अरे तुम्ही आलात पण ? रमाबाईंच्या आवाजाने दचकून सोफ्यावरुन ऊठून तडक ऊभी राहीली ती ,
अगं एवढ दचकायला काय झालं !
मला वाटल तू फोनवर कुणाशी बोलत आहेस ,
अहो , ते असेच काही विचार येत होते मनात ,
अ,, अ,,, अहो ते ऊद्या साठीचा विचार करत होते ,
तेच मोठ्यांने बोलले,, बस्स,,
हो का ! बरं ,
अवी आॅफीसमधे गेलाही ,
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा