स्वप्नपूर्ती
जलद लेखन स्पर्धा
विषय घरटं
©® सौ.हेमा पाटील.
शर्मिलाच्या घरी आज खूप गडबड सुरू होती. शमाला पहायला पाहुणे येणार होते. मुलगा वाईला एका कंपनीत अकाऊंटंट होता. शमा सुद्धा वाईतील एका नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून लागली होती. गेल्या वर्षी पासून तिच्या लग्नाचे बघायचे चालले होते. कधी पत्रिका जुळायची नाही तर कधी मुलाकडून होकार यायचा नाही. कधी तिकडून होकार आला तर शमाला मुलगा पसंत नसायचा. लग्न म्हंटले की तडजोड आलीच...पण योगही यावा लागतो हेही खरे!
तर आज पहायला आलेला मुलगा राघव सकृतदर्शनी पहाता शमाला आवडला. रुबाबदार होता, उंचपुरा होता. घरचे सगळे गावी रहात होते. मुलगा एकटाच वाईत रहात होता. हीच एक काय ती बाब शमाच्या पसंतीस पडली नाही. तिची इच्छा होती, सगळे कुटुंब नोकरीच्या ठिकाणी रहात असावे, तसे या स्थळाबाबत नव्हते. मुलगा भाड्याच्या खोलीत रहात होता. मुलाला नोकरी असावी यासोबतच त्याचे स्वतःचे घर असावे अशी शमाची इच्छा होती.
बाकी सगळे व्यवस्थित होते. आईने तिची समजूत काढली.
"घर काय पुढेमागे होईलच. मुलगा दिसायला चांगला आहे, पर्मनंट नोकरी आहे. आता उगाचच घराचे खुसपट काढू नकोस. तुझ्यामागे अजून एक बहिण लग्नाची आहे हे विसरु नकोस."
"घर काय पुढेमागे होईलच. मुलगा दिसायला चांगला आहे, पर्मनंट नोकरी आहे. आता उगाचच घराचे खुसपट काढू नकोस. तुझ्यामागे अजून एक बहिण लग्नाची आहे हे विसरु नकोस."
आईने सांगितलेले तिला पटले व तिने होकार दिला. यथावकाश ती
सौ. शर्मिला राघव दिक्षित बनून त्याच्या घरी आली. लग्न झाल्यावर त्याच्यासोबत त्याच्या गावी आठ दिवस कसे गेले ते समजलेही नाही. त्यातील दोन दिवस नवे जोडपे पन्हाळा येथे हनिमूनला जाऊन आले.
परत आल्यावर मात्र दोघांचीही वाईला परतण्याची घाई सुरू झाली, कारण त्यापेक्षा जास्त सुट्टी ते घेऊ शकत नव्हते.
सौ. शर्मिला राघव दिक्षित बनून त्याच्या घरी आली. लग्न झाल्यावर त्याच्यासोबत त्याच्या गावी आठ दिवस कसे गेले ते समजलेही नाही. त्यातील दोन दिवस नवे जोडपे पन्हाळा येथे हनिमूनला जाऊन आले.
परत आल्यावर मात्र दोघांचीही वाईला परतण्याची घाई सुरू झाली, कारण त्यापेक्षा जास्त सुट्टी ते घेऊ शकत नव्हते.
वाईत आल्यावर राघवच्या भाड्याने रहात असलेल्या खोलीत त्यांनी संसार थाटला. शमा थोडी नाराजच होती, पण नवी नवरी असल्याने लगेच कसे बोलायचे असे तिला वाटत होते.
लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांत भाड्याच्या छोट्याशा खोलीमध्ये राहणारे राघव आणि शमा एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. ॲरेंज मॅरेज असल्याने लग्नापूर्वी दोन चार भेटीगाठी झाल्या तरी त्यावरुन स्वभावाचा अंदाज येत नाही, कारण अशावेळी माणसे चांगलेच वागतात. जेव्हा दोन माणसे बऱ्याच कालावधीसाठी एकमेकांच्या जवळ येतात तेव्हा एकमेकांची खऱ्या अर्थाने ओळख होते, कारण अशावेळी आपले गुणदोष आपोआपच प्रकट होतात. तरीही सुरवातीच्या नव्या नवलाईच्या दिवसांत नवरा बायकोमध्ये असणारे शारिरीक आकर्षण दोष दाखवून देत नाही. जसजसे दिवस जातात तसे एकमेकांबद्दल मत तयार होऊ लागते.
भाड्याच्या खोलीत रहात असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागायचा. पहिले म्हणजे सार्वजनिक नळावरुन पाणी भरावे लागायचे. वाड्यात भाडेकरुंसाठी दोन नळ होते. सकाळी ऑफीसला जायची गडबड आणि त्याचवेळी पाणी भरायची गडबड असायची. कधीकधी पाणी भरण्याच्या नादात भाजी करपायची. कधी कधी आंघोळीला उशीर व्हायचा. तीच गत सार्वजनिक संडासची...तिथेही लाईन लावावी लागायची.
या सगळ्या गोष्टींचा शमाला त्रास व्हायचा. एकदा रात्री तिने ठरवून राघवजवळ विषय काढला.
"मी काय म्हणतेय, आपण किती दिवस असे भाड्याच्या घरात रहायचे? आपण आपले घर घेण्याचा विचार करुयात."
"मी काय म्हणतेय, आपण किती दिवस असे भाड्याच्या घरात रहायचे? आपण आपले घर घेण्याचा विचार करुयात."
"कसे शक्य आहे? आपले दोघांचे पगार ते किती? यात वाईसारख्या ठिकाणी घर घेणे सोपे आहे का?" राघव म्हणाला.
"आपण चौकशी तर करुन पाहू. एकदा पाण्यात पडले की पोहायला येते. जर हातपाय हलवले तर काहीतरी पर्याय समोर येईल. आपण त्यादृष्टीने प्रयत्न केला तर समजेल तरी. आत्ता शक्य झाले नाही तरी भविष्यात तरी घेण्याचा विचार करता येईल. आत्ता आपण दोघेच आहोत. उद्या मुले बाळे झाली की संसार वाढीला लागेल, मग खर्चही वाढेल. त्यापेक्षा आत्ता आपण दोघेच आहोत तर सुरवातीला नियोजनाची घडी व्यवस्थित बसेल." शमाचे हे बोलणे राघवला पटले.
"ठीक आहे. जशी आपली आज्ञा राणीसाहेब. आपण चौकशी करुयात." राघवने आश्वासन दिले.
शमा हसत हसत म्हणाली,
"अहो, घर घ्यायचे म्हंटले तर मोठा प्रवास आहे. पण आपण दोघे सोबत असलो की शक्य होईल."
त्याक्षणापासून त्यांच्या संसाराच्या नकाशावर एकच रंग चढला, घरटं बांधायचा....
क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा