वाड्यात काय झालं असेल ? काल बांधलेला सदा सुटून खाली आला कसा ? शीः ... तिने मग देवीचे दर्शन घेतले. आणि ती जत्रेत नैनाला घेऊन मिसळून गेली. थोडं फार खाणं झालं होतं. अडीच तीनच्या सुमारास ती वाड्याच्या गेटजवळ परत आली. आतून मामांच्या बोलण्याचा आवाज येत होता. ते कोणाशी तरी बोलत होते. तिला वाटलं खडपा. नैनाच्या हातात दोन तीन जत्रेतल्या शिट्ट्या आणि गॅसचे एक दोन फुगे होते. तिचा मूड खेळण्याचा होता. पहिल्या पायरीवर आल्या वर तिला दिसलं की एक गव्हाळ वर्णाचा तरूण मुलगा मामांशी बोलत होता. मामांशी बोलता बोलता तो थांबला आणि त्याने तिच्याकडे पाहिलं. साधारण साडीतही ती आकर्षक दिसत होती. लाल गोऱ्या रंगावर हलक्या गुलाबी रंगाची साडी चांगलीच शोभून दिसत होती. मूळच्याच आखीव भुवयांखाली असलेले चंचलतेने हालणारे तेजस्वी डोळे , तरतरीत नाकाखाली असलेली छोटीशी जिवणी , आणि एकूणच कमनीय बांधा असल्याने सुहास तिच्याकडे पाहातच राहिला. मामांच्या सराईत नजरेतून हे सुटले नाही . ते म्हणाले, " अरे हो, सुहास तू हिला ओळखली नसशीलच. " थोड्या तुच्छतेनेच ते म्हणाले, " आपली चंद्रा माहित असेलच तुला, तिची ही मुलगी. नवरा गेला शिवाय पदरात एक मुलगी , त्यातून घरमालकानी जागा ताब्यात घेतली, मग म्हंटलं , राहा इथेच. तिलाही आधार . " सुहास अंदाजानेच खरं आहे म्हणाला. मामानी मग रेखाला सुहासची ओळख करून दिली. "रेखा हा सुहास . माझा सख्खा भाचा . (म्हणजे ती सख्खी नव्हती असं दाखवायचं होतं की काय ? ) इंजिनियर आहे , आता दुबईला जायचाय , नोकरीसाठी. " ती खालच्या मानेने आत शिरली. आधी तिने "त्या" खोली कडे पाहिले, तिला बाहेरून अडसर होता. तेव्हा कुठे तिला बरं वाटलं. मग ती स्वैपाकघरात शिरली. तासाभरात स्वैपाक करून ती पानं वाढली असल्याचं सांगाय्ला दिवाणखान्यात गेली, तर सुहास चक्क तिला नैनाबरोबर खेळताना दिसला. नैनाला पण त्याच्याशी खेळताना आनंद वाटत होता. मुलाचं बरं असतं. त्यांना पटकन कोणाशीही मैत्री करता येते. मोठ्या माणसांना का करता येत नाही ? तिच्या मनात आलं. जेवणं होईपर्यंत संधाकाळचे पाच वाजत आले. मग सगळेच थोडे लवंडले.
त्यावर तो म्हणाला, " तुला काहीतरी सिद्धी प्राप्त झाली असावी असं वाटतं. माझ्या मनात जगावेगळं काही नाही. पण रेखा खरं सांगू ? सांग ना, तू परवांगी देशील तरच सांगतो. ...
ती म्हणाली, " एवढं बोललात , आता बोलून तरी टाका. मला कसली आल्ये सिद्धी ? एकच सांगते , माझ्या सारख्या सामान्य आणि कमनशीबी मुलीचा तुम्ही फार विचार करू नका. .... जरा वेळ विचार करून तो धाडसाने म्हणाला, " हे बघ रेखा , तू मला फार आवडलीस. यू आर ए पर्फेक्ट वाईफ फॉर मी. ....... तिची प्रतिक्रिया अजमावण्यासाठी त्याने तिच्या चेहेऱ्याकडे पाहिले. तवा तापला होता. त्यावर नवीन भाकरी टाकीत ती म्हणाली, "सगळ्याच गोष्टी दिसतात तशा नसतात. तुम्हाला माझ्यासारख्या एका मुलीची आई असलेल्या बाईशी लग्न करण्याची काय गरज आहे ? तुम्हाला चांगली शिकलेली नोकरी करणारी मुलगी सहज मिळेल. माणसानी नेहेमी आपली पातळी पाहावी, त्यच्या खालच्या पातळीवर उतरू नये. " ...... थोडा वेळ शांततेत गेला. मग तो काही न बोलता मामांच्या हाका ऐकून निराशेने उठून बाहेर गेला.
(क्रमशः)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा