Login

स्वप्नी फक्त तूच दिसे

कविता
चाहूल तुझ्या येण्याची मला लागताच
स्वप्नी फक्त तूच दिसे
आई होणार  कळले जेव्हा
तेव्हा पासून सगळीकडे तूच असे
तुझ्या येण्याने आयुष्य बदलूनी गेले
आई होण्याचे सुख मला लाभले
नऊ महिने तुला स्वप्नी बघुनी
मी आनंदी होत असे
पहिल्यांदा तुला हातात घेतांना
काय सांगू तुला किती तो आनंद मला मिळालं
सगळं त्रास क्षणात निघून गेला
जनू मला नाव जन्म मिळाला
तुझ्यात मी स्वतः हा ला बघते
खरचं आईपण हे किती वेगळे असते.
पहिल्यांदा तुला बघताना मला स्वप्नच भासले
कारण नऊ महिने स्वप्नी फक्त तुलाच पाहिले


प्रिय वाचक
स्वप्नी फक्त तूच दिसे ह्या विषयावर लिहिताना मला पहिल्यांदा आई होण्याचे सुख आणि आनंद लिहावसा वाटला.आशा करते तुम्हाला आवडेल.कविता वाचा आणि समीक्षा नक्की द्या.
माझ्या कथा मालिका वाचण्यासाठी मला फॉलो करा.