राज्यस्तरीय कथामालिका लेखन स्पर्धा
विषय- सामाजिक कथा
निशाला तिची चूक समजली होती, पण आता रोहन तिला घरात घेईल की नाही याची शंका होती. सकाळी सकाळी ती तिचे सगळे काही आवरून तिच्या घरी म्हणजेच माहेरी जायला निघाली. तिच्या मैत्रिणीने कितीही आग्रह केला तरी ती तिथे थांबली नाही. अगदी चहा सुद्धा न घेताच ती तिथून निघाली कारण तिला तिची चूक समजली होती आणि आपण भयंकर अपराध केला आहे असे तिला वाटत होते. \"त्या सगळ्या मैत्रीणी माझ्याशी खोटं बोलल्या. त्या भले सांगत होत्या पण मला त्यांच्यावर किती विश्वास ठेवावा याचे भान राहिले नाही. मी रागात होते त्यामुळे नको नको ते विचार माझ्या मनात येत होते. मी कोणाचेच काहीच ऐकले नाही. मी मैत्रीणींचे ऐकून घ्यायला नको होते. आता माझ्या घरचे तरी मला समजून घ्यावेत हीच अपेक्षा आहे.\" असे निशा मनातच म्हणत होती.
निशा तिच्या माहेरी गेली. स्वतःच्याच घरात जायला तिला आज लाज वाटत होती. थोडा वेळ ती बाहेरच थांबली आणि नंतर थोडेसे धाडस करून ती आत गेली. आत गेल्यानंतर तिने पाहिले तर तिचे आजोबा हॉलमध्ये पेपर वाचत बसले होते. त्यांच्यासमोर जायला तिला भीती वाटत होती. आता काहीही करून या सगळ्या गोष्टीला सामोरे जावेच लागणार होते. तिने थोडेसे धाडस केले आणि ती आजोबांसमोर गेली पण त्यांच्यासमोर तिच्या तोंडातून एक अक्षरही बाहेर पडले नाही. ती तशीच स्तब्ध त्यांच्यासमोर उभी राहिली.
"अगं निशा, तू सकाळी सकाळी इथे? काही झाले आहे का? तुझ्यासोबत जावईबापू आले आहेत का? अगं मग त्यांना आत बोलवायचं ना. कुठे आहेत ते?" आजोबांचा आवाज ऐकून घरातील सगळेजण बाहेर आले आणि निशाला पाहून आश्चर्यचकित झाले.
"आजोबा, मला माफ करा माझं चुकलं." असे निशा म्हणाली आणि सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. ही काही भांडण वगैरे करून आली आहे की ते घर सोडून आले आहे? हिला तिथे करमत नाही का? तिथले लोक काही बोलले का? असे एक ना अनेक प्रश्न सर्वांच्या मनामध्ये आले होते. आता सर्वांचे लक्ष निशा काय बोलते इकडे होते पण निशा काहीही न बोलता तिथेच आसवे गाळत उभी होती. या सगळ्यामुळे कोणालाच काहीच कळायला मार्ग नव्हता.
"अगं, बोल ना काहीतरी. असे का मधेच अडखळलीस. तुला तिथे कोणी काही म्हटले का? की तू काही म्हणून आलीस? काहीतरी बोल ग." आजोबा म्हणाले.
निशाने रडतच सर्वांना घडलेला प्रकार सांगितला. तो प्रकार ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. कोणाला काय बोलावे तेच सुचेना. सगळे फक्त एकमेकांकडे पाहत उभा राहिले. क्षणभरासाठी तिथे शांतता पसरली होती.
"आजोबा, मला माझी चूक समजली. मी असे करायला नको होते पण रागाच्या भरात मी असे वागले. आता मी खरं सांगते मला माझ्या सासरी जायचे आहे. तिथली माणसे खूप चांगली आहेत. माझ्याशी खूप मायेने वागतात. मला त्यांचे प्रेम कधीच समजले नाही पण आता या क्षणी मला ते समजून आले आहे आणि मला पुन्हा तिथे जायचे आहे. ते मला घरात घेतील की नाही माहित नाही त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे." निशा रडतच म्हणाली.
"बाळा ते एका शेतकऱ्याचे घर आहे. तेथील माणसे खूप साधी आहेत. त्यांच्या मनामध्ये असे नक्कीच काही नसणार. ते तुला सांभाळून घेतील आणि घरातही घेतील. माझा विश्वास आहे. एक शेतकरी जगाचा पोशिंदा असतो तर त्यांच्या सुनेला अंतर देणार नाहीत. आपण जाऊया." असे आजोबा म्हणाले तेव्हा निशा येऊन आजोबांना बिलगली.
"आजोबा, मी तर माझ्या स्वप्नातच असायचे. स्वप्न हेच सत्य असावे असे मला वाटायचे पण सत्य परिस्थिती काही वेगळी होती हे मला आत्ता जाणवत आहे." निशा म्हणाली.
"पोरी, हे वयच असते. आपण मात्र हरळून न जाता मोठे जे सांगतात त्याचे आकलन करावे. मी नेहमीच तुझ्या चांगल्याचा विचार करत होतो. आजच्या जगात शेतकऱ्याला कोणी मुली देत नाहीत. सर्वांना नोकरीवाला हवा असतो. पण खरंच शेतकरी इतका वाईट असतो का? हे अनुभवण्यासाठीच मी तुझे लग्न मुद्दामहून शेतकऱ्यांशी केले. तुला ते पटले नव्हते हे मला समजत होते पण माझा निर्णय, माझी पारख चुकीची नाही हे तुला आता पटले ना? पण आता तुला त्याची सत्यता पटली." आजोबा म्हणाले.
"हो आजोबा, तुम्ही म्हणता ते खरे आहे." निशा म्हणाली.
थोड्यावेळाने निशा फ्रेश वगैरे होऊन जाण्याची तयारी करू लागली. सर्वजण तिची भेट घेऊ लागले. सगळी तयारी झाल्यावर आजोबा आणि तिचे बाबा तिला सोडण्यासाठी तिच्या सासरी गेले. सासरी गेल्यावर निशाने सर्वांची मनापासून माफी मागितली.
"अगं पोरी, यात तुझी काही चूक नाही. तुला जे वाटले ते केलेस. खरं तर शहरातली मुलगी इथे नांदेल की नाही असे आम्हाला वाटत होते. तू गेल्यानंतर आम्ही खूप घाबरलो होतो आणि तेव्हाच तुझ्या आजोबांना फोन केला होता पण त्यांनी सारे काही सावरून घेतले आणि आज तुला तुझी चूक समजली. आमची काही इच्छा नाही बाळा. तुम्ही दोघे नवरा बायको सुखाने संसार करा इतकीच आमची अपेक्षा आहे." निशाची सासू म्हणाली.
"आजोबा, म्हणजे तुम्हाला हे सगळे माहित होते तरीही तुम्ही शांत बसलात. थँक्यू आजोबा." निशा म्हणाली.
"तुमच्या सुखासाठी सारे काही करावे लागते बाळा." आजोबा म्हणाले.
सगळेजण बोलत बसले असता रोहन त्याच्या खोलीत गेला तेव्हा त्याच्या पाठोपाठ निशा देखील गेली.
"रोहन, मी तुला खूप चुकीचे समजले. मला माफ कर. आय मीन अहो, मला तुम्ही माफ करा." निशा म्हणाली.
"रोहन, मी तुला खूप चुकीचे समजले. मला माफ कर. आय मीन अहो, मला तुम्ही माफ करा." निशा म्हणाली.
"तू माझ्या आयुष्याचा आलीस आणि माझे आयुष्यच बदलून गेले. पण जेव्हा तू माझ्या आईला काही बाही बोललीस ना तेव्हा माझा राग अनावर झाला आणि मी तुझ्यावर हात उगारला. खरं तर मला हात उचलायला नको होता. मला माफ कर." रोहन म्हणाला.
"तुम्ही हात उगारलात म्हणूनच तर मी पुन्हा तुमच्या आयुष्यात आले." असे म्हणून निशा रोहनच्या मिठीत जाऊन विसावली आणि दोघांच्या संसाराला छान सुरुवात झाली.
समाप्त.
©®प्रियांका अभिनंदन पाटील.
जिल्हा- कोल्हापूर******माहेरून मागव — कथा
जिल्हा- कोल्हापूर******
" तुपात छान परतव ते काजू बदाम. आणि लाडू बनवताना अखडता हात घेऊ नकोस. " आशाबाई आपल्या सुनेला रश्मीला सांगत होत्या." हो आई परतते. " असं म्हणत रश्मीने काजू बदाम तुपावर परतून घेतले. आणि ती अक्रोड तुपात टाकणार तोच आशाबाई म्हणाल्या, " अगं थांब. अक्रोड कशाला टाकतेस ? "" आई मला लाडुमध्ये अक्रोड आवडतात. म्हणून थोडे टाकतेय. " रश्मी म्हणाली." हे बघ, भ्रमात राहू नकोस. हे लाडू स्वातीसाठी बनवायला लावतेय मी. एवढं तूप आणि काजू बदाम तुझ्यावर का उधळू मी ? तुला हवं असेल तर तुझ्या माहेरून मागव. मी कशी देतेय माझ्या लेकीला ? " आशाबाईचं बोलणं ऐकून रश्मी उडालीच.रश्मी - प्रकाशच लग्न होऊन दोन वर्ष झाले होते. नोकरीनिमित्त रश्मी प्रकाश सोबत दुसऱ्या शहरात राहत होती. रश्मीला पाचवा महिना सुरू झाला आणि प्रकाशला कामानिमित्त बाहेर गावी दोन महिने जावं लागलं. रश्मीच्या माहेरी तिची आई नव्हती म्हणून बाळंतपण सासरी करायचं असं प्रकाशाने ठरवलं. त्यामुळे बाहेरगावी जाण्यापूर्वी त्याने आपल्या आई वडिलांकडे रश्मीला सोपवलं. प्रकाशचे वडील सुद्धा कामामुळे जास्त वेळी बाहेरच असायचे.घरी आल्यापासून आशाबाईंनी तिला कामाला लावलं होत. म्हणाल्या की, " काम करत राहिलीस की डिलिव्हरी नीट होईल. "
रश्मी ऐकत गेली. आज मात्र सासूचा नवीन चेहरा समोर आला. तिला लक्षात येऊ लागलं की घरात फळ आली तरी परत दिसायची नाहीत. विचारलं तर म्हणायच्या " खराब होती, तर कधी बाजूची मुले आलेली त्यांना दिली. "जेवणात तूप पण नसायचं. तिच्या त्यावेळी सगळंच एकदम लक्षात आलं. तिला आता रडू आवरत नव्हतं. ती रूम मध्ये जाऊन रडली. तिच्या मनात कधी विचार सुद्धा आला नाही की सासूबाई असं वागतील. तिला प्रकाशला सर्व सांगावं वाटत होत पण कुठेतरी तो लांब आहे. त्याला टेन्शन नको म्हणून ती गप्प होती.त्यानंतर ती जेवढ्यास तेवढं वागू लागली. जेवणात तिला मन मारावं लागत होत. तिला कधी स्वतःच्या घरी परत जाते असं झालं होत. तिला सातवा महिना लागला तसं सर्वजण डोहाळे जेवण विषयी विचारू लागले. तेव्हा आशाबाई म्हणाल्या, " आमच्याकडे सुनेचं डोहाळे जेवण तिच्या माहेरी होत. सासरी नाही. "एक दिवस प्रकाश अचानक घरी आला. सर्वाना आनंद झाला पण प्रकाशच्या नजरेतून तिची रोडवलेली शरीरायष्टी सुटली नव्हती. प्रकाशला भेटायला गावातले काही लोकं, तसेच नातेवाईक सुद्धा आले होते. तेवढ्यात घराबाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला.सर्वजण बाहेर बघत होते. रश्मीचे बाबा, भाऊ आणि आत्या आत आल्या. त्यांना पाहून रश्मी आणि प्रकाशला आनंद झाला. प्रकाशाने त्यांना बसायला सांगितलं." अचानक कसं येणं केलं बाबा ? नाही म्हणजे फोन वगैरे नाही केलात म्हणून विचारलं." प्रकाशने विचारलं" रश्मीला न्यायला आलोय. " रश्मीचे बाबा म्हणाले." अहो बाबा पण डोहाळे जेवण झालं की नेणारच आहात ना ? मग आता कशाला ? " प्रकाश आणि सासरे एकदम म्हणाले." पण तुमच्यात तर सुनेचे डोहाळे जेवण करत नाहीत ना ? म्हणून म्हणल, मुलीचं पहिलं बाळांतपण आहे. काही हौस नको राहायला म्हणून तर तिकडे सर्व तयारी करायला सांगूनच आलोय. " रश्मीचे वडील." कोण म्हणाल तुम्हांला ? की आमच्याकडे सुनेचे डोहाळे जेवण होत नाही म्हणून ? आधी पासूनच अशी प्रथा आहे ना ? की सुनेचे डोहाळे जेवण सासरी होत आणि मग सून तिच्या माहेरी बाळांतपणासाठी जाते. " प्रकाशचे वडील म्हणाले." अहो, माझ्या नणंदबाई तुमच्या नात्यातच लागतात. पंधरा दिवसांपूर्वी इकडे येणं झालं त्यांचं, तेव्हा त्यांनी आशाबाईंना डोहाळे जेवणाचं विचारलं तेव्हा त्याचं म्हणाल्या. 'आमच्याकडे सुनेचं डोहाळे जेवण नाही होत म्हणून.' माझी वहिनी नसली तरी माझ्या भाचीच डोहाळे जेवण करायचं म्हणून मी माझी शेतातली कामे सोडून आलीये. " यावेळी रश्मीची आत्या म्हणाली." काय ओ ? हे काय ऐकतोय आम्ही ? सुनेचं डोहाळे जेवण आपल्याकडे होत नाही ? हे कधीपासून सुरू झालं ? " प्रकाशच्या वडिलांच्या आवाजात कडकपणा होता." नाही तसं नाही... ते तिला जास्त लोकं आले तर त्रास होईल म्हणून म्हणाले मी. " आशाबाई सारवासराव करत होत्या.एवढ्या वेळी गप्प बसलेली रश्मी शेवटी बोललीच, " बाबा, आत्या मला तुमच्यासोबत यायचं आहे. मला घेऊन चला. "रश्मीच बोलणं ऐकून सर्वजण तिच्याकडे बघू लागले.
पूर्ण वाचा लिंकवर
https://irablogging.com/blog/maherun-magav_44746
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा