स्वप्नसखा _ भाग ४
कॉलेजच्या पहिल्या दिवशी शेखर त्याच्या एका मित्राबरोबर कॉलेजमध्ये प्रवेश करत असतानाच समोरून एक स्मार्ट मुलगी आली. तिने गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला होता. मध्यम उंचीची, गव्हाळ वर्णाची ती तरुणी दिसायला खूपच सुंदर होती. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. तिची चाल एकदम डौलदार होती. ती शेखरच्या समोर येताच खूप ओळख असल्यासारखी त्याला म्हणाली,
"अरे तू शेखर ना. समर्थ विद्यालय मध्ये मी तुझ्या वर्गातच होते. माझं नाव कल्पना पवार. आता तरी ओळखलं का मला?"
"खरं सांगू का मी शाळेत असताना माझा अभ्यास, माझे मित्र आणि शाळेतील इतर स्पर्धा या व्यतिरिक्त इथे तिथे जास्त पाहतच नव्हतो."
"हो रे मला माहिती आहे म्हणूनच तर तुला आम्ही सगळ्या मुली खूप चांगल्या ओळखतो. तू जरी कोणाकडे पाहत नसलास तरी सगळ्या मुलींची तुझ्यावर विशेष नजर असायची."
"असेल मला काही त्याची कल्पना नाही."
"आता तू ती कल्पना कर. कारण आता कॉलेजमध्ये सुद्धा तुझ्यासारख्या हँडसम मुलाकडे सगळ्या मुलींची नजर असणारच आहे. अच्छा आता तुझी डिव्हिजन कोणती आहे. माझी पण तीच आहे का बघते नाहीतर सरळ मी बदलून घेईन."
"मी ए डिव्हिजन मध्ये आहे."
"अरे वा मग प्रश्नच नाही मी सुद्धा ए डिव्हिजन मध्ये आहे. आता मात्र तुला माझ्याशी मैत्री करावीच लागेल."
"बरं चल मी निघू आता आता लेक्चरची सुरुवात होईल. काही दिवसांतच सगळ्यांशी ओळख होईल."
"हो चल चल माझी तर ओळख झालीच तुझ्याशी."
अशी ही कल्पना शेखरला पहिल्याच दिवशी जरा ओव्हरस्मार्ट वाटली. त्याने कल्पनाही केली नव्हती की अशी एखादी कल्पना सरळ येऊन आपल्याशी बोलू लागेल. हळूहळू त्याच्या लक्षात आलं की ही पटकन ओळख करून घेणारी असली तरी हिचा स्वभाव खूप चांगला आहे. सगळ्यांना मदत करण्यात ती खूप तत्पर आहे. शिवाय घरची श्रीमंती, राजकारणी पार्श्वभूमी असूनही तिला कसलाही गर्व नाही. त्यामुळे शेखरशी तिची चांगलीच मैत्री झाली.
त्यांची मैत्री कॉलेजमध्ये प्रसिद्ध होती. आधी तिच्याशी मोजकेच बोलणारा शेखर आता अगदी मोकळेपणी बोलू लागला होता. कुठेही पाहिलं तरी कल्पना आणि शेखर एकत्रच असायचे. शेखर अभ्यासाबरोबरच इतर स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा. त्याचा आवाज छान होता. किशोरकुमारची गाणी तो खूप छान गायचा.
दोघं मिळून कॉलेजच्या गॅदरिंग मध्ये विविध कार्यक्रमात भाग घ्यायचे. दोघांची मैत्री दिवसेंदिवस वाढत चालली होती. कल्पना तर त्याच्यावर मनोमन प्रेम करत होती. तिला वाटायचं की शेखरचे पण तिच्यावर प्रेम असेल का? असेल तर त्याने त्याचं प्रेम व्यक्त करावं. असं एखाद्या मुलीला झुरवत ठेवू नये.
दोघं मिळून कॉलेजच्या गॅदरिंग मध्ये विविध कार्यक्रमात भाग घ्यायचे. दोघांची मैत्री दिवसेंदिवस वाढत चालली होती. कल्पना तर त्याच्यावर मनोमन प्रेम करत होती. तिला वाटायचं की शेखरचे पण तिच्यावर प्रेम असेल का? असेल तर त्याने त्याचं प्रेम व्यक्त करावं. असं एखाद्या मुलीला झुरवत ठेवू नये.
कॉलेजच्या सेकंड इयरला असताना त्यांची पिकनिक महाबळेश्वरला गेली होती. कल्पना अशा एखाद्या संधीची वाटच पाहत होती. अशा रम्य ठिकाणी शेखरने तिच्यावरच्या प्रेमाची कबुली द्यावी असं कल्पनाला मनोमन वाटत होतं. तिथे सर्वजण सनसेट पॉईंटला गेले असताना कल्पनाने शेखरला सर्वांपासून दूर नेलं. सूर्यास्ताच्या वेळी आकाशात गुलाबी,
केशरी विविध छटा दिसत होत्या. गर्दीमुळे दोघं खूपच एकमेकांच्या जवळ उभे होते. मैत्री करताना कल्पनाने पुढाकार घेतला होता. आता सुद्धा शेखर त्याच्या भावना व्यक्त करत नव्हता शेवटी कल्पनाने त्याचा हात हातात घेतला आणि हळुवार आवाजात ती म्हणाली,
केशरी विविध छटा दिसत होत्या. गर्दीमुळे दोघं खूपच एकमेकांच्या जवळ उभे होते. मैत्री करताना कल्पनाने पुढाकार घेतला होता. आता सुद्धा शेखर त्याच्या भावना व्यक्त करत नव्हता शेवटी कल्पनाने त्याचा हात हातात घेतला आणि हळुवार आवाजात ती म्हणाली,
"शेखर माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला कायम तुझ्या सहवासात रहावसं वाटतं." हे ऐकून शेखरने तिला अलगद बाहुपाशात घेतलं आणि तिच्या डोळ्यात बघत तोही म्हणाला,
"कल्पना माझं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला वाटायचं मी माझं प्रेम व्यक्त केलं तर आपली मैत्री संपेल की काय! कारण तू पहिल्यापासूनच खूप मोकळी वागायचीस. प्रेम आणि मैत्री यामध्ये गल्लत व्हायला नको."
"अरे वेड्या हे ऐकण्यासाठी मी कधीपासून वाट पाहत होते. शेवटी मलाच पुढाकार घ्यावा लागला ना! आपलं प्रेम निसटून तर जाणार नाही ना म्हणून मी माझं प्रेम व्यक्त केलं."
सूर्यास्त पाहताना दोघेही बराच वेळ त्याच अवस्थेत होते. जेव्हा सर्वांचा आवाज ऐकला अरे शेखर आणि कल्पना कुठे आहेत तेव्हा दोघं एकमेकांपासून विलग झाले.
(शेखरने प्रेमाची कबुली तर दिली पुढे काय होईल पाहूया पुढील भागात)
क्रमशः
©️®️सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा