स्वार्थ तुझा भगवंता...

स्वार्थ तुझा भगवंता खरा आज समजला...
स्वार्थ तुझा भगवंता
खरा आज समजला
खेळ परि दैवाचा हा
कधी नाही उमजला

किती केला धावा तुझा
नाही आला मदतीला
साथ जगाने सोडली
आला ना तू ही साथीला

दुःख मनातले सारे
तुझ्यापुढे हे मांडले
दाटलेले नयनात
अश्रू कित्येक सांडले

जीवनाच्या पटावर
माझी परिक्षा घेतली
सांग कोणत्या कर्माची
शिक्षा मला भेटली

झाला तूही स्वार्थी आता
कृपादृष्टी ना उरली
आहे खंबीर मन हे
मीही नाहीच हरली.....

~ सौ.प्रणाली चंदनशिवे.


🎭 Series Post

View all