स्वतः चा खर्च भाग 1
स्वतः उचला.
स्वतः उचला.
©️®️शिल्पा सुतार
सोसायटी मधे सेल लागला होता. अनघाचा सगळा ग्रुप जमला होता. किती छान ज्वेलरी आहे, ड्रेसेस आहेत. सगळ्यांमधे एकच उत्साह होता.
अनघा ही वॉकसाठी खाली आली होती. ती काय काय आहे ते बघत होती. तिने काहीच घेतलं नाही. मैत्रिणी बरीच खरेदी करत होत्या.
"अनघा काय झालं ग? ड्रेस आवडले नाहीत का?" प्रीतीने विचारलं.
"अग आता परवा दोन ड्रेस घेतले. ते ही बुटीक मधून. आता लगेच खरेदी नको वाटते. घरचे काही म्हणत नाही म्हणून आपण इतका ही गैरफायदा नको ना घ्यायला . " तिने खोट सांगितलं.
" घ्या ना मॅडम छान कॉटनचे ड्रेस आहेत. रोज वापरायला छान आहेत. " ती मुलगी माहिती देत होती.
अनघा बघत होती. तीच मन त्या गुलाबी ड्रेस मधे अडकलं होत. मला असाच ड्रेस हवा होता. पण काय करू माझ्याकडे पैसे नाहीत. मोहन अगदी मोजून पैसे देतात. आता ही खरेदी केली तर खूपच बोलणे बसतील. किती मन मारून रहावं लागतं.
मालूताई तिच्या सासुबाई तिथेच त्यांच्या मैत्रिणीं सोबत बाकावर बसलेल्या होत्या. त्यांनी बघितलं. त्या काही म्हणाल्या नाही.
"अनघाने काही घेतल नाही का? ती म्हणत होती आता पर्वा खरेदी केली." समोरच्या वहिनीने विचारलं.
" कसल काय. ती काहीही सांगते. तिच्याकडे पैसे नसतात. तिला मोहनला विचारावं लागेल. तो पैसे देईल तेव्हा ती काही घेईल." मालू ताई म्हणाल्या.
ते अनघाने ऐकलं. ती नाराज होती. सगळ्यां समोर अपमान झाला. आई पण अस कस बोलतात. माझ काही अस्तित्व नाही. सगळे मला गृहीत धरतात. हातातली चांगली नोकरी उगीच सोडली. तेव्हा याच आई वरदला सांभाळायला तयार नव्हत्या. माझ्याकडे इलाज नव्हता. आता याच मला टोमणे मारत आहेत. ती वरदला घेवून घरी आली. ती स्वयंपाक करत होती. तीच मन लागत नव्हतं.
मोहन घरी आला. तिने पाणी दिलं. तिने खिडकीतून बघितलं अजून ही सेल वाले लोक खाली होते. बोलू का? ती विचार करत होती. तिला स्वतः चा राग आला.
"अहो खाली सेल लागला आहे." ती म्हणाली.
"हो मी बघितला." मोहन बॅग जागेवर ठेवत म्हणाला.
"मला एक ड्रेस आवडला होता."
"नंतर बघू अनघा. या महिन्यात जमणार नाही."
"ठीक आहे." ती काही म्हणाली नाही. तिने पोळ्या करुन घेतल्या. मला माहिती होत हे असचं म्हणतील. मी पण का विचारते ते समजत नाही. घरकाम एके घर काम हेच माझं आयुष्य आहे. ती नाराज होती जेवतांना ही ती विशेष कोणाशी बोलली नाही.
सकाळी नेहमी प्रमाणे काम सुरू झाले. चहा झाल्यावर अनघा थोड्या वेळ खाली आली. वरदची शाळेची बस आली. त्याला सोडून ती बागेत फेर्या मारत होती. स्वाती दिसली.
"काय ग कुठे होतीस? या आठवड्यात फिरायला आली नाहीस? " अनघाने विचारल.
"अग आम्ही फिरायला गेलो होतो. आमची एनिवर्सरी होती ना." स्वाती तिकडे कुठे कुठे फिरले ते सांगत होती. खूप खुश दिसत होती.
"अरे वा." अनघा म्हणाली. तिला तिचा हेवा वाटला.
स्वाती खूपच खुश दिसत होती. गळ्यात मंगळसूत्र ही चमकत होतं. बापरे हे पण गिफ्ट मिळालेलं दिसतं. लोकांना कसं जमतं समजत नाही. इथे आम्ही आमचं महिन्याभराचं बजेट कसं करतो आमचं आम्हाला माहिती.
आमच्याकडेही पैसे असतिल पण मोहन मला काही सांगत नाही. जसं लग्न झालं आहे तसं काटकसर सुरू आहे. कुठल्या गोष्टीसाठी ते हात सैल सोडत नाही. फक्त त्यांचा आणि त्यांच्या आई-वडिलांच काही करायचं असलं की मोकळ्या मनाने सगळं करतात. माझं आणि माझ्या मुलाचा नंबर असला की नेहमीच काटकसर. घराचं कर्ज सगळं आठवतं. माझी कधी हौस मौज होणार आहे की नाही?
लग्नात केलेले दागिने तेच अंगावर आहेत. त्यानंतर काहीही घेतलं नाही. ना लेटेस्ट साड्यां ना कपडे. मागच्या महिन्यातही तो अनारकली किती आवडला होता. घ्यायला जमला नाही. एवढं काय गावाला जाताना सुद्धा पैसे मिळत नाहीत. माझी चांगली नोकरी होती उगीच सोडली. तिला परत पस्तावा झाला.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा