Login

स्वतः चा खर्च भाग 2

स्वतः चा खर्च स्वतः उचला
स्वतः चा खर्च भाग 2
स्वतः उचला.

©️®️शिल्पा सुतार

विचार करत ती घरी निघाली. आज तिला जरा मोहनचा रागच आला होता. मागच्या महिन्यातच तिचा वाढदिवस झाला. तिने घरीच सगळा स्वयंपाक केला होता. गिफ्ट काही मिळालं नाही. फक्त केक आणला होता.

किती गृहीत धरायचं. मी काही म्हणत नाही म्हणून यांनी कधीच काही करू नये. बरं कंपनीत चांगल्या पोस्टवर आहेत. एवढा पैसा साठवून काय करणार आहेत. उमेदीचा काळ निघून गेल्यावर काही वाटत नाही. जेव्हा हात, पाय चालणार नाहीत तेव्हा फिरायला नेवून काय उपयोग.

अनघा घरी आली. तिने पटपट पोहे केले. चहा केला. डिश समोर ठेवल्या. आई, बाबा नाश्त्याला आले.

"अनघा अग पोह्यांमध्ये कोथिंबीर नाही, लिंबू नाही." मालूताई कुरकुरल्या.

"आई भाज्या संपलेल्या आहेत. आज आणायला जाते." अनघा म्हणाली.

"मोहन येताना आमचे औषध आणं." मालूताई म्हणाल्या.

"हो आणतो."

"माझा चष्मा सुद्धा आज मिळणार आहे जरा बघतो का? ही पावती घे. "

" हो बाबा."

मोहन तयार होता.

"अहो किराणा नाही, भाजी नाही, थोडे पैसे द्या. " अनघाने सांगितल.

त्याने हजार रुपये दिले.

" बस इतकेच? त्यात काय होत? " अनघा म्हणाली.

" एडजेस्ट करत जा अनघा. यात बसेल ते आण. " मोहन म्हणाला.

तिने लिस्ट केली." अहो अजून हजार रुपये तरी द्या. किराणा खूप महाग आहे. "

तो काही म्हणाला नाही.

" ठीक आहे मग हे हजार ही घ्या. तुम्ही येतांना सामान घेवून या. नाहीतर बाहेरुन जेवण घेवू. " अनघा चिडून म्हणाली.

" तुझ म्हणजे ना दुसर टोक असत. हे घे. " त्याने रागाने अजून पैसे दिले.

हे असे वागतात जस मी एकटी जेवते. माझ्यासाठी खर्च होतो जसा.

दुपारी वरद घरी आला. त्याच जेवण झालं. तो जरा वेळ झोपला.

" आई मी दुकानात जावून येते."

अनघा तयार झाली. वरद उठून बसला.

" आई मी पण येणार." तो ऐकत नव्हता.

अनघा किराणा दुकानात उभी होती. लिस्ट प्रमाणे काका सामान देत होते. वरद बाजूला खेळत होता. मधेच त्याने गहुच्या पोत्यात हात घातला.

" नको बेटा. " अनघा त्याचा हात धरून उभी होती.

"आई मला चिप्स घे."

"नाही घरी शंकरपाळे केले आहेत. ते खा." अनघा ओरडली. तो रडत होता.

तिने तो म्हणतो तो खाऊ घेतला. "सामान घरी पोहचवून द्या काका."

"हो."

ती भाजी घ्यायला आली. पटकन घरी आली. ती किचन मधे कुकर लावत होती.

वरद आला. "आई हे पाकीट उघडून दे."

"आता खाऊ नकोस मग तू जेवत नाहीस. "

तो ऐकत नव्हता तिने पाकीट उघडून वाटीत थोडे चिप्स दिले. "थोड्या वेळाने स्टडी करायचा. "

" हो आई. " तो पुढे बसुन खाऊ खात होता.

मालू ताई त्याच्या जवळ बसुन टीव्ही बघत होत्या. मोहन घरी आला. तो आई जवळ बसला." अनघा पाणी दे."

ती पाणी घेवून आली.

" वरद काय खातोय? किती वेळा सांगितलं त्याला अस काही देवू नकोस. फालतू खर्च नुसता. तरीच तुला पैसे पुरत नाही." त्याने टोमणा मारला.

"मी म्हणाले होते. तो ऐकत नाही. एखाद्या वेळी खायला हरकत नाही." अनघाने उत्तर दिलं.

मोहनला कारण मिळालं. त्याने अनघाला खूप ओरडलं.

ती आत पोळ्या करत होती. या पुढे वरदला घेवून मी दुकानात जाणार नाही. तो ऐकत नाही. कधी तरी आठवड्यातून एकदा तो काहीतरी मागतो. मी किती नाही म्हणते काय कराव अस आहे. यांना लगेच तो खर्च वाटतो.

तिने ताट केले. जरा शांततेत जेवण झालं. आज यांनी वरदचा खाऊ काढला. चिप्स चांगले नाहीत माहिती आहे. तरी पण त्याच्यासाठी झालेला खर्च यांना चालत नाही या गोष्टीच अनघाला वाईट वाटत होत.

"आई हे घे तुझे औषध. बाबा तुमचा चष्मा ." मोहन बराच वेळ आई बाबांशी बोलत होता.

अनघा बघत होती. औषध असतांना पंधरा दिवस आधीच आई औषध सांगतात. तरी हे काही न बोलता घेऊन येतात. आणि बाबांचा चष्मा चांगला आहे तरी उगीच नवीन फ्रेम घेत राहतात. तेव्हा यांना वायफळ खर्च वाटत नाही. फक्त वरदचा खाऊ माझा खर्च जास्त वाटतो. आम्हाला काही घेवू देत नाही. ती नाराज होती.

🎭 Series Post

View all